Savitribai Phule Biography in Marathi : देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (३ जानेवारी) त्यांना आदरांजली वाहिली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, “सावित्रीबाई फुले या महिला सक्षमीकरण आणि शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रातील अग्रणी आहेत. त्यांचे प्रयत्न आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहतील.” सावित्रीबाई फुले यांनी एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या जयंतीनिमित्त काही खास गोष्टी जाणून घेऊया…

हेही वाचा : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा?

art festival organized by Nukkad Cafe BhagyaShali Bhavishya Shiksha Foundation for slum children in Pune
प्रतिकूल वास्तवात राहूनही ‘त्यां’चे भविष्य ‘त्यां’नी असे बघितले…! झोपडपट्टीतील मुलांसाठी आयोजित कला महोत्सवात कल्पनेच्या भरारीचे अनोखे दर्शन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
himachal Pradesh balmaifil article
बालमैफल : अद्भुत निसर्ग
Rajput Gardens
मुघल गार्डन्सची जितकी चर्चा होते, तितकी ‘राजपूत गार्डन्स’ची का होत नाही?
Arvi , Shivaji Primary School, Padma Chaudhary,
अशीही एक ‘मॅडम’ ! घर समजून शाळेचं रुपडंच बदलले
maternity hospital plot for parking Borivali
बोरिवलीत प्रसूतिगृहाच्या भूखंडावर वाहनतळ; प्रसूतिगृहाची प्रतीक्षाच
struggle story of painters daughter Pallavi Chinchkhede passes Indian Administrative Service exam
रंगकाम करणाऱ्याच्या मुलीची संघर्ष कहाणी, आयएएसची उत्तीर्ण…
tabebuia rosea trees bloom along vikhroli highway
टॅब्यूबियाच्या फुलांनी विक्रोळी परिसर बहरला

सावित्रीबाई फुले कोण होत्या?

सावित्रीबाई फुले या माळी समुदायातील महिला होत्या. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील नायगाव या गावी झाला. वयाच्या १० व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचं लग्न झालं, असं इतिहासकार सांगतात. लग्नानंतर त्यांनी पती ज्योतिराव फुले यांच्या घरी आपलं शिक्षण पूर्ण केलं. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना पुण्यातील शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश दिला. आयुष्यभर या दाम्पत्याने एकमेकांना साथ देत समाजातील अनेक बंधने मोडून काढली. ज्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं, त्या काळात फुले दाम्पत्याने मुलींसाठी शिक्षणांची दारं उघडली.

पुण्यात मुलींसाठी उघडली पहिली शाळा

ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या शाळेत मागासवर्गीय आणि दलित मुलींना शिक्षणाचे धडे देण्याचे काम केले. पुण्यातील उच्चभ्रू समाजाने मुलींसाठी आणि ब्राह्मणेतरांसाठी शाळा उघडण्यास तीव्र विरोध केला. जातीय नियम न पाळल्यामुळे राष्ट्रीयत्वाचे नुकसान होईल, असे त्यांना वाटत होते.

मुलींसाठी शाळा सुरू केल्यानंतर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना समाजातूनही तीव्र विरोध सुरू झाला. त्यातच ज्योतिराव यांचे वडील गोविंदराव यांनी दोघांनाही घरातून बाहेर काढले. सावित्रीबाई फुले यांना उच्चवर्णीयांकडून प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. अनेकांनी त्यांना शारीरिक इजा देखील करण्याचा प्रयत्न केला. भिडे वाड्यातील शाळेच्या मुख्याध्यापिका असताना उच्चवर्णीय लोक सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर दगडं, माती आणि शेण फेकत होते. त्यामुळे शाळेत जाताना सावित्रीबाई दोन साड्या घेऊन जात.

फुले यांच्या शाळेत मुलींची संख्या सर्वाधिक

शाळेत पोहचल्यानंतर सावित्रीबाई चिखलाने तसेच शेणाने माखलेली साडी बदलायच्या. परंतु, घरी जाताना काही लोक पुन्हा त्यांच्या अंगावर चिखलफेक करायचे. त्यामुळे घरी आल्यानंतरही सावित्रीबाईंना साडी बदलावी लागत होती. मात्र, या गोष्टीकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही आणि मुलींना शिक्षण देण्याचे काम सुरूच ठेवले. १८५२ मध्ये ‘The Poona Observer states’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असं म्हटलं आहे की, “ज्योतिराव फुले यांच्या शाळेत मुलींची संख्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा दहापट जास्त होती. कारण, त्यांच्या शाळेत मुलींना शिक्षण देण्याची पद्धत सरकारी शाळांमधील पद्धतींपेक्षा वेगळी होती. सरकारी शिक्षण मंडळाने यावर लवकर काही केले नाही तर महिलांना पुरुषांपेक्षा अधिक प्रगती करताना पाहून आपली मान शरमेने खाली जाईल.”

