मागील काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन या दोन देशांत युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने काही दिवसांतच रशियाला समर्थन देणाऱ्या युक्रेनच्या काही भूभागावर नियंत्रण मिळवलं होतं. आता हा भाग रशिया जोडण्यासाठी येथे सार्वमत घेण्याची तयारी सुरू आहे. सार्वमत घेतल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन युक्रेनचा सुमारे १५ टक्के भूभाग औपचारिकपणे रशियाला जोडण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांमध्ये चिंता वाढली आहे.

पाश्चिमात्य देश पुतीनला रोखू शकतात का?
युक्रेनने रशियाला युद्धभूमीवर पराभूत करावं, असे अमेरिकेसह त्यांच्या मित्र राष्ट्रांना वाटतं. त्यासाठी अत्याधुनिक शस्त्रे पुरवून पाश्चिमात्य देश युक्रेनला मदत करत आहेत. पण नाटो सैन्य अद्याप युक्रेनच्या मदतीला युद्धभूमीत उतरलं नाही. पुतीन यांनी युक्रेनचा भूभाग रशियाला जोडल्यास अमेरिकेसह इतर सहयोगी देश रशियावर अतिरिक्त आर्थिक निर्बंध लादण्यास तयार आहेत, असं व्हाइट हाऊसने आधीच जाहीर आहे. यापूर्वीही अमेरिकेनं अशा प्रकारे रशियावर आर्थिक निर्बंध लादली होती. मात्र, याचा फारसा परिणाम झाला नाही. जोपर्यंत भारत आणि चीन रशियन तेलावर काही प्रमाणात निर्बंध लादत नाही, तोपर्यंत अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या आर्थिक नाकाबंदीचा रशियावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.

President Muizzu party secures big win in Maldive
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष विजयाच्या समीप; चीनधार्जिण्या मोइझ्झू यांच्या पक्षाला ‘मजलिस’मध्ये सर्वाधिक जागा
Paris Olympics Opening ceremony faces major changes
ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
Thailand House of Representatives approves same sex marriage
समलैंगिक विवाहाला आता थायलंडमध्येही मान्यता… हा प्रवास आव्हानात्मक कसा ठरला?

पाश्चिमात्य देश युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रे पाठवत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अलीकडेच सांगितलं की, त्यांच्या देशाला अमेरिकेकडून नॅशनल अॅडव्हान्स्ड सरफेस-टू-एअर मिसाइल सिस्टम (NASAMS) म्हणून ओळखली जाणारी अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली देण्यात आली आहे. रशियानं ढोंगीपणाने सार्वमत घेण्याचा प्रयत्न केला तर भविष्यातील शांततापूर्ण चर्चेस मुकावं लागेल, अशा इशारा झेलेन्स्की यांच्याकडून वारंवार दिला जात आहे.

युक्रेनचा कोणता भूभाग रशियाला जोडला जाईल?
युक्रेनचा सुमारे १५ टक्के भाग रशियाला जोडण्याची योजना पुतीन यांनी आखली आहे. यातील बहुतांशी ठिकाणी रशियन सैन्याचं नियंत्रण आहे. मात्र, डोनेस्कमधील ३ टक्के भूभागावर अद्याप युक्रेन सैन्यांकडून चिवट लढा दिला जात आहे. यासोबतच डोनबास हा पूर्व युक्रेनचा एक मोठा भूभाग रशियाला जोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. येथे सर्वाधिक रशियन भाषिक नागरिक राहतात.

२४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी राष्ट्रध्यक्ष पुतीन यांनी ‘डोनबास’ प्रदेश स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केलं होतं. तसेच खेरसन आणि झापोरिझ्झिया हे दोन प्रदेशही रशियाला जोडण्यात येणार आहेत. युक्रेनपासून वेगळे होण्यासाठी या भागात २०१४ सालीच सार्वमत घेण्यात आले होते. हे दोन्ही प्रदेश रशियाच्या नियंत्रणात आहे. सार्वमत चाचणीनंतर रशिया युक्रेनचा ९० हजार चौरस किमीचा भूभाग जोडून घेणार आहे. हा भूभाग हंगेरी किंवा पोर्तुगाल देशांच्या क्षेत्रफळाएवढा आहे.

भूभाग जोडण्याची औपचारिक प्रक्रिया कधीपर्यंत पार पडेल?
सार्वमत चाचणी पार पडल्यानंतर युक्रेनमधील रशियन समर्थक नेते आम्हाला रशियात समाविष्ट करून घ्या, असा प्रस्ताव पुतीन यांना पाठवू शकतात. त्यावर पुतीन तातडीनं स्वाक्षरी करतील आणि अत्यंत जलद गतीने ही सर्व प्रक्रिया पार पडू शकते.

कारण २७ फेब्रुवारी २०१४ रोजी रशियन सैन्याने रशियन बहुसंख्य असलेल्या क्रिमियाचा ताबा घेतला होता. येथे १६ मार्च रोजी सार्वमत घेण्यात आलं. ज्यामध्ये ९७ टक्के जनतेनं रशियात सामील होण्याच्या बाजुने कौल दिला. यानंतर २१ मार्च २०१४ रोजी औपचारिकपणे क्रिमियाचा रशियात समावेश करण्यात आला होता. म्हणजेच क्रिमियावर ताबा घेतल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यामुळे युक्रेनचा हा १५ टक्के भूभागही जलद गतीने रशियाला जोडला जाण्याची शक्यता आहे.

१७ टक्के नागरिकांनी स्वत:ची ओळख रशियन सांगितली
दुसरीकडे, २००१ साली युक्रेनमध्ये झालेल्या जनगणनेनुसार, येथील १७ टक्के लोकांनी आपली ओळख रशियन असल्याची सांगितली आहे. तर ७८ टक्के नागरिकांनी स्वत:ची ओळख युक्रेनियन असल्याचं म्हटलं आहे. युक्रेनियन ही या देशातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून दुसऱ्या क्रमांकावर रशियन भाषा बोलली जाते.