What is Manglik, Hindu superstition महिलेला लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर महिलेला मंगळ असल्याचे कारण देवून लग्नाला नकार दिला, असा दावा खुद्द पीडित महिलेने केला. त्या संदर्भात सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेत अलाहाबाद उच्च न्यायालयाने २३ मे रोजी लखनऊ विद्यापीठातील ज्योतिष विभागाच्या प्रमुखांना महिलेला खरोखर मंगळ आहे का, हे पडताळण्याचे आदेश दिले आणि संपूर्ण देशभरात वादाचे मोहोळ उठले! या आदेशानंतर विविध सामाजिक स्तरातून बलात्कार प्रकरणाची पडताळणी महिलेचा मंगळ पाहून करणार का?, अशी विचारणा करत तीव्र असंतोष व्यक्त झाला. म्हणूनच या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आणि शनिवारी (३ जून) रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या ‘तक्रारदाराच्या मंगळाची कुंडली तपासण्याच्या’ आदेशाला स्थगिती दिली. तसेच न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्या. पंकज मिथल यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाला स्वतःच्या गुणवत्तेवर निर्णय घेण्यास बजावले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय समाजातील मंगळाविषयीच्या धारणा व न्यायालयाने दिलेला निर्णय समजून घेणे समयोचित ठरणारे आहे.

आणखी वाचा: विश्लेषण: हिटलरच्या पेन्सिलमध्ये दडलाय इतिहास! कोण होती या हुकुमशहाची प्रेयसी?

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

मंगळदोष ही संकल्पना श्रद्धा की अंधश्रद्धा यावर होणारा वाद हा पारंपरिक आहे. सर्वसाधारण जन्मपत्रिकेत मंगळ असणाऱ्या व्यक्तींनी मंगळाच्याच जोडीदारासोबत विवाह करावा, अशी समजूत भारतीय समाजात आहे. असे केले नाही तर मंगळ नसणाऱ्या जोडीदाराला अपमृत्यु, दुःख, आजारपण यांना सामोरे जावे लागते, असा समज आहे. त्यामुळेच विवाह ठरवताना मंगळ असणाऱ्या वधू- वरांकडे अपराध्याप्रमाणे पहिले जाते. सध्याच्या या न्यायालयीन प्रकरणात पीडितेच्या वकिलाकडून करण्यात आलेल्या युक्तिवादाप्रमाणे लग्न समारंभ अर्ध्यावर आलेला असताना, मंगळाच्या प्रकरणावरून हे लग्न होवू शकत नाही, असे सांगण्यात आले होते. म्हणूनच या महिलेने न्यायाच्या अपेक्षेने न्यायालयाकडे धाव घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिच्या कुंडलीत खरोखरच मंगळ आहे का, हे पडताळण्याचे आदेश दिले होते. याच आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे.

जन्म कुंडली म्हणजे नक्की काय ?

श्री लाल बहादूर शास्त्री नॅशनल संस्कृत युनिव्हर्सिटी, नवी दिल्लीच्या ज्योतिष विभागाचे प्रोफेसर विनोद कुमार शर्मा यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना सांगितले, मंगळ ग्रह जन्म कुंडलीमध्ये कोणत्या स्थानावर आहे. या आधारावर व्यक्तीला मंगळ आहे की नाही हे ठरविले जाते. ज्योतिषशास्त्रात, जन्मकुंडली हा एक तक्ता आहे. जो एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी सूर्य, चंद्र आणि विविध ग्रहांची स्थिती दर्शवतो. ग्रहांची ही स्थिती त्या व्यक्तीच्या आयुष्याची दिशा ठरविते असे ज्योतिष शास्त्रात मानले जाते.

आणखी वाचा: विश्लेषण: चुंबनाची परंपरा नक्की कोणाची? भारताची की मेसोपोटेमियाची? काय सांगतेय नवीन संशोधन ?

पत्रिकेला मंगळ आहे की नाही, हे कसे ठरविले जाते ?

प्रोफेसर विनोद कुमार शर्मा यांनी सांगितले, ‘मंगळ हा शौर्य आणि उत्कटतेचा ग्रह आहे. त्यामुळे मंगळाचे वर्चस्व असणे ही वाईट गोष्ट असेलच असे नाही. मंगळाचा एकूण परिणाम इतर ग्रहांची दृष्टी-प्रभाव, त्यांचा स्वतःचा स्वभाव, वैशिष्ट्ये, परस्परांतील प्रतिस्पर्धा यांवर अवलंबून असतो. एका कुंडलीमध्ये बारा घरे असतात. पहिल्या, चतुर्थ, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात मंगळ उपस्थित असल्यास त्या कुंडलीला मंगळ असल्याचे मानले जाते. मंगळ हा आक्रमकतेचा ग्रह असल्यामुळे, त्याच्या प्रभावशाली असलेल्या व्यक्तीच्या जीवनात इतर वाईट परिणामांसह असंतोष आणि संघर्ष होऊ निर्माण होण्याची शक्यता असते. काही प्रकरणांमध्ये, हा परिणाम जोडीदाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो. (असे शर्मा यांचे मत असले तरी सर्वच ज्योतिषी हे मान्य करत नाहीत. किंबहुना प्रांतिक भेदानुसार पत्रिकेत मंगळ आहे की नाही, हे ठरविणारे नियम वेगवेगळे आहेत. मंगळ असलेल्या जोडीदारामुळे अपशकून, मृत्यू ओढवतो. यासारख्या पारंपरिक समजुतींना छेद देणारे संशोधन खुद्द ज्योतिषशास्त्र या विषयातच झालेले आहे.)

