अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठी सारस्वतांचा दरबार यंदा देशाची राजधानी दिल्लीमध्ये भरणार आहे. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. तारा भवाळकर यांची तब्बल सात दशकांनी दिल्लीमध्ये होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने स्वागताध्यक्षपद किती महत्त्वाचे या विषयाचा घेतलेला धांडोळा.

यंदाच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाल्यामुळे प्रांताची ‘सरहद’ ओलांडून यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीमध्ये देशाची राजधानी दिल्ली येथील तालकटोरा मैदानावर होणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणाबरोबरच दिल्लीतील मराठी बांधवांना आणि महाराष्ट्रातून या संंमेलनासाठी दिल्लीला जाणाऱ्या साहित्यप्रेमींना शरद पवार यांच्या भाषणाची मेजवानी मिळणार आहे.

Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
industries minister uday samant proposed bhaskar jadhav to join shinde shiv sena
भास्कर जाधव यांना शिंदे गटाचा थेट प्रस्ताव; रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग
Sharad Pawar , Ajit Pawar, Sharad Pawar latest news,
शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर?
98 akhil bharatiya marathi sahitya sammelan sharad pawar interaction with writers
महाराष्ट्र पूर्वपदावर आणण्यासाठी साहित्यिकांची लेखणी उपयुक्त; शरद पवार यांची अपेक्षा
Eknath Shinde Shivsena Welcomes NCP Congress Leaders in Party
एकनाथ शिंदेंचा शरद पवार व काँग्रेसला दणका, नाशिकमधील मोठ्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…
Tuljabhavani Devi procession of goddess carried out on tiger vehicle
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा

हेही वाचा >>> अल्लू अर्जुनवर का झाला गुन्हा दाखल? प्रीमियरद

स्वागताध्यक्षपदाचे महत्त्व

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्या संमेलनाच्या अध्यक्षांइतकेच स्वागताध्यक्ष पदाला महत्त्व आहे. घरातील मंगल कार्य असेल तर पत्रिकेवर प्रेषक म्हणून वडीलधाऱ्या व्यक्तीचे नाव असते. त्या धर्तीवर साहित्य संमेलनाचे कार्य सिद्धीस नेण्याची जबाबदारी स्वागताध्यक्षपदी निवड झालेली व्यक्ती आपल्या खांद्यावर घेते, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे संमेलनाची संयोजक संस्था उद्योग, साहित्य किंवा राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीची स्वागताध्यक्षपदी निवड करत असते.

हेही वाचा >>> भारतातील पहिली ‘AI-Mom’; सोशल मीडियावर चर्चेत असलेली काव्या मेहरा आहे तरी कोण?

कोण करते निवड?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे असते. त्यामुळे संमेलनाच्या अध्यक्षाची निवड ही साहित्य महामंडळाचे पदाधिकारी करतात. मात्र, स्वागताध्यक्षपदी कोण असावे, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित संमेलनाच्या निमंत्रक संस्थेला दिले आहे. साहित्य महामंडळाची घटना यासंदर्भात सुस्पष्ट असल्याने स्वागताध्यक्ष पदाच्या निवडीबाबत कोणताही हस्तक्षेप केला जात नाही.

कोण असावा स्वागताध्यक्ष?

राजकीय, साहित्य, उद्योग किंवा सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीची संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्याचा प्रघात आहे. साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष हा साहित्य क्षेत्रातील असावा की नाही यासंदर्भात मतमतांतरे दिसून येतात. पण, गेल्या काही वर्षांमध्ये संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राजकीय व्यक्तीची निवड झाली असल्याचे अधोरेखित झाले आहे. राज्य सरकारकडून संमेलनासाठी अनुदान प्राप्त होत असले तरी सारस्वतांची बडदास्त ठेवण्याच्या उद्देशातून येणाऱ्या खर्चाचा डोंगर पेलण्यासाठी, स्थानिक पातळीवर शासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्याची धमक असलेली व्यक्ती अशा विविध उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी संयोजक संस्था स्वागताध्यक्षपदी राजकीय व्यक्तीलाच प्राधान्य देतात.

स्वागताध्यक्षपदाची मांदियाळी

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सात दशकांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या संमेलनाचे साहित्याचे जाणकार असलेले तत्कालीन केंद्रीयमंत्री काकासाहेब गाडगीळ हे स्वागताध्यक्ष होते. आता तब्बल ७० वर्षांनी दिल्ली येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, चिपळूण आणि सासवड अशा चार ठिकाणच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याची संधी लाभलेले शरद पवार यंदा प्रथमच संमेलनाचे स्वागताध्यक्ष झाले आहेत. गेल्या काही वर्षांत मनोहर जोशी (मुंबई), सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), शांताराम पोटदुखे (चंद्रपूर), गोपीनाथ मुंडे (परळी वैजनाथ), दत्ता मेघे (वर्धा), छगन भुजबळ (नाशिक) अशा राजकीय नेत्यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले. पुण्यातील साहित्य संमेलनासाठी पुण्यभूषण फाउंडेशनचे डाॅ. सतीश देसाई आणि पिंपरी-चिंचवड येथील संमेलनासाठी डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पी. डी. पाटील अशा निमंत्रक संस्थेच्या प्रमुखांनीच स्वागताध्यक्षपद भूषविले होते.

दोन साहित्यिक, महिलांना संधी

बृहन महाराष्ट्रात इंदूर येथे झालेल्या संमेलनासाठी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन आणि बडोदा येथे झालेल्या संमेलनासाठी राजघराण्याच्या शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या रूपाने केवळ दोन महिलांना स्वागताध्यक्षपद भूषविण्याची संधी प्राप्त झाली आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असलेल्या कराड येथील संमेलनाचे स्वागताध्यक्ष ‘कोरडी भिक्षा’कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी आणि सांगली येथे झालेल्या संमेलनाचे आधारस्तंभ माजी गृहमंत्री आर. आर. पाटील असले तरी प्रसिद्ध लेखक उत्तम कांबळे यांनी भूषविलेले स्वागताध्यक्षपद अशा दोन साहित्यिकांना हा बहुमान मिळाला आहे.

vidyadhar.kulkarmi@expressindia.com

Story img Loader