Shraddha Walkar Murder Case Bumble: वसईची तरुणी श्रद्धा वालकर हिच्या प्रियकराने दिल्लीत राहत्या घरी तिचा खून केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. सहा महिन्यांपूर्वी श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करून तिचा प्रियकर आफताब पुनावाला याने घरात फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज ते तुकडे तो जंगलात प्राण्यांना खाण्यासाठी फेकायचा. पोलिसांच्या माहितीनुसार श्रद्धा व आफताब हे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. श्रद्धाच्या खुनानंतर आता लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पना पुन्हा एकदा रडारवर आली आहे. भारतीय कायद्यानुसार जरी लिव्ह इन रिलेशनशीप ही मान्यताप्राप्त संकल्पना असली तरी प्रत्यक्ष लिव्ह इन मध्ये राहण्याला अनेकदा कुटुंबातून विरोध केला जातो. लिव्ह इन रिलेशन म्हणजे नेमकं काय व भारतातील कायदे लिव्ह इनचे समर्थन करतात का? हे आज आपण पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिव्ह-इन रिलेशनशिपची कायदेशीर व्याख्या पाहिल्यास, कोणताही वैवाहिक दर्जा नसताना जेव्हा एखादे जोडपे दीर्घ काळासाठी एकत्र राहते व लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणेच वावरते तर याला लिव्ह इन रिलेशन असे म्हंटले जाते. हे नाते रोमँटिक किंवा लैंगिक स्वरूपाचे असू शकते. याला वेळेचे बंधन नाही याचा अर्थ लिव्ह इन रिलेशन हे कायमस्वरूपी सुद्धा असू शकते. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात, विवाह, लिंग आणि धर्माच्या बाबतीत बदलत्या सामाजिक भूमिकांमुळे ही प्रथा पश्चिम युरोप, दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशिया, उत्तर अमेरिकेत प्रचलित झाली आहे.

भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपला कायद्यानुसार विरोध नसला तरी तरी भारतीय दंडसंहितेत लिव्ह इन रिलेशनशिपची कायदेशीर व्याख्या नाही. तसेच लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्याला विशिष्ट अधिकार देणाऱ्या कायद्यांचा अभाव आहे. काही वर्षांपूर्वी एस. खुशबू विरुद्ध कन्निअम्मल आणि एनआर प्रकरणाच्या संदर्भात निर्णय देताना लिव्ह इन रिलेशनशिप धार्मिक आणि पुराणमतवादी समजुतीनुसार अनैतिक मानले जाऊ शकते परंतु ते बेकायदेशीर नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. भारतात लिव्ह इन रिलेशनशिपपेक्षा लग्नाला महत्त्व दिले जाते.

भारतात अद्यापही उघडपणे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचे प्रमाण कमी आहे कारण काळ बदलत असताना शहरी भागात ही प्रथा प्रचलित होत असली तरी समाजमान्यता दिली जात नाही. लिव्ह-इन रिलेशनशिप हे जबाबदारी आणि वचनबद्धता टाळण्याचा मार्ग आहे, मात्र याशिवाय नात्यात बेजबाबदार येऊ शकतो.

विश्लेषण: श्रद्धा आणि आफताब पूनावालाच्या पहिल्या भेटीस कारण ठरलेलं Bumble App नेमकं आहे तरी काय?

लिव्ह इन रिलेशनमधील महिलांचे घरगुती हिंसाचारापासून रक्षण करण्यासाठी २००५ मध्ये कायदेशीर संरक्षण देण्यात आले होते. औपचारिकपणे विवाहित नसलेल्या परंतु पुरुष जोडीदारासोबत राहणाऱ्या महिलांना विवाहाच्या समतुल्य संरक्षण दिले जाते.

कलम २(f) नुसार, लग्न करुन अथवा लग्न न करता एकत्र घरात राहणाऱ्या जोडप्याला लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचा दर्जा दिला जाईल. दिल्ली उच्च न्यायालयाने वर्षा कपूर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात विवाहाप्रमाणेच नातेसंबंधात राहणाऱ्या महिला जोडीदाराला तिचा पती/पुरुष जोडीदार तसेच त्याच्या नातेवाईकांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे.

दरम्यान, सौदी अरेबिया, इराण, पाकिस्तान, मालदीव, यूएई या इस्लामिक देशात लिव्ह इन रिलेशनशिप व्यभिचार मानला जातो. तसेच लिव्ह-इन रिलेशनशिप, समलिंगी संबंध इस्लामिक धर्मग्रंथांतर्गत प्रतिबंधित आहेत. लग्नात संमती महत्त्वाची भूमिका बजावत असली तरी, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये लग्नाआधी नातेसंबंध ठेवणे निषिद्ध मानले जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha walkar murder case aftab poonawala what are laws related to live in relationships in india svs
First published on: 17-11-2022 at 09:00 IST