रिषभ शेट्टीचा ‘कांतारा’ अजूनही चित्रपटगृहांवर राज्य करतोय. जगभरात या चित्रपटाची दखल घेतली जात आहे. मात्र मध्यंतरी यातील ‘वराह रूपम’ गाण्यावर झालेल्या कायदेशीर कारवाईमुळे चित्रपट निर्माते आणि चाहते चांगलेच नाराज झाले होते, पण आता त्यांना दिलासा देणारं एक वृत्त समोर येत आहे. या चित्रपटातील हे लोकप्रिय गाणं पुन्हा चित्रपटात पुन्हा पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोझिकोड सत्र न्यायालयाने अधिकार क्षेत्राच्या अभावामुळे ‘थाईकुडम ब्रिज’ या म्युझिकल बॅन्डने केलेली याचिका फेटाळली आहे. थाईकुडम ब्रिज बँडसाठी हा मोठा धक्का आहे कारण कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर या प्रकरणाचा निकाल त्यांच्याच बाजूने लागेल असा त्यांना विश्वास होता. पण कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे आता पुन्हा या गाण्याच्या मूळ कलाकृतीबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

आणखी वाचा : ‘JNU’ मध्ये ब्राह्मणविरोधी घोषणा; शर्लिन चोप्राने केला तीव्र शब्दांत निषेध, म्हणाली, “केंद्र सरकार…”

कोर्टाने दिलेला हा निर्णय चित्रपट निर्मात्यांना तसेच चाहत्यांना दिलासा देणारा आहे. या चित्रपटातील हे गाणं आणि त्यातील त्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि अचानक या गाण्यावर कारवाई केल्याने प्रेक्षक आणि चाहते चांगलेच नाराज झाले होते.

नेमकं प्रकरण काय होतं?

रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचला आहे. हा चित्रपट सर्वप्रथम कन्नड भाषेमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. पुढे प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादानंतर निर्मात्यांनी चित्रपट इतर भाषांमध्ये डब करुन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात या चित्रपटाचा सिक्वेल येऊ शकतो अशी माहिती खुद्द रिषभ शेट्टी यांनी एका कार्यक्रमामध्ये दिली होती.

‘कांतारा’मधील ‘वराह रुपम’ हे गीत फार विशेष आहे. या गाण्यामध्ये श्रीविष्णू यांच्या वराह अवताराची स्तुती करण्यात आली आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. चित्रपटामध्ये या गाण्याला खास महत्त्व आहे. अजनीश लोकनाथ यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. तर साई विघ्नेश यांनी त्यासाठी पार्श्वगायन केले आहे.

काही दिवसांपूर्वी ‘थाईकुडम ब्रिज’ (Thaikkudam Bridge) या केरळमधील म्युझिकल बँडने कांताराच्या निर्मात्यांवर गाणं चोरल्याचा आरोप केला होता. ‘वराह रुपम’ हे गाणं २०१७ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘नवरसम’ या गाण्याची कॉपी असल्याचे त्यांनी म्हटले होते. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तसेच त्यांनी या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या विरोधामध्ये न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर केरळच्या कोझिकोड सत्र न्यायालयाने चित्रपटामधील ‘वराह रुपम’ हे गाणं काढण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशामुळे चित्रपटगृह आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर चित्रपटाचे स्क्रीनिंग सुरु असताना हे गीत दिसणार नसल्याचे स्पष्ट झालं होतं.

आणखी वाचा : ‘कांतारा’ची तुलना ‘तुंबाड’शी करणाऱ्यांना दिग्दर्शक आनंद गांधी यांनी फटकारलं; ट्वीट करत म्हणाले…

‘कांतारा’ अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे आणि प्रेक्षक त्याचा आस्वाद घेत आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण केले आहेत आणि अजूनही जगभरात १००० हून अधिक स्क्रीन्सवर हा चित्रपट सुरू आहे. ऑस्ट्रेलिया, यूके, कॅनडा, यूएई आणि यूएसएमध्येही या चित्रपटाने ५० दिवस पूर्ण केले आहेत. १६ कोटी बजेट असलेल्या चित्रपटाने ४०० कोटीहून अधिक कामाई करत बॉक्स ऑफिसवर वेगळाच इतिहास रचला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varah roopam song is now officially back in the film kantara kozhikode court dismissed the petition avn
First published on: 03-12-2022 at 19:02 IST