Roosevelt Hotel New York Pakistan America ownership: न्यूयॉर्कच्या गजबजलेल्या मिडटाउनमधील भव्य रूझवेल्ट हॉटेलवर आता अमेरिकेसोबतच पाकिस्तानचाही संयुक्त मालकीहक्क प्रस्थापित झाला आहे. हा केवळ रिअल इस्टेटचा व्यवहार नसून, जागतिक राजकारणातील एक मोठी खेळी असल्याचे भूराजकीय तज्ज्ञांचे मत आहे. एका बाजूला इराण विरोधात युद्ध सुरू असताना पलीकडे पडद्यामागे घडलेल्या या हालचालीने भारतीय नव्हे तर जगभरातील अनेक राजनैतिक तज्ज्ञांच्याही भुवया उंचावल्या आहेत.
दीर्घकालीन रणनितीची कहाणी
सुरुवातीस ही अफवा असावी, अशी चर्चा झाली. मात्र व्हाईट हाऊसनेच अनेक गोष्टींचा खुलासा केल्यानंतर हे लक्षात येते की, Roosevelt Hoteची कहाणी काही केवळ एका हॉटेलपुरती मर्यादित नाही तर ती जागतिक अर्थकारण, राजनैतिक संबंध, आणि त्यातून संधी साधणाऱ्या अमेरिका- पाकिस्तान या दोन्हींच्या दीर्घकालीन रणनीतिची कहाणी आहे.
अमेरिकेतील प्रतिष्ठीत मालमत्ता पाकिस्तानच्या मालकीची?
अमेरिकेच्या सर्वात महत्त्वाच्या शहरात म्हणजेच थेट New York City मध्ये असलेली प्रतिष्ठित मालमत्ता आर्थिक दृष्टीने कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानसारख्या देशाच्या मालकीची कशी होऊ शकते, या प्रश्नाने अनेक तज्ज्ञह हैराण झालेही होते. त्यामुळेच हा निव्वळ योगायोग की, एक विचारपूर्वक आखलेलं आर्थिक आणि राजकीय गणित, असा प्रश्न खुद्द अमेरिकेतही तज्ज्ञांनी विचारण्यास सुरुवात केली. या Roosevelt Hotel संदर्भातील घटनाक्रम आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ही केवळ हॉटेलच्या मालकीहक्काची गोष्ट नाही, तर जागतिक पातळीवर प्रभाव निर्माण करण्याच्या खेळाचाच हा एक भाग आहे.

‘रोअरिंग ट्वेंटीज’ची आठवण जपणारं हॉटेल
१९२४ साली उभारण्यात आलेलं हे हॉटेल अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष Theodore Roosevelt यांच्या नावे उभे आहे. त्या काळात अमेरिका आर्थिकदृष्ट्या झपाट्याने वाढत होती. म्हणूनच त्याचा उल्लेख रोअरिंग ट्वेंडीज (Roaring Twenties) असा केला जातो. त्या दशकात अमेरिका नावारूपास येत होती. आधुनिकता आणि ग्लॅमर त्याला जोडून येणारे ग्लॅमर म्हणजे अमेरिका असे समीकरण आकारास येत होते. रूझवेल्ट हॉटेल हे त्याचं प्रतीक ठरलं.
- इथे राजकारणी, उद्योगपती, कलाकार यांची सतत वर्दळ असायची
- मोठमोठ्या बैठका, सामाजिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक सोहळे इथे होत असत
- हे हॉटेल ही केवळ राहण्याची जागा नव्हती, तर न्यूयॉर्कच्या सामाजिक जीवनाचं ते केंद्र होतं
विशेष म्हणजे, Guy Lombardo आणि त्यांच्या बँडने इथूनच सुरू केली आणि “Auld Lang Syne” ही नववर्ष साजरं करण्याची परंपरा अमेरिकेत आजही कायम आहे, त्याची सुरुवात याच हॉटेलमध्ये झाली.
राजकारण आणि सांस्कृतिक केंद्र
रूझवेल्ट हॉटेल केवळ आलिशान वास्तू नव्हतं तर ते अमेरिकन राजकारणातही तेवढंच महत्त्व असलेलं ठिकाण होतं.
- Republican Party ने 1980 पर्यंत इथून आपली निवडणूक मोहीम चालवली
- अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्याचा वापर झाला
- ‘Maid in Manhattan’ आणि ‘Mad Men’ यासारख्या लोकप्रिय कलाकृतींमध्ये ते झळकलं
यामुळे या हॉटेलला एक सांस्कृतिक ओळखही मिळाली.
