UNESCO Pysanka heritage: युनेस्कोने ‘पायसांका: युक्रेनियन परंपरा आणि अंड्याच्या सजावटीची कला’ याला मानवी इतिहासातील महत्त्वाचा जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. युक्रेनच्या सांस्कृतिक मंत्रालयाने ३ डिसेंबर रोजी पॅराग्वेमधील असुनसिओन येथे झालेल्या युनेस्को आंतर- सरकारी समितीच्या १९ व्या सत्रानंतर या ऐतिहासिक मान्यतेची घोषणा केली.

युक्रेन आणि एस्टोनियाचा संयुक्त प्रयत्न

एस्टोनियाने २०१३ साली पायसांकाला आपल्या राष्ट्रीय वारशाचा भाग म्हणून मान्यता दिली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी या कलेला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी संयुक्तपणे काम केले. युक्रेनचे संस्कृती आणि धोरणात्मक संवाद मंत्री मिकोल टोचिट्स्की म्हणाले, “आम्ही आमच्या एस्टोनियन भागीदारांचे त्यांच्या ठाम समर्थनाबद्दल मनापासून आभार मानतो.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ही मान्यता युक्रेनमधील मंत्रालय, युनेस्को प्रतिनिधी, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यातील घनिष्ठ सहकार्याचे फलित आहे.

Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Loksatta book batmi John Baxter Paris
बुकबातमी: जॉन बॅक्स्टरचे पॅरिस…
Two school vans of private school with same number plate
भंडारा : धक्कादायक! एकाच नंबर प्लेटच्या दोन स्कूल व्हॅन; त्यातही घरगुती सिलेंडर…
Flamingos and Other Migratory Birds Flock to Ujani Dam
भादलवाडीत चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग
AI Identity and Opportunity career news
कृत्रिम प्रतिमेच्या प्रांगणात: एआय : ओळख आणि संधी
Loksatta kutuhal Historic buildings Hard to find without stones
कुतूहल: पाषाणांशी जडले नाते…
Marathi Actress Samruddhi Kelkar social media post
हातात हिरवा चुडा, मेहंदी अन्…; ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरची लक्षवेधी पोस्ट; म्हणाली, “लवकरच…”

अधिक वाचा: WWII: दुसऱ्या महायुद्धातही झाले होते जैवयुद्ध? चिनी शास्त्रज्ञ म्हणतात की, जपानने कैद्यांना दिली होती रोगजंतुंची इंजेक्शन्स!

पायसांका म्हणजे काय?

पायसांका ही युक्रेनियन संस्कृतीतील एक प्राचीन कला आहे, ज्यात मेण-प्रतिरोधक तंत्राचा वापर करून अंडी सजवली जातात. या प्रक्रियेत अंड्याच्या टरफलावर वितळलेल्या मेणाने नक्षी काढली जाते आणि त्यानंतर विविध रंगांमध्ये बुडवले जाते. मेण काढल्यानंतर त्यावर असलेली सुंदर आणि तपशीलवार नक्षी नजरेस पडते. पायसांका ही कला युक्रेनमध्ये पुनर्जन्म, संरक्षण आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. प्रामुख्याने ईस्टर सणाच्या काळात ही अंडी तयार केली जातात आणि युक्रेनियन वारशात त्यांना विशेष स्थान आहे.

पायसांका कलेचे महत्त्व

पायसांका ही केवळ सजावटीची कला नसून, ती युक्रेनियन समाजाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. ही कला पिढ्यानुपिढ्या हस्तांतरित होत आली आहे आणि आजही ती युक्रेनियन समाजाची ओळख आणि परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

ही परंपरा कधी सुरु झाली?

ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली, हे कोणालाच ठाऊक नाही. त्या संदर्भात उत्पत्तीच्या काही कथा आहेत. त्यापैकी काही ईस्टर सणाशी संबंधित आहेत, तर अनेक कथा या परंपरेचा संबंध ईस्टरपूर्व कालखंडाशी असल्याचे सांगतात. अशाच एका कथेप्रमाणे अंड सजवण्याचा विधि हा मोठ्या लांबलचक हिवाळ्यानंतर परतलेल्या सूर्यप्रकाशाचे प्रतीक असतो. अंड्याच्या वापरामागील मूळ संदर्भ हा अंड्यातील पिवळ्या बलकाचे सूर्याशी असलेले साधर्म्य याच्याशी आहे. याशिवाय आणखी एक कथा प्रचलित आहे. मात्र ती कथा ख्रिश्चनपूर्व कालखंडातील आहे.

या कथेनुसार कार्पेथियन पर्वतरांगेतील एका राक्षसाच्या दृष्ट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी या प्रथेचा वापर केला जात असे. या कथेनुसार जितकी जास्त पायसांकी तयार केली जातील, तितका राक्षसाभोवतीचा साखळीचा विळखा घट्ट होईल, त्यामुळे तो जग नष्ट करू शकत नाही. या प्रथेचे किंवा अंड्याचे नाव पायसांका हे एकवचन आहे आणि पायसांकी हे बहुवचन आहे. त्याची व्युत्पत्ती युक्रेनियन क्रियापद पिसाटी (писати) या शब्दावरून झाली आहे. त्याचा अर्थ लिहिणे असा होतो.

अधिक वाचा: Indian Navy Day 2024: १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारणारे ऑपरेशन ट्रायडंट काय होते? त्याचा नौदल दिनाशी काय संबंध?

ख्रिस्ती धर्मात, अंडी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे प्रतीक मानली जातात. अंड्यांवरील पारंपरिक नक्षीमागे विशिष्ट अर्थ आहे. ख्रिस्ती परंपरेनुसार अंड्यांवरील त्रिकोण पवित्र त्रिमूर्तीचे (Holy Trinity) प्रतीक आहे. युक्रेनच्या विविध भागांमध्ये अंड्यांची सजावट करण्याच्या पद्धती भिन्न आहेत. उदाहरणार्थ, पश्चिम युक्रेनमधील ‘पायसांकी’ मध्ये प्रजननक्षमतेचे प्रतीक म्हणून पिल्लांची (चिक्स) चित्रे चितारली जातात, तर सामर्थ्य आणि भरभराटीचे प्रतीक म्हणून हरणांचे चित्रांकन केले जाते.

सोव्हिएत राजवटीच्या काळात दुसऱ्या महायुद्धापासून ते १९९१ साली युक्रेनला स्वातंत्र्य मिळेपर्यंत पायसांका परंपरा युक्रेनमध्ये फारशी प्रचलित नव्हती. युक्रेनला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या परंपरेचे पुनरुज्जीवन झाले,” असे झिल्यक यांनी सांगितले. पायसांकाचे प्रतिकात्मक महत्त्व ईस्टरनंतरही टिकून राहिले आहे. काही लोक घराच्या चार कोपऱ्यांवर अंडे ठेवले तर त्याने घरात शुभशक्ती येते, असे मानतात.

युनेस्कोच्या मानांकनाचा वारसा

हे युनेस्कोकडून युक्रेनला मिळालेले पहिले मानांकन नाही, तर यापूर्वी तेथील प्रसिद्ध चुकंदर सूप ‘बोर्श’ यालाही अमूर्त सांस्कृतिक वारशाचा घटक म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

Story img Loader