पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ असा सल्ला दिल्याने जगभरातून त्यांचं कौतुक होत आहे. मोदी यांच्या भूमिकेचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान, भारताकडून रशिया-युक्रेन युद्ध चर्चेने हाताळले जावे, असे सातत्याने सांगितले जात आहे. रशियाने युद्ध थांबवले तर यात भारताचा काय फायदा? असा प्रश्न विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर रशिया-युक्रेन युद्ध थांबले तर भातासाठी ते का हिताचे आहे, त्यावर थोडी नजर टाकुया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> “पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी योग्य बोलले”, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक मंचावर जाहीरपणे मांडली भूमिका

नरेंद्र मोदी यांनी रशियाला काय आवाहन केले ?

या वर्षी १६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात समरकंद येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेदरम्यान एक बैठक पार पडली होती. या बैठकीत युक्रेन- रशिया युद्धावर बोलताना ‘आजचे युग युद्धाचे नाही. यासंदर्भात मी अनेकदा तुमच्याशी फोनवर बोललो आहे,’ असे नरेंद्र मोदी पुतीन यांना उद्देशून म्हणाले होते. मोदींच्या या संबोधनाला पुतीन यांनी उत्तर दिले होते. ‘रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताची काय भूमिका आहे, याची मला जाणीव आहे. हे शक्य तितक्या लवकर संपावे, अशी आमची इच्छा आहे. तसेच रशियात काय घडत आहे याची माहिती आम्ही तुम्हाला देत ​​राहू,’ असे पुतीन मोदींनी उद्देशून म्हणाले होते.

हेही वाचा >>> विश्लेषण : महात्मा फुलेंनी १५० वर्षांपूर्वी स्थापन केलेला ‘सत्यशोधक समाज’ काय आहे? वाचा इतिहास…

मोदींच्या याच सल्ल्याचा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी उल्लेख केला. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७७ व्या अधिवेशनात संबोधित करताना ते ‘मोदींनी जेव्हा पुतीन यांना सांगितलं, ही युद्धाची वेळ नाही ते योग्य होते,’ असं स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.

भारताला कशाची चिंता आहे?

भारत सामरिक उपकरण पुरवठ्याच्या बाबतीत ६० ते ७० टक्के रशियावर अवलंबून आहे. या युद्धामुळे शस्त्रांचा पुरवठा करण्यामध्ये अडथळा निर्माण होईल, असे भारताला वाटते. युक्रेनविरोधी युद्धासाठी रशियाला आणखी सैन्याची गरज भासत आहे. यामुळेदेखील भारताची चिंता वाढलेली आहे. भारताने म्हणूनच युद्ध संपवून नेहमीच्या व्यापाराकडे लक्ष द्यायला हवे, असे रशियाला उद्देशून सांगितले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : वय वाढतं तसे आपण म्हातारे का होतो? आपल्या शरीरात नेमकं घडतं काय? सविस्तर जाणून घ्या

भारत आणि चीनमधील सीमावाद अजूनही मिटलेला नाही. भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी याच आठवड्यात याबाबत भाष्य केले आहे.पूर्व लडाखमधील एलएसीमध्ये अजूनही डेपसांग आणि डेमचोक भागात भारत-चीन यांच्यातील वाद मिटलेला नाही, असे पांडे म्हणाले होते. असे असताना रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला रशियाकडून मिळणारा शस्त्रास्त्र आणि संरक्षणविषयक साधनांचा पुरवठा कमी झालेला आहे. याच कारणामुळे रशिया-युक्रेनमधील युद्ध लवकर संपले पाहिजे, असे भारताला वाटते.

हेही वाचा >>> विश्लेषण : ईडीकडून आरोपींची चौकशी कशी केली जाते? कोणत्या कायद्यांची घेतली जाते मदत? जाणून घ्या सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन-रशिया युद्धाबाबात कोणतीही वेगळी भूमिका घेतलेली नाही. मात्र भारताला रशियाकडून संरक्षणविषयक विश्वासार्ह पुरवठा साखळी निर्माण व्हावी यासाठी मोदी यांनी दिलेला हा संदेश असल्याचे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telling russia to abandon russia ukraine war war is in india interest know how prd
First published on: 24-09-2022 at 17:23 IST