पाकिस्तानची एंट्री
१९७८ साली या कहाणीला एक वेगळंच वळण मिळालं. अमेरिकन रिअल इस्टेट व्यावसायिक Paul Milstein यांनी हे हॉटेल विकत घेतलं. पण त्यांनी ते स्वतः चालवण्याऐवजी ते हॉटेल Pakistan International Airlines (PIA) च्या गुंतवणूक शाखेला लीजवर देण्याचा अनोखा निर्णय घेतला. हा निर्णय देखील राजकीय स्वरूपाचाच होता आणि अमेरिका- पाकिस्तान मैत्री पुढे नेणारा होता, असं तज्ज्ञांना वाटतं. याच निर्णयामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. त्या काळात अनेक देश परदेशात गुंतवणूक करून आपली आर्थिक ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत होते. पाकिस्ताननेही ही संधी साधली. हे हॉटेल चालवण्यासाठी PIA ने सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील Faisal bin Khalid bin Abdulaziz Al Saud यांच्यासोबत भागीदारी करत हा व्यवहार पूर्ण केला.
कराराची रचना आणि हुशार डावपेच
या व्यवहारात एक महत्त्वाची अट होती:
- सुमारे ३५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे लीज
- कराराच्या २० वर्षांनंतर खरेदीचा पर्याय खुला
- नंतर ३६.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये मालकी हक्क मिळवण्याची संधी
ही रचना पाहता, हा केवळ भाडेकरार नव्हता तर ती एक ‘दीर्घकालीन गुंतवणूक योजना’ होती. आणि पाकिस्तानच्या भल्यासाठी अमेरिकेने ती घडवून आणली होती. PIA ने हॉटेल चालवण्यास सुरुवात केली, पण सुरुवातीची १५ वर्षे त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला.
- व्यवस्थापनातील अडचणी
- स्पर्धा
- आर्थिक दबाव
अनेक कंपन्या इथेच मागे हटल्या असत्या. पण PIAने अमेरिकेच्या मदतीने वेगळी रणनीति निवडली.
पुनरुज्जीवन आणि यश
PIA ने पुढील गोष्टी केल्या:
- नूतनीकरण केलं
- सेवा सुधारल्या
- ब्रँडची प्रतिमा उंचावली
- हळूहळू हॉटेल पुन्हा नफ्यात आलं.
अखेरीस निर्णायक पाऊल उचललं आणि १९९८ साली PIA ने खरेदीचा पर्याय वापरून हॉटेल पूर्णपणे विकत घेतलं.
पाकिस्तानचा संपूर्ण ताबा
- २००५ साली PIAने आपल्या सौदी भागीदाराचा हिस्सा विकत घेतला आणि हॉटेलची संपूर्ण मालकी मिळवली.
- त्यामुळे थेट अमेरिकेतील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठीत मालमत्ता थेट पाकिस्तान सरकारच्या मालकीची झाली.
कोविड महासाथीनंतर परिस्थिती बदलली
- पर्यटन क्षेत्रातील घसरण
- आर्थिक अडचणी
- अखेरीस हॉटेल बंद पडलं
पण ही अमेरिकन सरकारचा वरदहस्त कायम होता… त्यामुळे २०२३ साली न्यूयॉर्क प्रशासनाने हे हॉटेल स्थलांतरितांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. त्या करारातून पाकिस्तानला सुमारे २२० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळाले. त्यातून अमेरिकन सरकारचा वरदहस्त आणि मालमत्तेला तेव्हाही मोल होतंच हे सिद्ध झालं.
अमेरिका- पाकिस्तान नवीन भागीदारी
- अलीकडेच पाकिस्तान आणि अमेरिकन सरकारने या हॉटेलच्या पुनर्विकासासाठी करार केला.
- हा करार Steve Witkoff यांच्या मध्यस्थीने झाला.
- अमेरिकन सरकारचा General Services Administration (GSA) अर्थात तेथील सामान्य प्रशासन विभाग या प्रक्रियेत सरकारच्या वतीने सहभागी होता.
या करारात काय आहे?
- संयुक्त विकास
- देखभाल
- भविष्यात संयुक्त मालकीहक्क
या निर्णयामागचं मोठं भू-राजकारण
ही भागीदारी केवळ आर्थिक नाही तर ती राजनैतिक स्वरूपाची आहे.
पाकिस्तानने अलीकडे Iran आणि अमेरिकेच्या युद्धात मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली आहे.
त्यामुळेच –
- पाकिस्तानचं जागतिक महत्त्व वाढलं
- अमेरिकेसोबतचे संबंध मजबूत झाले
पाकिस्तानची भावी योजना
- जुनी इमारत पाडणे
- नवीन गगनचुंबी टॉवर उभारणे
- आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षित करणे
रूझवेल्ट हॉटेलची कथा आपल्याला काय सांगते?
- जागतिक स्तरावर मालमत्ता ही केवळ मालमत्ता नसते तर ती तुमचा प्रभाव, सत्ता आणि रणनीतिचं साधन असते
- एकेकाळी अमेरिकन उच्चभ्रू समाजाचं केंद्र असलेलं हे हॉटेल आज पाकिस्तानच्या आर्थिक आणि राजनैतिक धोरणाचा भाग ठरलं आहे.
- ही कहाणी एका हॉटेलची नाही तर ती आहे, दोन राष्ट्रांच्या महत्वाकांक्षेची, दीर्घकालीन विचारांची आणि जागतिक स्तरावर स्वतःची छाप सोडण्याच्या प्रयत्नांचा राजनैतिक भाग असण्याचीही!
