– राखी चव्हाण

बहेलिया शिकाऱ्यांचा राज्याला बसलेला विळखा तोडण्यात पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्राला यश आले. तेव्हा हा विळखा विदर्भ आणि विदर्भातील वन्यजीव विभागाला घट्ट बसला होता. आता पाच वर्षानंतर पुन्हा बहेलिया शिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि वन्यजीवच नव्हे तर प्रादेशिक वनविभागाही आपल्या कवेत घेतले आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांत वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या दोन्ही घटनांमध्ये बहेलिया वापरत असलेल्या विशिष्ट पद्धतीचा शिकारीचा सापळा सापडल्याने राज्याच्या वनखात्यासमोर या शिकाऱ्यांनी ताकदीने नवे आव्हान उभे केल्याचे स्पष्ट झाले आहे.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

बहेलिया शिकाऱ्यांचा नवा डाव काय?

बहेलिया शिकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी राज्यात वाघाच्या एकापाठोपाठ एक शिकारी सुरू केल्या. या शिकारींमध्ये बहेलिया स्वत: उतरले होते. विदर्भात अनेक ठिकाणी त्यांनी वेश बदलून, नावे बदलून तळ ठोकले. ज्याचा ठावठिकाणा राज्याला लागला नाही. ज्यावेळी वनखात्याला कळले, तेव्हा अनेक वाघ त्यांनी मारले होते. आता पुन्हा ते नव्याने राज्यात शिकारीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र, यावेळी ते प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे (स्थानिक गावकऱ्यांना हाताशी धरून) उतरले आहेत. वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतपीक नुकसान, जनावरांचे नुकसान आणि गावकऱ्यांवर होणारे हल्ले यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांच्या याच मानसिकतेचा फायदा घेत बहेलिया शिकारी जमात त्यांचा डाव साधण्याचा प्रयत्न करत आहेत. वन्यप्राण्यांना मारण्यासाठी ते वापरतात तसे सापळे तयार करण्यास त्यांनी स्थानिक शिकाऱ्यांना शिकवले आहे.

बहेलिया शिकाऱ्यांचा इतिहास काय?

बहेलिया शिकारी जमात ही मूळची मध्य प्रदेशातील कटनी येथील. वाघांच्या शिकारीत त्यांचा हातखंडा आहे. त्या शिकारीसाठी विशिष्ट पद्धतीचा सापळा ते वापरतात. बहेलिया समाजातील संघटित टोळ्या स्टीलच्या जबड्याचे सापळे वापरण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. हे सापळे ‘बहेलिया ट्रॅप’, ‘कटनी ट्रॅप’ म्हणूनही ओळखले जातात. स्टील आणि लोखंडाचे हे सापळे लावून वाघांची त्यांच्या शरीराच्या अवयवांसाठी आणि कातडीसाठी शिकार करणे ही बहेलिया शिकारीच्या संघटित टोळ्यांची कार्यपद्धती आहे.

बहेलिया शिकाऱ्यांनी केलेल्या शिकारी व अटक

अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात बहेलिया शिकाऱ्यांनी २०१२ ते २०१६ या कालावधीत प्रचंड धुमाकूळ घातला. या कालावधीत विदर्भातून सुमारे ४० ते ५० वाघांची शिकार केली. यात सुमारे १००हून अधिक बहेलिया शिकाऱ्यांना अटक करण्यात आणि त्यातील काहींना शिक्षा देण्यात वनखात्याला यश आले. यात अमरावती वन्यजीव विभागाने स्थापन केलेल्या वन्यजीव गुन्हे शाखेची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

बहेलिया शिकाऱ्यांची शिकारीची पद्धत काय?

शिकार करण्यापूर्वी ते टेहळणी करतात. ज्या जंगलात शिकार करायची, त्या जंगलाच्या जवळच्या गावात राहायला जातात. वैदू असल्याचे भासवून गावकऱ्यांचा विश्वास जिंकतात. ते ज्या ठिकाणी राहतात, तेथे हत्यारे किंवा शिकारीचे साहित्य कधीच ठेवत नाहीत. ते जंगलाजवळच्या एखाद्या झाडावर लपवून ठेवतात. शिकारीच्या आधी ते वाघांच्या पाणवठ्यावर येण्याच्या, त्यांच्या भ्रमणमार्गाचा अभ्यास करतात. ज्या दिवशी शिकार करायची, त्या दिवशी वाघाचा एक भ्रमणमार्ग सुरू ठेवून इतर सर्व बंद करतात आणि पाणवठ्याजवळ जमिनीत सापळा लावतात. या सापळ्यावर वाघाचा पाय पडला की पाय घट्ट अडकतो आणि शिकारी वाघाच्या जबड्यात ओंडका फेकतात. यामुळे वाघाचा श्वास गुदमरतो आणि तो काही क्षणात मरतो. यानंतर वाघांचे सर्व अवयव आणि कातडी बेमालूमपणे काढण्याची कलाही त्यांना अवगत आहे.

शिकारीत महिलांचाही सहभाग?

वाघाच्या शिकारीचा सापळा रचताना जे काही निर्णय घेतले जातात, त्यात पुरुषांबरोबर महिलादेखील सहभागी होतात. वाघाची शिकार पुरुष करत असले तरीही अवयवांच्या तस्करीची विशेषत: वहनाची जबाबदारी महिलांची असते. यादरम्यान सर्व आर्थिक व्यवहारदेखील त्याच करतात. वाघाचे अवयव, कातडी या महिला स्वत:च्या कपड्यांच्या आत बांधतात. रेल्वेतून मग या अवयवांची आदानप्रदान होते. शिकारी ते ग्राहक यादरम्यान अनेक व्यक्ती बदलतात.

rakhi.chavhan@expressindia.com