घरात साफसफाई करताना अनेकदा कोळ्याची जाळी आढळून येतात. सामान्यपणे याच वेळी आठवणाऱ्या या किटकाबद्दल एक रंजक माहिती वैज्ञानिकांच्या हाती लागली आहे. यापूर्वीच्या कोणत्याही संशोधनामध्ये कोळी आणि मानवामध्ये जे साम्य आढळलं नव्हतं असं साधर्म्य दाखवणारे पुरावे वैज्ञानिकांना आढळून आले आहेत. कोळी हे माणसाप्रमाणेच थकवा घालवण्यासाठी अगदी थोड्या कालावधीसाठी झोप काढण्यापासून ते स्वप्न पाहण्यापर्यंत अनेक गोष्टी करु शकतात असं नुकत्याच केलेल्या एका संशोधनात दिसून आलं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : ‘हर घर तिरंगा’ मोहीम आहे तरी काय? यामध्ये कसं सहभागी व्हायचं? यात सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र कसं मिळतं?

जर्मनीतील कोन्स्टान्झ विद्यापीठातील पर्यावरणशास्त्रज्ञ डॅनिएला सी. रॅस्लर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर इन्फ्रारेड कॅमेर्‍यांसह बेबी जंपिंग स्पायडर्सचं निरिक्षण केलं आहे. एवार्चा आर्कुएटा असं या कोळ्यांच्या प्रजातीचं शास्त्रीय नाव आहे. या निरिक्षणामध्ये वैज्ञानिकांना कोळी हे मानवाप्रमाणे झोपेसंदर्भातील काही खास वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोळ्यांच्या पायाच्या आणि डोळ्यांच्या हलचाली वैज्ञानिकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या.

यावरुन वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला आहे की पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांमध्ये ज्याप्रमाणे आरईएम किंवा रॅपीड आय मुव्हमेंटची अनुभूती होते तशीच अनुभूती या किटकांनाही होते. आरईएम किंवा रॅपीड आय मुव्हमेंट पद्धत ही झोपेचा एक पद्धत आहे. यामध्ये डोळ्यांची हलचालींचा थेट संबंध मेंदूमधील विचार प्रक्रिया वाढण्याशी असतो. झोपेत असताना शरीराच्या स्नायूंची हलचाल मंदावते, शरीराच्या बहुतेक हालचाली संथ असतात त्या प्राण्यांच्या झोपेची पद्धत आरईएमप्रमाणे असतात असं मानलं जातं. प्रसिडिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या नियतकालेत यासंदर्भातील संशोधन छापून आलेलं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली? जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण

आरईएम पद्धतीची झोप ज्या प्राण्यांमध्ये दिसून येते ते प्राणी स्वप्न पाहतात असं म्हटलं जातं. सामान्यपणे मनुष्यप्राणी या अवस्थेत असतो तेव्हा तो स्वप्न पाहतो असं म्हटलं जातं. हा मानवाच्या शिकण्याचा आणि माहिती लक्षात ठेवण्याच्या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग आहे. आरईएममध्ये डोळ्यांची हलचाल सर्वात महत्वाची मानली जाते. मात्र ही हलचाल प्राण्यांच्या कोणकोणत्या प्रजातींमध्ये दिसून येते हे शास्त्रज्ञांना सांगणं कठीण आहे. जपिंग स्पाडर्सचे आठ डोळे त्यांच्या डोक्याला जोडलेले असतात. त्यांच्या डोळ्यांमध्ये लांब नलिका असतात. त्यामुळेच त्यांना डोळ्यांची बुबुळं अनेक दिशेला हलवता येतात. यापैकी नवजात कोळ्यांमध्ये या पिगमेंट (रसायनाची) कमतरता असता. त्यामुळेच अशा कमी वयाच्या कोळ्यांची वैज्ञानिकांना या किटकाच्या डोळ्यांची आतील रचना समजण्यासाठी मदत होते.

आरईएम पद्धतीची झोपेची शैली असणाऱ्या प्राण्यांना स्वप्न पडतात असं वैज्ञानिक मानतात. त्यामुळेच कोळी सुद्धा मानवाप्रमाणे स्वप्न पाहू शकतात असा प्राथमिक निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.