संघाने २०४७ पर्यंत अखंड भारताचे लक्ष्य निश्चित केले आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अखंड भारत दिनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात रविवारी म्हटलं. अखंड भारत निर्माण करण्यासाठी त्याग, समर्पण आणि बलिदानाची तयारी ठेवायला हवी. आज भलेही संपूर्ण भारतातील (अखंड भारत) जल, जमीन, जंगल, प्राणी यावर आपला हक्क नाही, पण उद्या तो आपल्याकडे असेल. लोक अखंड भारताबाबत बोलतात, पण त्याबाबत त्यांच्या मनात भीती असते, ती काढून टाकल्यास अखंड भारत होईल, असं भागवत यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटलं. भारताने स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अखंड भारत हा विषय संघाच्या माध्यमातून तसेच हिंदुत्ववादी संघटनाच्या माध्यमातून चर्चेत आल्याचं पहायला मिळत आहे. मात्र अखंड भारत म्हणजे नेमकं काय? यामध्ये कुठून कुठपर्यंतचा प्रांत येतो? नेमके किती देश या ‘अखंड भारता’मधून जन्माला आले आहेत? याबद्दल अनेकांना माहिती नसते. त्याचवर या लेखामधून टाकलेली नजर…

नक्की वाचा >>  विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली? जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण

इंग्रजांनी भारतावर २०० वर्ष राज्य केल्यानंतर भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं. आज जो भारत आपण पाहतो तो अनेक शतकांपूर्वी असा नव्हता. त्याचे आकारमान हे आतापेक्षा फार मोठे होते. आज आपल्या शेजारी असणारे अनेक देश हे भारताचाच भाग होते असं मानलं जातं. मात्र नंतर हळूहळू हे प्रांत वेगळे देश म्हणून अस्तित्वात आले. इंग्रजांच्या राजवटीमध्ये भारताचे सर्वाधिक वेळा विभाजन झालं असं सांगितलं जातं.

Narendra Modi on elon musk
“पैसा कोणाचाही लागो, घाम माझ्या देशातील…”, एलॉन मस्क भारतात येण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Sharad Pawar accused Narendra Modi of silence on China encroachment
चीनच्या अतिक्रमणावर मोदींचे मौन; शरद पवार यांचा आरोप
india-pakistan
विश्लेषण : भारत-पाकिस्तान व्यापार पाच वर्षांनी सुरू होणार? जाणून घ्या तेव्हा व्यापार ठप्प होण्याची काय होती कारणं?

ऐतिहासिक संदर्भ सांगायचं झालं तर भारतीय उपखंड हा प्रदेश हा मानवी वसाहत असणाऱ्या जगातील सर्वात प्राचीन प्रदेशांपैकी एक मानला जातो. हा देश पूर्वी ऋषीमुनींचा देश म्हणून ओळखला जायचा. अडीच हजार वर्षांपूर्वी या प्रांतावर इतर प्रांतातील लोकांनी पहिल्यांदा हल्ला केल्याचे पुरावे सापडतात. यामध्ये खास करुन फ्रेंच, डच, कुर्दीश, यवन यूनानी आणि इंग्रज आक्रमकांचा समावेश होता. पुढे याच राजवटींनी भारताच्या अखंड भूमीचे विभाजन केले असं म्हटलं जात. अखंड भारत ही संकल्पना मानणाऱ्या लोकांच्या दाव्यांप्रमाणे भारताचे आतापर्यंत २४ वेळा विभाजन झालं आहे. म्हणजेच अखंड भारतामधून २४ राष्ट्रांची निर्मिती झाल्याचा दावा केला जातो.

नक्की वाचा >> विश्लेषण : दादाभाई नौरोजीच्या लंडनमधील घराला ‘ब्लू प्लाक’ सन्मान; जाणून घ्या या सन्मानाचं ऐतिहासिक महत्त्व काय

