देशभरात विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत खूप वाढले आहे. या धमक्यांमुळे सामान्य प्रवाशांसह विमान कंपन्यांनाही (विशेषकरून आर्थिक) मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. समाजमाध्यमांवरून देण्यात आलेल्या काही धमक्यांचा उगम युरोपातील असल्याचेही तपासात उघड झाले आहे. समाजमाध्यमांच्या माध्यमातून दिले जाणारे हे धमकी प्रकरण एवढे वाढले आहे की विमानतळावरील सुरक्षा कार्यपद्धतीत बदल करण्याचा निर्णय केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी अखेर घेतला आहे.  त्याबाबत जाणून घेऊया…

धमक्यांचे सत्र केव्हापासून?

ऑक्टोबर महिन्यापासून देशातील सर्वच विमानतळांवर तसेच विमान कंपन्यांना धमक्यांचे संदेश प्राप्त होत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसांतच धमक्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली होती. बहुतेक संदेश समाजमाध्यमांद्वारे पाठवण्यात आले होते. विमान कंपन्या, स्थानिक पोलीस, विमानतळ प्राधिकरण यांना ई-मेल अथवा संदेश पाठवून धमक्या देण्यात आल्या. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात एकाच दिवसात ८५ नवीन धमक्या आल्या होत्या. त्यापूर्वी, १५ दिवसांत ७० हून अधिक धमकीचे संदेश प्राप्त झाले होते. त्यात यूके १०६ (सिंगापूर ते मुंबई) आणि यूके १०७ (मुंबई ते सिंगापूर) यासह विस्तारा एअरलाइन्सला त्यांच्या मुंबईतून उड्डाण करणाऱ्या सहा विमानांबाबत संदेश प्राप्त झाले होते. अकासा एअरलादेखील क्यूपी १०२ (अहमदाबाद ते मुंबई), क्यूपी १३८५ (मुंबई ते बागडोगरा), क्यूपी १५१९ (कोची ते मुंबई) आणि क्यूपी १५२६ (लखनौ ते मुंबई) यासह अनेक विमानांबाबत सतर्कतेचे आदेश देण्यात आले. इंडिगो एअरलाइन्सने ६ ई ५८ (जेद्दा ते मुंबई) आणि ६ ई १७ (मुंबई ते इस्तंबूल) सह सहा विमानांना सुरक्षा सतर्कतेचा इशारा देण्यात आला. प्रत्येक विमानांची व प्रवाशांची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. तपासणीत सर्व धमक्या अथवा संदेश खोटे असल्याचे निष्पन्न झाले.

delhi school bomb hoax
४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Loksatta explained What will be achieved by purchasing Rafale M fighter jets
विश्लेषण: ‘राफेल एम’ लढाऊ विमाने खरेदी करण्याने काय साध्य होणार ?
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
pune PMP is likely to increase ticket rates this year
पीएमपीचे तिकीट वाढणार, सर्वसामान्यांचा प्रवास होणार महाग ?
bitcoin price review bitcoin prices got a boost reaches 100000 usd
विश्लेषण : ‘बिटकॉइन’ पोहोचले १ लाख डॉलरवर… का आणि कसे? भारतात मान्यता मिळेल?
40 years of the bhopal gas tragedy
३८०० मृत्यू, २० हजार बाधित… सर्वांत भीषण औद्योगिक दुर्घटना नि कोणालाच अटक नाही… भोपाळ वायूगळतीची ४० वर्षे!
Which regions of the world are safe from nuclear war Which areas are most at risk
अणुयुद्ध झालेच तर… जगातील मोजकेच सुरक्षित प्रदेश कोणते? कोणत्या भागांस सर्वाधिक धोका?

हेही वाचा >>> विश्लेषण : कांद्याचा तुटवडा का आणि किती दिवस?

विमानांच्या उड्डाणांवर काय परिणाम?

समाजमाध्यमांद्वारे पाठवण्यात आलेल्या या धमक्यांमुळे देशभरातील ५१० उड्डाणांवर परिणाम झाला. महिन्याभरात नोंदवण्यात आलेला हा उच्चांक असून मुंबईतच याबाबत १६ हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणा, प्रवासी व विमान कंपन्या सर्वांनाच त्रासाला सामोरे जावे लागले. विशेषकरून या धमक्यांमुळे विमान कंपन्यांच्या खर्चातही किमान २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नेहमीच्या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणांचे काम अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.

धमक्या नेमक्या कुठून?

