Premium

भारत-कॅनडा यांच्यातील तणावामुळे मसूर डाळ महागणार ? जाणून घ्या…

सध्या चना डाळीनंतर मसूर ही डाळ सर्वाधिक स्वस्त आहे. सध्या देशाच्या वेगवेगळ्या भागात मसूर डाळ ९१ ते ९५ रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे.

justin_trudeau_and_narendra_modi
जस्टिन ट्रुडो, नरेंद्र मोदी (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला. ट्रुडो यांच्या या दाव्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील राजकीय संबंध ताणले आहेत. ट्रुडो यांचा आरोप भारताने फेटाळला आहे. या दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची स्वत:च्या देशातून हकालपट्टी केली आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, भारत आणि कॅनडा यांच्यातील ताणलेल्या संबंधामुळे भारतात मसूर डाळीचे भाव वाढू शकतात. याचे नेमके कारण काय आहे? हे जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅनडा सर्वांत मोठा पुरवठादार

कॅनडा आणि भारत यांच्यातील सद्यस्थिती आणि घडामोडींवर डाळ मिलर आणि ट्रेडर्स लक्ष ठेवून आहेत. कारण या दोन्ही देशांच्या संबंधानुसार देशात मसूर डाळ महागणार की नाही? हे ठरणार आहे. कॅनडा भारतासाठी मसूर डाळ पुरवणारा सर्वांत मोठा देश आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही आयात वर्षाला ४ ते ५ लाख टन एवढी आहे. कॅनडाकडून मसूर डाळीची आयात थांबल्यास भारत ऑस्ट्रेलियाकडून ही डाळ आयात करू शकतो. मात्र यामुळे पुरवठा साखळी बिघडल्यामुळे मसूर डाळीची किंमत वाढू शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tension between india and canada masoor dal price may hike know detail information prd

First published on: 22-09-2023 at 20:25 IST
Next Story
गज, गरुड, अश्व… नव्या संसद भवनाच्या सहा प्रवेशद्वारांचा अर्थ काय?