ब्रिटनमध्ये महागाईने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. नेतृत्वबदलानंतर येथे परिस्थिती फारशी सुधारलेला नाही. ब्रिटनमध्ये सध्या टोमॅटो, काकडी अशा रोजच्या जेवणात असणाऱ्या फळभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी या फळभाज्यांचे भाव थेट चांगलेच वधारले आहेत. याचा फटका येथील सामान्य नागरिकांना बसत आहे.

हेही वाचा >> मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी विरोधी पक्षनेतेपदावर डोळा; वसुंधरा राजेंचं वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन!

Rahul gandhi
“सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी…”, राहुल गांधींची भंडाऱ्यात अग्निवीर योजना आणि जीएसटीबाबत मोठी घोषणा
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?
Edwin Montagu
विश्लेषण: एका मिठाईवाल्याच्या विजयाने ब्रिटिश सरकार हादरले; १९२० सालची निवडणूक का ठरली महत्त्वाची?
IIT student to join ISIS
आयआयटीचा विद्यार्थी ISIS च्या संपर्कात? दहशतवादी गटात सामील होण्याआधीच…; आसाम पोलिसांची माहिती

ब्रिटनमध्ये फळभाज्यांचे भाव गगनाला भिडले

ब्रिटमध्ये हिवाळ्यात वीजदर वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. हे संकट संपते तोच येथे फळभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. येथे टोमॅटो, काकडी यासरख्या फळभाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. याच टंचाईवर पर्यावरण व अन्नमंत्री थेरेसे कॉफ्फी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी या समस्येबाबत माझ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. माझ्या माहितीनुसार ही स्थिती आगामी दोन ते चार आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे. टोमॅटो, काकडी यासारख्या फळभाज्या आयात करण्यासाठी आपण पर्यायी व्यवस्थेचा शोध घेत आहोत,” असे त्या म्हणाल्या आहेत.

ब्रिटनमध्ये भाजीपाल्याची टंचाई का निर्माण झाली आहे?

ब्रिटनमध्ये भाजीपाल्याची टंचाई निर्माण होण्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. यातील सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे वाढलेला वीजदर. ब्रिटनमधील कमी तापमानामुळे येथे टोमॅटो, काकडी यासारख्या भाज्यांचे उत्पादन हरितगृहांमध्ये घेतले जाते. मात्र ब्रिटनमध्ये हिवाळ्यात विजेचा दर वाढला होता. विजेच्या खर्चात वाढ झाल्यामुळे येथे भाज्यांचे उत्पादन घटले. याबाबत ब्रिटनच्या नॅशनल फार्मर्स युनियने अधिक माहिती दिली आहे. ‘विजेच्या खर्चाची पुर्तता करणे अवघड झाले आहे. युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धामुळे रशियाकडून मिळणाऱ्या इंधन पुरवठ्यात घट झाली आहे. त्यामुळे ब्रिटनमधील वीज महागली आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर झाला,’ असे नॅशनल फार्मर्स युनियनने सांगितले आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : करोना विषाणूची उत्पत्ती कशी झाली? आतापर्यंत शास्त्रज्ञांच्या हाती काय लागले?

स्पेनकडून भाज्यांची आयात

ब्रिटन देश उत्तर आफ्रिका, स्पेन यासारख्या देशांकडून फळभाज्या, पालेभाज्यांची आयात करतो. बीबीसीच्या रिपोर्टनुसार ब्रिटन ९० टक्के टोमॅटो स्पेनकडून आयात करतो. भाजीपाल्यासंदर्भात ब्रिटन मुख्यत्वे स्पेनवर अवलंबून आहे. मात्र मागील वर्षी स्पेनकडून पुरवठा कमी झालेला आहे. २०२१ सालाच्या तुलनेत मागील वर्षी स्पेनकडून फळ आणि भाज्यांच्या निर्यातीचे प्रमाण १०.४ टक्क्यांनी कमी होते.यावर्षीही अशीच स्थिती आहे.

फळभाज्यांच्या टंचाईमुळे काय परिणाम झाला?

ब्रिटनमध्ये फळभाज्यांची टंचाई निर्माण झाल्यामुळे किरकोळ भाजीपालाविक्रेत्यांनी दरात वाढ केली आहे. ब्रिटनमध्ये टोमॅटोचे दर चार पटीने वाढले आहेत. टोमॅटोचा दर प्रतीपेटी ५ पौंडवरून २० पौंडवर पोहोचला आहे.

हेही वाचा >> विश्लेषण: पंजाबच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांचा नकार, आप सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव; कायदा काय सांगतो?

दरम्यान, ब्रिटन सरकारकडून भाजीपाल्याची टंचाई लवकरात लवकर दूर करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मंत्री मार्क स्पेंसर यांनी याबाबत माहिती दिली आहे. “आम्ही ब्रिटनमधील प्रमुख व्यापाऱ्यांसोबत चर्चा करत आहोत. फळ आणि भाजीपाला खरेदीवर पुन्हा नव्याने चर्चा केली जावी, असे आवाहन मी केलेले आहे,” असे स्पेंसर म्हणाले आहेत.