मागील काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन या दोन देशांत युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने काही दिवसांतच रशियाला समर्थन देणाऱ्या युक्रेनच्या काही भूभागावर नियंत्रण मिळवलं होतं. आता हा भाग रशिया जोडण्यासाठी येथे सार्वमत घेण्याची तयारी सुरू आहे. सार्वमत घेतल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन युक्रेनचा सुमारे १५ टक्के भूभाग औपचारिकपणे रशियाला जोडण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांमध्ये चिंता वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाश्चिमात्य देश पुतीनला रोखू शकतात का?
युक्रेनने रशियाला युद्धभूमीवर पराभूत करावं, असे अमेरिकेसह त्यांच्या मित्र राष्ट्रांना वाटतं. त्यासाठी अत्याधुनिक शस्त्रे पुरवून पाश्चिमात्य देश युक्रेनला मदत करत आहेत. पण नाटो सैन्य अद्याप युक्रेनच्या मदतीला युद्धभूमीत उतरलं नाही. पुतीन यांनी युक्रेनचा भूभाग रशियाला जोडल्यास अमेरिकेसह इतर सहयोगी देश रशियावर अतिरिक्त आर्थिक निर्बंध लादण्यास तयार आहेत, असं व्हाइट हाऊसने आधीच जाहीर आहे. यापूर्वीही अमेरिकेनं अशा प्रकारे रशियावर आर्थिक निर्बंध लादली होती. मात्र, याचा फारसा परिणाम झाला नाही. जोपर्यंत भारत आणि चीन रशियन तेलावर काही प्रमाणात निर्बंध लादत नाही, तोपर्यंत अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या आर्थिक नाकाबंदीचा रशियावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia plans to annex 15 percent ukraine land vladimir putin volodymyr zelensky russia ukraine war rmm
First published on: 27-09-2022 at 15:59 IST