पूर्ववैमनस्यातून एखाद्याला अडकवण्यासाठी धमकी देण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंडिगो कंपनीची विमाने तसेच न्यूयॉर्ककडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात सहा दहशतवादी सहा किलो आरडीएक्ससह घुसल्याचा संदेश ‘एक्स’वरील ‘फैजलुद्दीन ६९’ व ‘फैजलुद्दीन २७०७७’ या खात्यांवरून इंडिगो आणि एअर इंडियाच्या एक्स खात्यावर पाठविण्यात आला होता. फैजलुद्दीन निब्रान नावाच्या व्यक्तीने हे संदेश पाठवल्याचे भासवण्यात आले होते. या संदेशामुळे विमानतळावर मोठा गोंधळ उडाला होता. इंडिगोची विमाने थांबवून त्यांची संपूर्ण तपासणी करण्यात आली, तर न्यूयॉर्कला जाणारे विमान दिल्लीत उतरविण्यात आले. मित्राला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी त्याच्या ‘एक्स’ खात्यावरून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने विमानांमध्ये बॉम्ब असल्याचा संदेश पाठवल्याचे तपासात उघड झाले. हा मुलगा छत्तीसगडमधील असून त्याची रवानगी डोंगरी बाल सुधारगृहात करण्यात आली. किरकोळ प्रकार वगळता आयपी अॅड्रेसनुसार बहुतेक संदेश लंडन, जर्मनी व फ्रान्स येथून पाठवल्याचे निष्पन्न झाले आहे. पण आरोपी त्यासाठी व्हीपीएन सुविधेचा वापर करत असल्याचा संशय आहे. इल्युमिनाटी हॅकर्स ग्रुपशी साधर्म्य असलेली त्यांची कार्यपद्धती असून ते भीती व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे.

हेही वाचा >>> आर्यन झाला अनाया: क्रिकेटर संजय बांगर यांच्या मुलाने केलेली ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’ची प्रक्रिया कशी होते? त्याचे दुष्परिणाम काय?

सुरक्षा यंत्रणांकडून कार्यपद्धतीत कोणते बदल?

धमक्यांच्या संदेशांमुळे विमानतळावरील सुरक्षा अधिकाधिक आव्हानात्मक व गुंतागुंतीची बनली आहे. धमक्यांसाठी समाजमाध्यमांचा प्रामुख्याने वापर होत असल्यामुळे आता विमानतळ सुरक्षा यंत्रणांनी या धमक्यांचे मूल्यमापन करताना बहुस्तरीय दृष्टिकोन अवलंबण्याचा तसेच धमकीच्या विश्वासार्हतेची व गंभीरतेची खात्री करण्यासाठी विविध घटकांचा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी धमकीला ‘विशिष्ट’ किंवा ‘अविशिष्ट’ म्हणून वर्गीकृत करण्यापूर्वी, तिच्या माहितीच्या स्रोताची विश्वासार्हता विचारात घेण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना करण्यात आल्या आहेत. शिवाय, संबंधित विमानातून एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती प्रवास करत आहेत का, समाजमाध्यमांवरून धमकी देताना पडताळणी केलेल्या खात्याच्या वापर झाला आहे का, धमकीसाठी वापरण्यात आलेले खाते निनावी अथवा इतर व्यक्तीच्या नावाचा वापर करून तयार करण्यात आले आहे का, संबंधित खात्याद्वारे अनेक धमकीचे संदेश मिळाले आहेत का, याचीही पडताळणी करण्याच्या सूचना विमातळावरील सुरक्षा यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, विमान, टर्मिनल इमारत किंवा कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब धमकीची माहिती प्राप्त झाल्यास, वरिष्ठांशी संपर्क साधावा, ते उपलब्ध नसल्यास सुरक्षित माध्यमांचा वापर करून संपर्क साधावा. शक्य तेवढ्या लवकर नियंत्रण कक्षात एकत्रित येऊन सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या,असाही आदेश देण्यात आला आहे.

आधीची कार्यपद्धती कशी?

हे बदल करण्यापूर्वी धमकीचे वर्गीकरण करण्यासाठी धमकी देणाऱ्याची ओळख, तो एखाद्या दहशतवादी संघटना अथवा इतर संस्थांसाठी काम करतो का, धमकीमागे एखाद्या दहशतवादी संघटनेचा सहभाग, संघटनेची क्षमता, व्यक्तीचा अथवा संघटनेचा धमक्यांचा पूर्वेतिहास, धमकीचा हेतू, धमकी अथवा माहितीच्या संदेशाचा कालावधी, स्थानिक परिस्थिती, संबंधित राज्यातील राजकीय व सामाजिक परिस्थिती अशा निकषांचीही तपासणी केली जायची. पण ती कार्यपद्धती फारशी परिणामकारक नसल्याचेच अलीकडच्या घटनांनी दाखवून दिले.

Story img Loader