पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियामध्ये अटक करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून पंजाब पोलीस तसेच इतर तपाससंस्था गोल्डी ब्रारला बेड्या ठोकण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान, या अटकेनंतर गोल्डीचा सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येशी काय संबंध आहे? गोल्डी ब्रार भारताबाहेर काय करत होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.

गोल्डी ब्रार कोण आहे?

Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
Sanjay Singh
नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड

गोल्डी ब्रार हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे. पंजबामध्ये चालवल्या जाणाऱ्या खंडणी रॅकेटचा गोल्डी ब्रार प्रमुख आहे. युवक काँग्रेसचे नेते गुरलाल पहलवान यांच्या हत्येमागे गोल्डी ब्रारचा हात असल्याचे म्हटले जाते. सध्या तो भारतात नाही. मागील काही दिवसांपासून तो कॅनडामध्ये होता. पंजाबमधील खंडणी रॅकेट तो कॅनडामधून चालवत होता. गोल्डी ब्रार मूळचा पंजबामधील फरिदकोट जिल्ह्यातील आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : महिलांना मशिदीत प्रवेशास बंदी घालता येते का? कुराण आणि संविधान काय सांगतं?

काही दिवसांपूर्वी मारला गेलेल्या गँगस्टर दविंदर बंबिहा आणि तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्यात मागील अनेक दिवसांपासून टोळीयुद्ध सुरू आहे. या दोन्ही टोळ्यांनी एकमेकांची माणसे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. बंबिहा याच्या मृत्यूनंतर या टोळीचे नेतृत्व लकी पटियाल करतो, असे म्हटले जाते. लकी पटियाल सध्या अर्मेनियामध्ये तुरुंगात आहे. तर गोल्टी ब्रार हा बिश्नोई गँगचा सक्रिय सदस्य आहे. तुरुंगात असलेल्या बिश्नोईचे सर्व अनधिकृत कामे, व्यवहार गोल्डी ब्रार पाहतो.

हेही वाचा >>> विश्लेषण : काय आहे सिल्व्हर लाईन रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प, केरळमध्ये का होतोय विरोध?

गोल्डी ब्रारचा सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येशी काय संबंध?

गोल्डी ब्रार आणि सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या संबंधाबाबत पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) नेते विकी मिद्दूखेरा आणि सिद्धू मुसेवाला या दोघांच्या हत्येचा एकमेकांशी संबंध आहे. गोल्डी ब्रारने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये मुद्दूखेरा यांच्या हत्येचा बदला म्हणून सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यात आली, असे ब्रारने या पोस्टमध्ये म्हटले होते. याआधी बंबिहा गँगने मुद्दूखेरा यांच्या हत्येची जबाबदारी घेतलेली आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ४ लाखांत खरेदी ७ हजार कोटींमध्ये विक्री, ‘बिसलरी’ कंपनीचा इतिहास काय? विकण्याचा निर्णय का घेतला?

गोल्डी ब्रार कॅनडामध्ये का आहे?

गोल्डी ब्रार याचा चुलत भाऊ गुरलाल ब्रार याची चंदीगडमधील औद्योगिक क्षेत्रात मागील वर्षी जुलै महिन्यात हत्या करण्यात आली होती. गुरलाल हा बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचा जवळचा सहकारी होता. गुरलालच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गोल्डी ब्रारने फरिदकोट येथे युवक काँग्रेसचे नेते गुरलाल पहलवान यांच्या हत्येचा कट रचला होता. तसा आरोप आरोप केला जातो. गुरलाल पहलवान यांची हत्या झाल्यानंतर गोल्डी ब्रार याला प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून घोषित करण्यात आले. याच कारणामुळे त्यांना भारतातून पळ काढला. त्यानंतर कॅनडातून त्याने आपली अवैध कामे सुरू ठेवली.

दरम्यान, अँटी गँगस्टर टास्क फोर्सने (AGTF) १ मे २०२२ रोजी गोल्डी ब्रारच्या तीन सहकाऱ्यांना भटिंडा येथे अटक केली होती. खंडणीसाठी या भागातील उद्योजकांना धमकावण्याचा आरोप गोल्डी ब्रारच्या सहकाऱ्यांवर आहे.