वैदिक पुराणांमध्ये काय वर्णन आहे?
पुराणांनुसार पृथ्वीवर जम्बू, प्लक्ष, शाल्म, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर नावाचे सात द्वीप होते. या सात द्विपांच्या मध्यभागी जम्बू द्वीप होतं. त्याचे नऊ खंड आहेत. नाभि, किम्पुरुष, हरितवर्ष, इलावृत, रम्य, हिरण्यमय, कुरु, भद्राश्व आणि केतुमाल. या आठ खंडांमधील नाभिखंडला नंतर अजानभखंड आणि त्यांनतर भारतवर्ष या नावाने संबोधलं जाऊ ळागलं. भारताचं नाव महाराज नाभि यांचे पुत्र ऋषभदेव यांचा मुलगा चक्रवर्ती सम्राट भरत यांच्या नावावरुन ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं. प्राचीन काळी भारताच्या सीमा इराण, अफगाणिस्तानमधील हिंदूकुश पर्वतांपासून अरुणाचल पर्यंत आणि काश्मीरपासून श्रीलंका, म्यानमार, थायलंड आणि इंडोनेशियापर्यंत होत्या असं म्हटलं जातं.

कशाप्रकारे झालं भारताचं विभाजन?

इराण आणि अफगाणिस्तान : एकेकाळी इराण आणि अफगाणिस्तान भारताचाच भाग होता असं म्हटलं जातं. इतिहासकारांच्या दाव्यांनुसार इराण आधी एक पारस्य देश मानला जायचा. पारस्य देश म्हणजे सिंधू नदीच्या पलीकडील प्रांतामध्ये असणारा देश. हा देश आर्यांनीच वसवल्याचं म्हटलं जातं. प्राचीन गांधार आणि कंबोज सम्राजामधील प्रांतालाच आज अफगाणिस्तान म्हटलं जातं. महाभारत काळात गांधार येथे शकुनीचं राज्य होतं. या पूर्ण क्षेत्रामध्ये हिंदू आणि पारसी राजवंशाची सत्ता होती. सातव्या शतकानंतर या ठिकाणी अरब आणि तुर्कीमधील मुस्लिमांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली. इसवी सन ८७० मध्ये अरब सेनापती याकूब एलेसने अफगाणिस्तानला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलं. भारताची आताची मूळ भूमी त्यावेळी इंग्रजांच्या ताब्यात होती त्यावेळीही अफगाणिस्तान भारताचाच भाग समजला जायचा. ब्रिटिशांनी त्यांच्या सत्ता काळात १८३४ मध्ये अफगाणिस्तानला एक बफर स्टेट म्हणून जाहीर केलं. त्यानंतर १८ ऑगस्ट १९१९ मध्ये हे राज्य भारतापासून वेगळं करण्यात आलं.

नक्की वाचा >> विश्लेषण : लोकांनी बँकांमधून पैसे काढू नयेत म्हणून चिनी सरकारने बँकांबाहेर तैनात केले रणगाडे? चीनमध्ये नेमकं चाललंय तरी काय?

नेपाळ : भारताचं नेपाळसोबत खास नातं आहे. याचं वर्णन अनेक पौराणिक कथांमध्ये आढळून येतं. यानुसार नेपाळला देवघर म्हटलं जातं. प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता मातेचा जन्म झालेलं ठिकाण मिथिला हे नेपाळमध्येच आहे. नेपाळमध्ये इसवी सनपूर्व १५०० मध्ये हिंदू आर्यांचं राज्य होतं. इसवी सन २५० मध्ये हा प्रांत मौर्य सम्राज्याचा एक भाग होता. त्यानंतर चौथ्या शतकामध्ये गुप्त सम्राज्यामध्ये या प्रांताचा समावेश हता. सातव्या शतकामध्ये येथे तिबेटमधील सम्राटांनी ताबा मिळवला. ११ व्या शतकामध्ये नेपाळमध्ये ठाकुरी वंशांचे राजे राज्य करायचे. त्यानंतरही वेगवेगळ्या राजांनी या भूमीवर राज्य केलं. इतिहासकारांच्या दाव्यांनुसार पृथ्वी नारायण शाह यांनी १७६५ मध्ये नेपाळला राष्ट्र म्हणून एकत्र आणण्याची मोहीम सुरु केली. त्यांनी मध्य हिमायलायच्या आसपासच्या ४६ हून अधिक संस्थाने आणि राज्यांना एकत्र करुन १७६८ मध्ये या विखुरलेल्या राज्यांना एक समान ओळख मिळून दिली. याच प्रांताला आज नेपाळ म्हणतात. १९०४ मध्ये नेपाळला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली.

