विश्लेषण : ९,२५० रुपयांपर्यंत मिळू शकेल पेन्शन, पंतप्रधान वय वंदन योजना आहे तरी काय? | PMVVY Pradhan Mantri Vaya Vandana Yojana information and benefits | Loksatta

विश्लेषण : ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमहिना मिळणार ९२५० रुपये! काय आहे सरकारची वय वंदन योजना? कसा मिळणार लाभ?

वयाच्या उत्तरार्धाकडे वळताना आर्थिक सुरक्षा असणे गरजेचे आहे.

विश्लेषण : ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमहिना मिळणार ९२५० रुपये! काय आहे सरकारची वय वंदन योजना? कसा मिळणार लाभ?
सांकेतिक फोटो

आयुष्याच्या उत्तरार्धाकडे वळताना आर्थिक सुरक्षा असणे गरजेचे आहे. निवृत्त झाल्यानंतर नोकरी नसते पण गरजा मात्र कायम असतात. याच कारणामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी ‘पंतप्रधान वय वंदना योजना’ योग्य पर्याय ठरू शकतो. या योजनेची सुरुवात २६ मे २०२० साली करण्यात आली. ३१ मार्च २०२३ नंतर ही योजना बंद करण्यात येणार आहे. याच कारणामुळे पंतप्रधान वय वंदन योजना काय आहे? या योजनेद्वारे मिळणारा परतावा किती आहे? योजनेंतर्गत किती रुपयांची गुंतवणूक करत येऊ शकते, यावर एक नजर टाकुया.

हेही वाचा >>> विश्लेषण : US Green Card साठी भारतीयांना १९५ वर्ष प्रतिक्षा का करावी लागेल? जाणून घ्या

ज्येष्ठ नागरिक आर्थिक सक्षम व्हावेत तसेच त्यांना सामाजिक, आर्थिक सुरक्षा उपलब्ध व्हावी म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान वय वंदन योजना सुरू केलेली आहे. ही योजना आयुर्विमा महांडळ (LIC)द्वारे राबवली जाते. ज्या भारतीय नागरिकाचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, तो प्रत्येकजण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेद्वारे जास्तीत जास्त १५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. याआधी या योजनेच्या माध्यमातून ७.५ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास मुभा होती. मात्र नंतर ही मर्यादा वाढवण्यात आली. आता या योजनेद्वारे १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

हेही वाचा >>> विश्लेषण: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार तरी कधी? हा वाद काय आहे?

या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी गुंतवलेल्या पैशांवर बँकांच्या तुलनेत अधिक परतावा. या योजनेचा कालावधी दहा वर्षे असून या काळात गुंतवलेल्या रकमेवर ७.४ टक्के इतका व्याजदर मिळतो. बँकेत गुंतवलेल्या पैशांपेक्षा या योजनेत जास्त व्याजदर दिला जातो. याच कारणामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पंतप्रधान वय वंदन योजना हा पर्याय उत्तम ठरू शकतो.

हेही वाचा >>> विश्लेषण : मतदानाचे वय १८वरून १६ वर्षे का केलं जातंय? जाणून घ्या न्यूझीलंड सरकारसमोरील अडचणी?

गुंतवणूकदाराने गुंतवलेल्या पैशांवर एक निश्चित पेन्शनदेखील मिळते. या योजनेत गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा १५ लाख रुपये आहे. एखाद्या व्यक्तीने या योजनेद्वारे १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तिला दरमहा ९२२० रुपये पेन्शन म्हणून मिळतील. जर १००० रुपये प्रतिमहा पेन्शन हवे असेल तर कमीत कमी १६२,१६२ एवढी रक्कम गुंतवावी लागेल. तिमाही, सहामाही, वर्षिक अशा कालावधीत पेन्शन हवे असेल तर तोही पर्याय या योजनेत उपलब्ध आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: भारतातील निवडणुकांचा चेहरामोहरा बदलणारे टी. एन. शेषन कोण होते? त्यांनी कोणत्या सुधारणा केल्या?

पंतप्रधान वय वंदन योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराचे आकस्मात निधन झाल्यास त्याच्या वारसालादेखील गुंतवलेली रक्कम मिळू शकते. या पॉलिसीवर कर्जदेखील घेते येते. पॉलिसी घेतल्यापासून तीन वर्षांनंतर कर्ज मिळू शकतो. आपण एकरकमी भरलेल्या रकमेच्या ७५ टक्के कर्ज आपल्याला मिळू शकते. दिलेल्या कर्जावरील व्याजाची वसुली ही मिळणाऱ्या पेन्शनधून केली जाते. पंतप्रधान वय वंदन योजनेचे वैशिष्य म्हणजे या योजनेंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर जीएसटी आकारला जत नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 11:02 IST
Next Story
विश्लेषण: कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भरपाई वेळ का वाढतोय?