Brain-Eating Amoeba Symptoms, Treatment: दक्षिण कोरियामध्ये प्रथमच दुर्मिळ आणि संभाव्य प्राणघातक मेंदू खाणारा अमिबा सापडला आहे. हा अमिबा नेग्लेरिया फॉवलेरी म्हणून ओळखला जातो. सामान्यत: गोड्या पाण्यात आणि मातीमध्ये आढळणारा हा अमिबा प्राइमरी अमेबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (पीएएम) म्हणून ओळखल्या जाणार्‍या दुर्मिळ आणि गंभीर संसर्गास कारणीभूत ठरू शकतो.कोरिया डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन एजन्सी (KDCA) नुसार, या दुर्मिळ अमिबाने अलीकडेच एका ५० वर्षीय व्यक्तीचा व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. थायलंडमध्ये चार महिन्यांच्या सहलीनंतर हा माणूस कोरियाला परतला होता.

काय आहे हा मेंदू खाणारा अमिबा?

मेंदू खाणारा हा अमीबा साधारणपणे तलाव, तळ, स्विमिंग पूल, नदी, गरम पाण्याचे झरे या ठिकाणी वाढतो. Naegleria Fowleri हा नाकावाटे आपल्या शरीरात जातो.तसेच हा जास्त प्रमाणात दूषित पाण्यातही आढळत नाही.

ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Mom Finds Three Month Old Baby Rarest Cancer In Eyes By Mobile Flash Light What Are Signs Of Cancer Seen In Eyes Be Alert
मोबाईलचा फ्लॅश वापरून आईने बाळाला झालेला कॅन्सर ओळखला, काय होती लक्षणं, तुम्हीही काय काळजी घ्यावी?
Till 31st March Shani Uday Surya Gochar Astrological Events Will Make Mesh To Meen 12 Rashi Rich Money Power Health Marathi Horoscope
३१ मार्चपर्यंत ‘या’ राशी तन-मन-धनाने होतील श्रीमंत; होळी आधी शनी, सूर्यासह ४ ग्रहांचे गोचर, १२ राशींना कसा जाईल मार्च?
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

प्राप्त माहितीनुसार या अमीबाचे संक्रमण हे संसर्गजन्य नाही. मानवाकडून मानवाकडून प्रसार होणे सध्या शक्य नसले तरी, KDCA ने लोकांना गोड्या पाण्याच्या तलावांतील मासे खाण्यास व वॉटर स्पोर्ट्स मध्ये सहभागी होताना खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः ज्या खेळांमध्ये तुमच्या नाकातून तलावाचे पाणी शरीरात शिरू शकेल त्या खेळांपासून लांबच राहणे हिताचे ठरेल.

मेंदू खाणाऱ्या अमीबाचे संक्रमण होताच काय लक्षणे दिसतात?

PAM हा एक दुर्मिळ व प्राणघातक संसर्ग आहे जो दूषित पाण्यातून नाकावाटे शरीरात व मेंदूपर्यंत जातो. या संसर्गाची लक्षणे सामान्यत: संसर्ग झाल्यानंतर पाच दिवसांच्या आत दिसतात आणि त्यात डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलट्या, तसेच मान ताठ होणे, फिट येणे आणि बदललेली मानसिक स्थिती यांचा समावेश असू शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये, संक्रमित व्यक्ती कोमात जाऊ शकते आणि मृत्यू होऊ शकतो.

सध्या PAM साठी कोणताही विशिष्ट उपचार नाही. अमिबाच्या दुर्मिळतेमुळे आणि योग्य निदान चाचण्यांच्या अभावामुळे संसर्गाचे निदान करणे कठीण होऊ शकते. उपचारांमध्ये सामान्यत: जळजळ नियंत्रित करण्यासाठी औषधे आणि गुंतागुंत दूर करण्यासाठी काळजी घेण्याच सल्ला दिला जातो.

हे ही वाचा<< विश्लेषण: पार्टी करताना तुम्हालाही जाणवू शकतो ‘हॉलिडे हार्ट सिंड्रोम’; नेमकी लक्षणं कोणती? काय कराल उपचार?

दक्षिण कोरियामध्ये नेग्लेरिया फावलेरी संसर्गाची ही पहिली नोंद झाली आहे. यापूर्वी १९६२ ते २०१८ पर्यंत युनायटेड स्टेट्समध्ये या अमिबाच्या संक्रमणाची १४३ प्रकरणे नोंदवली गेली होती, ज्यात बहुतांश मृतांची संख्या ही दक्षिणेकडील राज्यांमधील आहे. जागतिक स्तरावर, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अंदाजानुसार दरवर्षी १००० ते २००० अमिबा संक्रमितांची नोंद होते.