नक्की वाचा >> विश्लेषण : राऊतांच्या घरात साडेअकरा लाख तर अर्पिताच्या घरात सापडले ५० कोटी; कायद्यानुसार घरात किती रोख रक्कम आणि सोनं ठेवता येतं?

भूतान : भूतान हा देश सुद्धा एकेकाळी भारताचाच भाग होता असं मानलं जातं. या देशाचं नाव संस्कृतमधील भू-उत्थान म्हणजेच उंचावरील जमीन अशा अर्थाच्या शब्दापासून पडल्याचं सांगितलं जातं. ब्रिटिश कालावधीमध्ये येथे १९०७ साली राजेशाही राजवट सुरु झाली. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९४९ साली भारत आणि भूतानमध्ये एक करार झाला. या करारानुसार भारताने भूतानला ब्रिटिशींनी ताब्यात घेतलेली सर्व जमीन परत केली.

तिबेट : तिबेटचा प्रांत मागील काही वर्षांपासून पुन्हा वादाचा विषय ठरत आहे. मात्र या प्रातांशी भारताचं मागील अनेक शतकांपासून नातं असल्याचं सांगितलं जातं. या भाग पूर्वी अखंड भारताचाच भाग होता असं म्हटलं जातं. प्राचीन काळी या प्रांताला त्रिविष्टप असं म्हटलं जायचं. या ठिकाणी रिशिका आणि तुशारा नावाची दोन राज्यं होती. त्यावेळी हा भाग देवलोकाचा असल्याचं मानलं जायचं. आर्य येथी मूळ निवासी असल्याचीही एक मान्यता आहे. या ठिकाणी आधी हिंदू धर्माचा पगडा अधिक होता. नंतर येथील बऱ्याच लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचं म्हटलं जातं. आधी या ठिकाणी शाक्य वंशाच्या राजांचं सम्राज्य होतं. त्यांची या ठिकाणी इसवी सन १२०७ पासून सत्ता होती. त्यानंतर चीनने या प्रांतावर ताबा मिळवला. १९ व्या शतकापर्यंत तिबेटने आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवलं. मात्र १९०७ साली ब्रिटीश भारत आणि चीनदरम्यान झालेल्या एका बैठकीमध्ये या प्रांताचे दोन तुकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामधील पूर्वेकडील भाग हा चीनकडे गेला. तर दक्षिणेकडील भाग लामांच्या ताब्यात राहीला. १९५१ मध्ये या प्रांताला स्वतंत्र प्रांत म्हणून जाहीर करण्यात आलं.

नक्की वाचा >> विश्लेषण : चीन आणि तैवानचं युद्ध झाल्यास भारताला बसणार मोठा फटका; स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज, एसी महागणार

बंगलादेश : भारताचा शेजारी देश असणारा बांगलादेश हा पूर्वी बंगाल प्रांताचा भाग होता. या प्रांतावर अनेकदा परकीय आक्रमकांनी हल्ले केले. इसवी सन ६३८ पासून ७११ पर्यतच्या ७४ वर्षांच्या कालावधीमध्ये बंगलादेशवर ९ आक्रमकांनी १५ वेळा हल्ला केला. सातत्याने या प्रांतावर होणाऱ्या हल्ल्यांदरम्यान हिंदू राजा दहिरची ६७९ साली हत्या करण्यात आली. त्यानंतर हा प्रांत इस्लामिक पगडा असणारा प्रांत म्हणून उदयास आला. इतकच नाही तर या हल्लेखोरांनी बलूचिस्तान, मुल्तान, पंजाब आणि काश्मीरवर हल्ले करुन तेथेही इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हा भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला. या भागाला पूर्व पाकिस्तान म्हटलं जायचं. नंतर १९७१ साली भारत आणि पाकिस्तानमध्ये जालेल्या लढाईमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. २६ मार्च १९७१ रोजी पूर्व पाकिस्तानला पश्चिम पाकिस्तानपासून वेगळं करण्यात आलं. या प्रांताला बांगलादेश असं नाव देऊन त्याला नवा देश म्हणून मान्यता देण्यात आली.

