पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात युक्रेनला भेट देण्याची शक्यता आहे. रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये शेजारी देश युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर मोदींचा युद्धग्रस्त राष्ट्राचा हा पहिलाच दौरा असणार आहे. ही भेट अद्याप नियोजनाच्या टप्प्यात असली तरी दिल्लीतील युक्रेन दूतावासाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘WION’ने दिलेल्या वृत्तानुसार ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात ही भेट होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती. या भेटीच्या एका महिन्यानंतर मोदींचा कीव दौरा आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या कीवच्या संभाव्य दौऱ्यादरम्यान, भारत आणि युक्रेनचे संबंध कसे बदलतील? या भेटीचा रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीवर काही परिणाम होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

thackeray group criticized pm narendra modi
“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
PM Narendra Modi, Wardha,
पंतप्रधान मोदी २० ला वर्धेत! देशभरातून २० हजार ‘विश्वकर्मा’ हजेरी लावणार
Prime Minister Narendra Modi said efforts to strengthen relations between India and Brunei
ब्रुनेईबरोबर संबंध दृढ करण्याचे प्रयत्न; पंतप्रधान मोदी दोन देशांच्या दौऱ्यावर
two new US-India agreements
भारत आणि अमेरिकेने संरक्षण करारावर केली स्वाक्षरी; काय आहेत दोन नवीन करार? याचा भारताला कसा फायदा होणार?
PM Narendra Modi advice to Ukraine Russia for a solution to the war
युक्रेन-रशिया चर्चा आवश्यक! युद्धावर उपायासाठी पंतप्रधान मोदींचा दोन्ही देशांना सल्ला
japan flights cancel
‘या’ देशात एक कात्री गायब झाल्याने ३० हून अधिक उड्डाणे रद्द; नेमकं प्रकरण काय?
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच पोलंड दौऱ्यावर, द्विपक्षीय संबंधांच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त भेट
पंतप्रधान मोदी यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : समुद्रात पुन्हा तेल तवंग; १.४ दशलक्ष लिटर तेल वाहून नेणारे जहाज बुडाले, तेल गळतीचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो?

भारत-युक्रेन संबंध

नवी दिल्लीचे कीवशी अगदी जुने संबंध आहेत. जानेवारी १९९२ मध्ये दोघांनी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. युक्रेनला मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांमध्ये भारताचाही समावेश होता. सोव्हिएत काळापूर्वी आणि नंतर, दोन्ही राष्ट्रांनी मैत्रीपूर्ण संबंध राखले. भारत आणि युक्रेनमधील संबंध सांस्कृतिक देवाणघेवाण आणि व्यापार यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, कीवने २०२१ मध्ये दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची निर्यात केल्यामुळे भारत आणि युक्रेनमधील व्यापार संबंध आणखी मजबूत झाले.

परंतु, रशिया-युक्रेन युद्धानंतर दोन्ही देशांमधील व्यापाराला फटका बसला आहे. २०२१ मध्ये भारत आणि युक्रेनमधील व्यापार ३.३८ अब्ज डॉलर्स होता, जो २०२२ मध्ये २.५८ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आला. भारताकडून युक्रेनला होणारी निर्यात २२.८ टक्क्यांनी घसरून ८५.४९ दशलक्ष डॉलर्स झाली, तर युक्रेनकडून भारताला होणारी निर्यात १७.३ टक्क्यांनी घसरून १.६९ अब्ज डॉलर्स झाली, असे वृत्त ‘डेक्कन हेराल्ड’ने दिले.

भारत आणि युक्रेनचे संबंध सांस्कृतिक देवाणघेवाणीतूनही बहरले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या (एमईए) मते, युक्रेनमधील जनतेला भारतीय संस्कृती, नृत्य, योग, तत्त्वज्ञान, आयुर्वेद आणि अध्यात्म यांमध्ये मोठा रस आहे. ३० हून अधिक युक्रेनियन सांस्कृतिक संघटना आणि गट आहेत, ज्या भारतीय कलांना, विशेषतः नृत्य कलांना प्रोत्साहन देतात. युक्रेनमध्ये एक लहान भारतीय समुदायदेखील आहे, ज्यात प्रामुख्याने व्यावसायिक आणि विद्यार्थी वर्गाचा समावेश आहे. ‘एमईए’नुसार, व्यावसायिक समुदाय युक्रेनमधील उत्पादन, पॅकेजिंग, व्यापार आणि सेवा उद्योगात गुंतलेला आहे.

युद्धकाळात युक्रेन, रशिया यांच्याशी भारताचे संबंध

युक्रेनबरोबरच्या रशियाच्या युद्धावर नवी दिल्ली तटस्थ राहिली आहे. भारताचे मॉस्कोशी ऐतिहासिक संबंध आहेत. मॉस्को देशाचा सर्वोच्च शस्त्र पुरवठादार आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही राष्ट्रांशी भारताचे खूप चांगले संबंध आहेत. नवी दिल्लीने युद्धावर पुतिन यांच्यावर टीका करणे टाळले असले, तरी संघर्ष संपवण्यासाठी त्यांना वारंवार शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी दोन्ही देशांना युद्ध थांबविण्याचेदेखील आवाहन केले आहे.

मॉस्कोसोबतचे संबंध कायम ठेवण्यासाठी भारताने पाश्चिमात्य देशांच्या दबावाचा प्रतिकार केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले होते, युक्रेन युद्धानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा होता. प्राप्त माहितीनुसार राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याबरोबरच्या भेटीत पंतप्रधान म्हणाले, “प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वासह संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचा आदर करण्याबाबत भारत आपली भूमिका कायम ठेवतो. युद्धभूमीवर कोणताही उपाय नाही, संवाद आणि मुत्सद्दीपणा हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे.”

हेही वाचा : गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे भारतात ५ लाख लोकांचा मृत्यू? काय आहे कारण?

आगामी काळातील या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौर्‍यात रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धविरामाचा मार्ग सापडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रशिया-युक्रेन युद्धात निरपराध लोक मारले जात आहेत. मोदींनी यापूर्वीही दोन्ही देशांना युद्ध थांबविण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना भेटल्यानंतर अनेक गोष्टींवर तोडगा निघण्याची अपेक्षा काही देशांना आहे.