Can Sanitary Pads Cause Cancer In Women: मासिक पाळी हा स्त्री जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मासिक पाळीच्या सुरक्षेबाबत आजवर अनेक तज्ज्ञांनी भाष्य केले आहे मात्र अजूनही अनेक महिला सुरक्षेची बाब गांभीर्याने घेत नाहीत. काही घरांमध्ये अजूनही मासिक पाळीत कापड वापरले जाते तर काही महिला सॅनिटरी नॅपकिन वेळोवेळी बदलण्यात टाळाटाळ करतात. सॅनिटरी पॅड्सचा वापर हा सोयीस्कर असला तरी त्यामुळ आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल अनेक तज्ज्ञांनी भाष्य केले आहे. आता याच बाबतीत समोर आलेल्या एका नवीन अभ्यासामुळे महिलांच्या आरोग्यावर प्रश्न उभारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडेच एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून झालेल्या अभ्यासानुसार, बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक सॅनिटरी पॅडमध्ये विषारी रसायने असतात ज्यामुळे वंध्यत्व आणि कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. छोट्या प्रमाणावरील चाचणीच्या आधारे, या संस्थेला दहापैकी दहा नमुन्यांमध्ये phthalates आणि volatile organic compounds (VOC) ची उपस्थिती आढळली. यापूर्वी झालेल्या अभ्यासात पॅड बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या phthalates सारख्या इतर रासायनिक पदार्थांमुळे पॅडची लवचिकता, शोषण क्षमता आणि टिकाऊपणा वाढवते. पॅडमधील Phthalates शरीरात रसायने शरीरात शोषली जाऊ शकतात यामुळे कर्करोगाचा धोका बळावतो.

व्हीओसी हे एक असे हानिकारक रसायन आहेत जे रंगाच्या, लाकडाच्या सुरक्षेसाठी, एरोसोल स्प्रे आणि कीटकांपासून बचाव करण्यासाठी वापरले जाते. व्हीओसीच्या संपर्कात आल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तसेच हे रसायन कर्करोगास कारणीभूत असल्याचीही शक्यता आहे.

कर्करोग आणि सॅनिटरी पॅड

सीके बिर्ला हॉस्पिटल (आर), गुरुग्राम येथील प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग तज्ज्ञांनी इंडिया टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षात गर्भाशयाच्या, एंडोमेट्रियल आणि योनीमार्गाच्या कर्करोगांमध्ये वाढ होत आहे. योनी, व्हल्व्ह आणि गर्भाशयाच्या मुखाचे कर्करोग हे मुख्यतः एचपीव्ही विषाणूमुळे होतात. तसेच साधारणतः ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्करोगाची शक्यता अधिक असते. मात्र सॅनिटरी पॅड्समधील हानिकारक रसायनांमुळे कर्करोग होतो हे अद्याप सिद्ध झालेले नाही. खरं तर कर्करोगाची अनेक कारणे असू शकतात पण त्यात सॅनिटरी पॅडचा वापर हे एक कारण असू शकते.

मासिक पाळीत काय खबरदारी घ्यावी?

  1. पॅड किंवा इतर स्वच्छता उत्पादने वापरण्यापूर्वी आणि नंतर हात नीट स्वच्छ करा.
  2. दर तीन ते चार तासांनी पॅड बदलणे आणि दिवसातून एकदा मासिक पाळीचा कप बदलणे गरजेचे आहे
  3. सुगंधित आणि जास्त प्रमाणात रासायनिक प्रक्रिया केलेले पॅड टाळणे
  4. जननेंद्रिय स्वच्छ करण्यासाठी मऊ आणि ऑरगॅनिक उत्पादने वापरा

हे ही वाचा << विश्लेषण: चेहऱ्यावर एकाच जागी सतत पिंपल्स का येतात? पिंपल्समुळे चेहरा काळवंडत असेल तर काय करावे?

दरम्यान या संशोधनाच्या बाबत अचूक निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक अभ्यास आणि सॅनिटरी उत्पादनांमध्ये रसायनांसाठी मानके तयार करण्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. अलीकडे काही महिलांनी मासिक पाळीत पर्यावरणपूरक उत्पादने वापरायला सुरुवात केली आहे मात्र याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. सद्य घडीला फक्त एक तृतीयांश स्त्रिया मासिक पाळीचा कप, कापडी पॅड किंवा टॅम्पॉनस सारखे इतर पर्याय वापरतात. मासिक पाळीचे कप हे वैद्यकीय दर्जाचे सिलिकॉनने बनलेले असतात आणि ते वापरण्यास पूर्णपणे सुरक्षित असतात. मात्र या कपची स्वच्छता राखणे गरजेचे आहे अन्यथा यामुळेही संसर्ग होऊ शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanitary pads period cup tampons are causing cancer in women what precautions should be taken in periods expert advice svs
First published on: 29-11-2022 at 13:42 IST