पाकिस्तान : विभाजन म्हटल्यावर भारतीयांना सर्वात आधी आठवणारा देश म्हणजे पाकिस्तान. भारत स्वतंत्र झाला त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑगस्ट १९४७ ला पाकिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यात आली. पंजाब आणि सिंध प्रांतातील भागा या विभाजनामध्ये दोन देशांमध्ये वाटला गेला. या विभाजानानंतर फार मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं. भारत आणि पाकिस्तानमध्ये आजही काश्मीर प्रश्नावरुन वाद सुरु आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : कांजण्यांचा संसर्ग की मंकीपॉक्सचा? दोघांची लक्षणं सारखीच मग फरक ओळखायचा कसा? डॉक्टरांचं म्हणणं जाणून घ्या

म्यानमार : भारताचा हा शेजारी देश आधी बर्मा नावानेही ओळखयला जायचा. यापूर्वी त्याला ब्रह्मदेश नावाने ओळखलं जायचं. सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये म्यानमारचा हा प्रांत बौद्ध धर्मियांसाठी महत्वाचं स्थान होतं. तसेच हे एक संस्कृतिक केंद्रही होतं. मात्र ब्रिटिशांनी भारतावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली आणि इसवी सन १८८६ पर्यंत संपूर्ण देश ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. मात्र ब्रिटिशांनी १९३५ मध्ये बारतीय शासन कायद्याअंतर्गत म्यानमारला भारतापासून वेगळं केलं. आजही भारताचे या देशासोबत चांगले संबंध आहेत.

मलेशिया : हा प्रांत मलय प्रायद्वीप म्हणून ओळखला जातो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मूळ भूमीपासून समुद्राकडे एखाद्या शेपटीप्रमाणे जाणारी बेटांची ही रांग आहे. यामध्ये पाच मुख्य देशांचा समावेश आहे. यात मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि कंबोडिया या देशांचा समावेश होतो. इंग्रज मलेशियाला भारताचा भाग मानत नव्हते. त्यामुळेच या प्रांताचा कारभार त्यांनी नेहमीच भारताहून वेगळाच ठेवला. त्यांनी १९५७ साली या देशाला स्वातंत्र्य बहाल केलं.

नक्की वाचा >> विश्लेषण : धर्म केव्हा अस्तित्वात आला? तुर्कस्तानमधील उत्खननात मिळाले पुरावे?

सिंगापूर : याच बेटांच्या पट्ट्याच्या दक्षिणेला असणारा देश म्हणजे सिंगापूर. हा देश आधी मलेशियाचाच भाग होता. नंतर मलेशियापासून वेगळं झाल्यानंतरही या देशांत बरेच अंतर्गत वाद सुरु होते. बराच मोठा संघर्ष केल्यानंतर ९ ऑगस्ट १९६५ रोजी या भागाला वेगळा देश म्हणून मान्यता देण्यात आली.

थायलंड : थायलंड पूर्वी याच बेट समुहाचा हिस्सा होता. प्राचीनकाळी हा सर्व भाग भारताच्या अंतर्गतच येत होता असं मानलं जातं. थायलंडला प्राचीनकाळी श्यामदेश म्हणून ओळखलं जायचं. सन १२३८ मध्ये सुखोथाई राज्याची स्थापना या ठिकाणी झाली. हे पहिलं बौद्ध राज्य असल्याचं मानलं जातं. त्यानंतर १७८२ मध्ये बँकॉकमध्ये चक्री राज वंशाचा उदय झाला आणि इथूनच सध्याच्या थायलंडचा म्हणजेच आधुनिक थायलंडचा प्रवास सुरु झाल्याचं मानलं जातं. युरोपीयन देशांविरोधात या देशाने मोठा संघर्ष केला आहे. १९९२ मध्ये झालेल्या सत्तांतरणानंतर या देशामध्ये नवीन संविधानानुसार चालणारी राजेशाही व्यवस्था अंमलात आली.

नक्की वाचा >> विश्लेषण: बिष्णोई गँगकडून सलमानला काळवीट शिकारीवरुन धमकी; पण बिष्णोई समाजासाठी काळवीट एवढं महत्वाचं का?