बळवंत सखाराम कोल्हे यांनी लिहिलेल्या आठवणीनुसार, सावित्रीबाई फुले यांच्यावर अनेकदा हल्ले झाले. त्यांच्या अंगावर शेण, चिखल तसेच दगडही फेकण्यात आले. मात्र, त्या अजिबात खचल्या नाही. आपला छळ करणाऱ्या व्यक्तींना सावित्रीबाई म्हणायच्या की, “मी माझ्या सहकारी बहिणींना शिक्षणाचे धडे देण्याचं पवित्र काम करते. त्यामुळे तुम्ही माझ्या अंगावर फेकलेले दगड आणि शेण मला फुलांसारखे दिसतात. देव तुमचं भलं करो.”

समाजसुधारक म्हणून सावित्रीबाईंची भूमिका

सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी भेदभावाचा सामना करणाऱ्या गरोदर विधवा महिलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह (‘भ्रूणहत्या प्रतिबंधक गृह’) सुरू केले. अंदमानमध्ये एका ब्राह्मण विधवा महिलेला तिच्या नवजात मुलाची हत्या केल्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झाली होती. या विधवा महिलेवर एका व्यक्तीने बलात्कार केला होता. महिला गरोदर राहिल्यानंतर त्याने मुलाचा आणि तिचा सांभाळ करण्यास नकार दिला. त्यामुळे विधवा महिलेने नवजात बाळाची हत्या केली होती. ही घटना कानावर पडल्यानंतर फुले दाम्पत्याने बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. याशिवाय त्यांनी विधवा पुनर्विवाह, जातीयवाद, बालविवाह, सती आणि हुंडा प्रथा, यासह इतर सामाजिक विषयांवर आवाज उठवला.

हेही वाचा : विश्लेषण : ‘लाडक्या बहिणीं’च्या अर्जांची पडताळणी कशी होणार? अनेक लाभार्थी अपात्र ठरणार? नाराजी सरकारला परवडणार का? 

सावित्रीबाई फुले यांनी विधवा महिलेचा मुलगा यशवंतराव याला दत्तक घेऊन डॉक्टर होण्यासाठी शिक्षण दिले. १८७३ मध्ये फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून प्रत्येक घटकासाठी खुला मंच तयार केला. जात, धर्म किंवा वर्गाचा भेदभाव न करता सामाजिक समानता आणणे हाच यामागचा प्रमुख उद्देश होता. याचाच विस्तार म्हणून फुले यांनी ‘सत्यशोधक विवाह’ सुरू केला. ज्याअंतर्गत ब्राह्मणी परंपरा नाकारणे, विवाहित दाम्पत्याला शिक्षण देणे आणि समानता वाढवण्याची शपथ घेण्यात आली.

विधवा महिलांसाठी सावित्रीबाईंचे कार्य

ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी गरोदर विधवा महिला आणि बलात्कार पीडित महिलांच्या संरक्षणासाठी बाल संगोपन केंद्र सुरू केली. जातीयवादाच्या भिंती तोडण्याचे आवाहन करून सावित्रीबाईंनी स्त्रियांना सभांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केले.

२८ नोव्हेंबर १८९० रोजी ज्योतिराव फुले यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत सावित्रीबाईंनी पुन्हा सामाजिक परंपरेला आव्हान दिले. हातात मातीचे भांडे घेत सावित्रीबाई अंत्ययात्रेच्या पुढे चालत होत्या. त्यांनी ज्योतिराव फुले यांच्या पार्थिवाला अग्नीही दिला. याआधी अग्नी देण्याचे काम फक्त पुरुषच करत होते. आजही बहुतांश ठिकाणी पुरुषच एखाद्या व्यक्तीच्या पार्थिवाला अग्नी देतात.

सावित्रीबाई फुले यांनी करुणा, सेवा आणि धैर्याचं जीवन जगण्याचे एक अद्वितीय उदाहरण समाजासमोर ठेवलं. १८९६ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ आणि १८९७ च्या बुबोनिक प्लेगच्या महामारीमध्ये मदतकार्य केले. एका आजारी मुलाला रुग्णालयात नेत असताना सावित्रीबाई फुले यांना देखील या रोगाची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

सावित्रीबाई फुले यांची काव्य रचना

सावित्रीबाई फुले यांनी १८५४ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी ‘काव्य फुले’ हा कविता संग्रह प्रकाशित केला होता. १८९२ मध्ये त्यांनी ‘बावनकशी’ सुबोध रत्नाकर हा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित केला. या काव्यसंग्रहांव्यतिरिक्त सावित्रीबाई फुले यांची भाषणं, गीते तसेच पतीला लिहिलेली पत्रंही प्रकाशित झाली आहेत.

Story img Loader