-अनिकेत साठे
खरे तर युद्ध ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया. उद्दिष्ट प्राप्तीसाठी लष्करी ताकदीवर ते सुरू करता येते. मात्र, नंतर एकतर्फी थांबविणे अवघड होते. माघारीची नामुष्की असते. विविध घटक त्यावर परिणाम करतात. त्यामुळे लष्करी मोहीम प्रभावित होते. अनेकदा प्रचंड आर्थिक भार आणि नुकसान सहन करीत संघर्ष करत राहणे क्रमप्राप्त ठरते. परिस्थितीनुरूप सैन्य व्यूहरचनेत बदल करावे लागतात. अशा कारणांमुळे लढाईतील जय-पराजय अनिश्चित मानला जातो. मात्र विशिष्ट संगणकीय आज्ञावलींच्या आधारे आता या अनिश्चिततेवर मात करून युद्धाच्या निकालाचे भाकीत वर्तविणारी प्रणाली विकसित झाली आहे. इतकेच नव्हे तर, युद्धाच्या आभासी प्रतिकृतीने (मॉडेल) त्यास निर्णायक पातळीवर नेण्याचे कौशल्य साधले जात आहे.

काय आहे ही प्रणाली?

Russia-Ukraine war tanks become obsolete in modern warfare
Russia-Ukraine War: आधुनिक युद्धात रणगाडे निकाली निघालेत का?
Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
The Vietnam War Guided Missiles chip cold wars
चिप-चरित्र: व्हिएतनाम युद्धाचा असाही लाभ..
Hamas Israel conflict
१३००० बालकांसह ३४५०० नागरिक मृत्यू,लाखो बेघर, संपूर्ण प्रदेश बेचिराख; गाझा युद्धाचे रक्तलांच्छित सहा महिने!

कॅलिफोर्नियाच्या मॉन्टेरी येथील नौदल पदव्युत्तर शाळेतील (एनपीएस) अभियंत्यांनी निर्मिलेल्या आज्ञावलीचे एक प्रारूप एखाद्या युद्धाचे सांख्यिकी प्रतिकृतीच्या आधारे मूल्यमापन करते. परिणाम जोखते. युद्धाशी संबंधित सर्वंकष माहिती अत्याधुनिक संगणकात सामावली जाते. या आज्ञावलीत पहिले महायुद्ध संपुष्टात येण्यापासून ते आतापर्यंतची प्रमुख ९६ युद्धे आणि लष्करी मोहिमांची माहिती समाविष्ट आहे. त्याआधारे नव्याने दिलेल्या माहितीची चिकित्सा केली जाते. गेल्या फेब्रुवारीत सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाला दीडशे दिवस पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. सुरुवातीला कीव्ह ही राजधानी ताब्यात घेण्यासाठी रशियन फौजांनी बराच जोर लावला. त्या संदर्भातील माहितीची सांख्यिकीय प्रतिकृतीने पडताळणी करीत रशियन फौजांच्या आक्रमणाचे आणि युक्रेनियन फौजांच्या बचावाचे भाकीत गुणांकन केले गेेले. १ ते ७ या गुणांकन पटावर रशियाला २ आणि युक्रेनला ५ गुणांचा कौल देण्यात आला होता. तो बरोबर निघाला. कारण निकराचा प्रतिकार झाल्यामुळे रशियाला महिनाभरात कीव्हवर ताबा मिळवण्याचा विचार सोडून द्यावा लागला. रशियन फौजांनी युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागाकडे मोर्चा वळवला. या प्रारूपाद्वारे मांडलेले १० पैकी ७ अंदाज बरोबर ठरतात असे आढळून आले आहे. 

अंदाजाचे निकष कसे ठरतात?

नौदल पदव्युत्तर शाळेच्या आज्ञावलीत युद्धाच्या भाकितासाठी वेगवेगळ्या ३० मूल्यांचा अंदाज लावला जातो. यामध्ये युद्धात सहभागी सैन्य दलाचे प्रशिक्षण, गतिशीलता, मारकक्षमता, पुरवठा व्यवस्था, तत्परतेने निर्णय घेण्याची क्षमता, युद्ध आखणी, त्यांची क्रमवारी, शस्त्रसज्जता आदींचा अंतर्भाव आहे. परंतु, काही परिस्थितीत गृहितक चुकीचे ठरू शकते. युरोपमधील सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या सैन्याचा १९४० मध्ये जर्मन सैन्यासमोर पाडाव झाला होता. २००८पासून रशियाने सैन्य दलाचे सक्षमीकरण केले. मात्र, त्याच्या परिणामकारकतेविषयी जॉन झारनेकी या लष्करी अधिकाऱ्याला शंका वाटत होती. त्याने रशियाला अवघा एक गुण दिला होता. हेच जॉन झारनेकी एनपीएसकृत युद्धविषयक प्रणालीचे निर्माते आहेत. युक्रेन युद्धात झटपट हल्ले चढवत प्रतिस्पर्ध्याला जेरीस आणण्याचा रशियन फौजांचा डाव फसला. त्यामुळे रशियन फौजांच्या कथित अद्ययावतीकरणाच्या बातम्यांमध्ये तथ्य नव्हते, हे स्पष्ट झाले.