श्रीलंका : रामायणामुळे हा देश भारतीयांना फारच परिचित आहे. या देशाचं नाव कायम रावणाशी जोडलं जातं. श्रीलंका तेव्हा भारताचाच भाग होता असं म्हटलं जातं. एका मान्यतेनुसार इसवी सनपूर्व ५०७६ मध्ये भगवान श्रीरामाने रावणाचा वध करुन हा प्रांत भारताच्या अधिपत्त्याखाली आणला. मात्र त्यानंतरही या प्रांतासंदर्भातील ऐतिहासिक संदर्भ वेळोवेळी समोर आले आहेत. सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात बौद्धधर्माचा प्रसार झाला. या भाग भारतामधील चोल आणि पांड्य सम्राज्याच्या अंतर्गत यायचा. ब्रिटिश काळामध्ये इंग्रजींनी जेव्हा पेशवाई संपवून सर्व देश ताब्यात घेतला. दुसऱ्या महायुद्धानंतर ४ फेब्रुवारी १९४८ रोजी श्रीलंकेला भारतापासून वेगळं करत एक देश म्हणून मान्यता देण्यात आली.

नक्की वाचा >> विश्लेषण : सक्तवसुली संचालनालय आता मोकाट?

इंडोनेशिया : इंडोनेशिया या देशाची खास बाब ही आहे की हा मुस्लीमबहुल देश असूनही येथील बाली नावाच्या बेटावर आजही बहुसंख्य हिंदू लोक राहतात. रामायण कालावधीमध्ये या ठिकाणी बालीचं राज्य होतं असं मानलं जातं. इंडोनेशियामध्ये सातव्या, आठव्या शतकामध्ये पूर्णपणे हिंदू वैदिक संस्कृती अस्तित्वात होती असं सांगितलं जातं. त्यानंतर या ठिकाणी मोठ्याप्रमाणात बौद्ध धर्माचा प्रसार झाला. अगदी १३ व्या शतकापर्यंत या ठिकाणी बौद्ध धर्म हाच मुख्य धर्म होता. या देशामध्ये श्रीविजय राजवट, शैलेंद्र राजवट, संजय राजवट, माताराम राजवट, केदिरि राजवट, सिंहश्री, मजापहित सम्राज यांची सत्ता होती. त्यानंतर हळूहळू या प्रांतामध्ये अरब व्यापाऱ्यांनी येण्यास सुरुवात केली. त्यानंतर इथं इस्लामचा वेगाने प्रसार झाला. त्यानंतर हा देश डच लोकांच्या ताब्यात गेला. ३५० वर्ष या बेटवाज देशावर वर्चस्व निर्माण केल्यानंतर १७ ऑगस्ट १९४५ रोजी नेदरलॅण्डने या देशाला स्वातंत्र्य बहाल केलं.

नक्की वाचा >> विश्लेषण: मुंबई- दिल्ली इलेक्ट्रिक हायवेची योजना, गडकरींनी दिले संकेत; पण ‘इलेक्ट्रिक हायवे’ म्हणजे नेमकं काय?

कंबोडिया : हा देशही पूर्वी भारताचा भाग होता असं मानलं जातं. प्राचीन काळात या प्रांताला कंपूचिया नावाने ओळखलं जायचं. या देशाची स्थापना ब्राह्मणांनी केली होती असं सांगितलं जातं. पहिल्या शतकामध्ये कौंडिन्य नावाच्या एका ब्राह्मणाने सध्याच्या भारतीय उपखंडाबरोबरच चीनमध्ये हिंदू राज्याची स्थापना केली होती असं मानलं जातं. त्याच राज्यामध्ये या प्रांताचाही समावेश होता. १९५३ साली या देशाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळालं.

व्हिएतनाम : व्हिएतनामला पूर्वी चम्पा नावाने ओळखलं जायचंय. येथील लोकांना चाम नावाने ओळखलं जायचंय. काळानुरुप येथील स्थानिकांची संख्या कमी होत गेली. सध्याच्या घडीला चाम लोक हे व्हिएतनाम आणि कंबोडियामध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारे अल्पसंख्यकांचा समूह आहे. पूर्वी या ठिकाणी राहणारे लोक शैव म्हणजेच भगवान शंकराला मानणारे होते. मात्र नंतर इथे मुस्लीम आक्रमकांनी ताबा मिळवला आणि येथील चाम लोकांनाही मुस्लीम धर्म स्वीकारला. १८२५ मध्ये चम्पामधील हिंदू सम्राज्याचा अस्त झाला. तेव्हापासून हा भाग फ्रान्सच्या ताब्यात होता.