Pakistani Umpire Asad Rauf Death: ICC खास पॅनेलचा महत्त्वाचा स्तंभ, माजी पाकिस्तानी पंच असद रौफ यांचे ६६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पाकिस्तान क्रिकेट संघात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून रौफ यांची कारकीर्द सुरु झाली होती. यानंतर ७१ प्रथम श्रेणी सामन्यात ३४२३ धावा व अ श्रेणीच्या ४० सामन्यांमध्ये ६११ धावांचा रेकॉर्ड नावे करून पुढे रौफ यांनी पंच म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी पंच असद रौफ यांचे भारतीय क्रिकेट संघाशीही जवळचे संबंध होते. आयपीएलमध्ये ४० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली होती. प्रदीर्घ व यशस्वी कारकीर्द असणाऱ्या रौफ यांचे उतरत्या वयातील दिवस फार सुगीचे नव्हते. भारतीय मॉडेलने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यांनतर त्यांच्या करिअरला एकाप्रकारे उतरती कळा लागली होती. असद रौफ यांच्या करिअरच्या चढउतारांवर एक नजर टाकुयात..

भारतीय मॉडेलने केला होता लैंगिक शोषणाचा आरोप

२०१२ मध्ये मुंबईस्थित मॉडेल लीना कपूर यांनी पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लगावले होते. अगोदरच विवाहित व दोन आपत्य असणाऱ्या रौफ यांनी यांनी लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी अनेक महिने शारीरिक संबंध ठेवले होते अशी तक्रार लीना कपूर या मॉडेलने पोलिसांकडे दाखल केली होती.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Hyundai Motor Company, South Korea, PT Adaro Minerals Indonesia Tbk, agreement, aluminium supply
विश्लेषण :`के-पॉपʼ चाहत्यांसमोर ह्युंदाईचे लोटांगण? इंडोनेशियाबरोबर ॲल्युमिनियम करार का रद्द झाला?
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

श्रीलंकेत रौफ व लीना यांची भेट झाली. इंडियन प्रीमियर लीग नंतरच्या वारंवार भारत भेटी दरम्यान ते जवळ आले,असे लीना यांनी लेखी तक्रारीत म्हंटले होते. नातेसंबंधाचा पुरावा म्हणून मॉडेलने पंचांसह तिचे फोटोदेखील सादर केले होते. हे फोटो खरे असल्याचे रौफ यांनी मान्य केले मात्र अशाप्रकारे कोणतेही वचन दिल्याचे दावे त्यांनी खोडून काढले.

रौफ यांनी लीना यांच्यावर पलटवार करताना ती फक्त फुकट प्रसिद्धीसाठी असे खोटे आरोप करत आहे, भारतात हे असेच होते अशा शब्दात आपल्यावरील आरोपांचे खंडन केले होते. आरोप खरे असते तर मी आयपीएलसाठी भारतात गेलो नसतो असेही ते पुढे म्हणाले होते. विशेष म्हणजे हे प्रकरण पुढे पेटत असताना लीना यांनी आपली तक्रार मागे घेतली होती. तसेच तिने आपली माफी मागितली असेही रौफ यांनी पाकिस्तानी वाहिनीवरील मुलाखतीत सांगितले होते.

शेवटच्या काळात विकत होते शूज

माजी आयसीसी एलिट अंपायर असद रौफ यांनी उतरत्या वयात पाकिस्तानच्या लाहोर मधील बाजारात कपडे आणि शूजचे दुकान उघडले होते. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी याविषयी सांगितले की, मला क्रिकेटमध्ये अधिक रस नाही आणि हे दुकानही स्वत:साठी नव्हे तर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चालवत आहे. मी माझे आयुष्य पंच म्हणून काम करताना घालवले. अनेक देशांना भेटी दिल्या. माझ्या आयुष्यात असे काही राहिले नाही जे मी केले नाही, असेही ते पुढे म्हणाले

स्पॉट फिक्सिंगचे आरोप

आयपीएल २०१३ मध्ये, बीसीसीआयने सट्टेबाजांशी संपर्क आणि सट्टेबाजांकडून भेटवस्तू घेण्याच्या आरोपांवरून स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात रौफ यांच्यावर आरोप केले होते. तर पुढे २०१६ मध्ये बीसीसीआयने रौफ यांना भ्रष्ट पद्धती आणि खेळात व्यत्यय आणल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर बंदी घातली होती. बीसीसीआयने २०१६ मध्ये निवेदन जारी करून सांगितले होते की, ” असद रौफ यांच्यावर अंपायरिंग किंवा क्रिकेट खेळण्यापासून किंवा कोणत्याही स्वरूपात क्रिकेटचे प्रतिनिधित्व करण्यापासून किंवा कोणत्याही प्रकारे बोर्ड आणि त्याच्या संलग्न संस्थांच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पाच वर्ष बंदी घालण्यात आली आहे”.

असद रौफ यांच्या करिअरचे काही खास क्षण

रौफ यांनी ६४ कसोटी (४९ मैदानी पंच म्हणून आणि १५ टीव्ही पंच म्हणून), १३९ एकदिवसीय आणि २८ टी-२० सामन्यांमध्ये पंच म्हणून कामगिरी बजावली होती. तसेच आयपीएल सामन्यांसह ४० प्रथम श्रेणी सामने, २६ लिस्ट ए सामने अशा एकूण ८९ टी-२० सामन्यांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. २००६ मध्ये ICC च्या एलिट पॅनेलमध्ये त्यांना पदोन्नती देण्यात आली आणि पुढील सात वर्षांत रौफ जागतिक आणि पाकिस्तानच्या सर्वात प्रमुख पंचांपैकी एक ठरले होते.

दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीज राजा यांनी ट्विट करून माहिती दिली. “असद रौफ यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. केवळ एक चांगला पंच नव्हे तर त्यांच्या मिश्किल व मस्तमौला स्वभावाने प्रत्येक भेटीत माझ्या चेहऱ्यावर हास्य कायम असायचे” असे म्हणत रमीज यांनी रौफ यांच्या आठवणींना उजाळा दिला. रमीज यांच्यासह अन्यही पाकिस्तानी क्रिकेट क्षेत्रातील दिग्जजांनी रौफ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.