इतर प्रारूपे (माॅडेल) कोणती आहेत ?

हवाई युद्धात सरस राहण्यासाठी अमेरिकन नौदल आणि हवाई दल व्हर्जिनियातील मॅनटेक कंपनीच्या आभासी पद्धतीने प्रशिक्षण देणाऱ्या यंत्रणेचा (सिम्युलेटर) वापर करते. यंत्रणेच्या नियमित वापरामुळे सर्व प्रकारच्या परिस्थितीचा आभास निर्माण होतो. रशियन एस-४०० क्षेपणास्त्रापासून एफ- १६ ला वाचविण्यासाठी वैमानिक कोणती क्लृप्ती वापरू शकतो. उड्डाणात उंची, पाऊस आणि अन्य अडचणींचा प्रतिकार कसा करता येईल, आदी विषय हाताळले जातात. ब्रॉलर आभासी प्रणालीत जोडीला वैमानिकांची मानसशास्त्रीय कसोट्यांवर तयारी जोखली जाते. सिग्नल सोडून लक्ष विचलित करणे, त्यावेळेची प्रतिक्रिया आदींचे आकलन होते. या प्रणालीच्या संपूर्ण आवृत्ती वितरणावर कठोर निर्बंध आहेत. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाकडे ती असल्याचे सांगितले जाते. निर्माती कंपनी वर्गीकृत स्वरूपात कोब्रा नावाने आवृत्ती विकते. तैवान, दक्षिण कोरियाने ती खरेदी केलेली आहे. लष्करी कार्यवाहीचे व्यापक अंदाज जोखणारी पायोनिअर सांख्यिकीय प्रतिकृती बाहेमिया इंटरएक्टिव्ह सिम्युलेशन (बीसीएम) विकसित करीत आहे. तिच्यात जगभरातील घडामोडींचे अवलोकन करण्याची क्षमता आहे. त्यामध्ये सैनिक, रणगाडे, युद्धनौका, विमाने, इमारती, भ्रमणध्वनी मनोरे, टेकड्या, झाडे, शस्त्र आणि अगदी सैनिकांकडील गोळ्यांचाही समावेश आहे. प्रणालीत भूप्रदेशाची इत्थंभूत माहिती आहे. हवामानाची स्थिती ती जाणून घेते. ती आभासी लढाईचे हुबेहुब परिणाम मांडते. अमेरिकन संरक्षण विभाग प्रगत आज्ञावलीवर मोठा निधी खर्च करतो. युद्धक्षेत्राच्या पलीकडच्या घटनांचा अंदाज बांधणे, आर्थिक स्थिती, जनतेची भावना, गुन्हेगारी, युद्ध आणि शांतता काळातील राजकीय निर्णय याचे आकलन काही प्रणालीत होईल.

मर्यादा कोणत्या ?

अभिरूप प्रक्रिया कितीही चांगल्या असल्या तरी महत्त्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे सैनिकाची लढण्याची इच्छा आणि मनौधैर्याचा. अमेरिकेच्या अंदाज प्रणालीत ते जोखण्याची तितकी क्षमता नसल्याचे युक्रेन युद्धात उघड झाले. कॉम्बॅक्ट एक्सएक्सआय प्रणालीत बिग्रेडचा सहभाग, प्रगत युद्ध कार्यवाहीच्या प्रतिरूपांचा समावेश होतो. लष्करी मोहिमेच्या नियोजनात ती मदत करेल. पण, तिची रचना सैनिकांच्या लढण्याचा इच्छेचा अंदाज लावण्याच्या दृष्टीने झालेली नव्हती. रशियाशी दोन हात करताना युक्रेनची प्रबळ इच्छाशक्ती अधोरेखित झाली. अमेरिकेच्या रँड विचार गटाची आज्ञावली त्यावर लक्ष केंद्रीत करते. त्यांनी सैनिकांचा आहार, झोप, लढण्याची कारणे असे लढण्याच्या इच्छेवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांची यादी शोधली. प्रणालीत समान माहिती समाविष्ट झाली की, समान अंदाज येण्याची शक्यता वाढते. या प्रणालीच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रारूपावर काही तज्ज्ञांचा आक्षेपही आहेत.