मंगळ व त्याच्याशी निगडित प्रथा

मंगळ असलेल्या लोकांच्या संदर्भात निरीक्षण नोंदविताना प्रोफेसर विनोद कुमार शर्मा यांनी नमूद केले की, मंगळाच्या लोकांना त्यांच्या जोडीदारावर आपल्या प्रभावामुळे काही अशुभ संकट येण्याची भीती असते, त्यामुळे ज्योतिषी अनेकदा त्यांना मंगळ असणाऱ्याशीच लग्न करण्याचा सल्ला देतात, किंवा एखाद्या झाडाशी किंवा निर्जीव वस्तूशी प्रतिकात्मक लग्न करण्याचा सल्ला देतात, त्यामुळे भविष्यातील कोणतेही अनिष्ट त्या प्रतिकात्मक ‘पती ‘वर जाते, असे मानले जाते. प्रोफेसर शर्मा यांच्या म्हणण्यानुसार हा नियम स्त्री-पुरुष या दोघांसाठी लागू आहे. या प्रक्रियेत स्त्रिया या मातीच्या मडक्याशी विवाह करतात किंवा पिंपळाला पुरुष मानून त्याच्याशी विवाह करतात. तर पुरुष हे बोर किंवा बासूती या झाडाशी स्त्री म्हणून लग्न करतात. उद्देश एकच आपल्याला मंगळ असल्याने आपल्या जोडीदारावर येणारे अरिष्ट त्या मडक्यावर किंवा झाडावर जाते. या प्रतिकात्मक विवाहानंतर त्यांचा विवाह खऱ्या जोडीदाराशी लावण्यात येतो. हा जोडीदार मंगळाचा नसला तरी चालतो, असे काही ज्योतिषी मानतात.

ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे की, मंगळ या ग्रहाच्या प्रभावाखाली जन्माला आलेली व्यक्ती महत्वाकांक्षी, स्वतंत्र, साहसी मानली जाते. कुंडलीत लाभदायक मंगळ नेहमीच सहनशक्ती, आत्मविश्वास, सामर्थ्य, धैर्य, उत्कृष्ट आयोजन क्षमता, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि दृढ निश्चय शक्ती यासारखे उत्तम गुण देतो. कुंडलीतील कमकुवत मंगळ नकारात्मक प्रभाव दाखवू शकतो. त्यामुळे व्यक्ती तापट, भांडखोर, क्रूर होण्याची शक्यता असते. आजपर्यंत झालेले बहुसंख्य मोठे नेते, पराक्रमी योध्ये, संशोधक यांच्यावर मंगळाचा प्रभाव होता. त्यामुळे ज्यांचा या शास्त्रावर विश्वास आहे त्यांनी पत्रिकेला मंगळ असल्यास त्याचा बाऊ न करता, त्या मंगळाच्या ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करण्यावर भर देणे अधिक श्रेयस्कर ठरते.

आणखी वाचा: विश्लेषण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या राजदंडावर नंदीसोबत लक्ष्मी कशासाठी?

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले आहे ?

सर्वोच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, केंद्र सरकारतर्फे उपस्थित होते, उच्च न्यायालयाचा आदेश “त्रासदायक” असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती केली. “ज्योतिष हे एक शास्त्र आहे. मंगळाच्या आधारे लग्न ठरवावे की नाही, यावर कोणीही प्रश्न चिन्ह निर्माण करत नाहीत. परंतु न्यायालयाने अशा प्रकारच्या अर्जाचा विचार खरंच करणे गरजेचे आहे का ? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.” असा युक्तिवाद मेहता यांनी केला. पीडित महिलेच्या वकिलांनी या याचिकेसाठी दोन्हीकडच्या पक्षांची संमती असल्याचे नमूद केले. ज्योतिष या विषयाकडे शास्त्र म्हणून पाहिले जावे, हेही त्यांच्याकसून नमूद करण्यात आले आहे. यावर न्यायमूर्ती धुलिया यांनी टिप्पणी करताना म्हटले की, याचा खगोलशास्त्राशी किंवा ज्योतिषशास्त्राशी काय संबंध आहे, यावर न्यायालय चर्चा करू इच्छित नाही. त्यावर न्यायालयाचे काहीही म्हणणे नाही. न्यायालय लोकभावनेचा आदर करते. परंतु, येथे न्यायालयाचा संबंध या समस्येच्या मूळ विषयाशी आहे. मूलतः केवळ त्या व्यक्तीला मंगळ आहे, म्हणून नाकारणे हे चुकीचे आहे. मुळात हे प्रकरण बलात्कार म्हणून नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे बलात्काराचे प्रकरण म्हणूनच त्याचा विचार केला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.