गेल्या काही वर्षांपासून दक्षिण चिनी समुद्रातील चीनची मक्तेदारी वाढत चालली आहे. त्याचा इतर देशांनाही त्रास होतोय. त्यामुळे दक्षिण चीन समुद्रातील इतर देशांनीही आपली सीमा सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. व्हिएतनामसुद्धा आक्रमकपणे दक्षिण चिनी समुद्रात बेट बांधत असून, आपल्या जलमार्गातील सीमा दिवसागणिक वाढवत आहे. अमेरिकेचे संशोधक अन् विविध थिंक टँकने दिलेल्या माहितीनुसार, व्हिएतनामच्या अलीकडील प्रयत्नांनी मागील दोन वर्षांच्या एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नातून व्हिएतनामने समुद्राला जवळपास जमिनीशी जोडले आहे. नोव्हेंबर २०२३ पासून व्हिएतनामने बेटांना जवळपास ६९२ एकर (२८० हेक्टर) जमीन जोडली आहे. खरं तर सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज (CSIS) येथील एशिया मेरिटाइम ट्रान्सपरन्सी इनिशिएटिव्ह (AMTI)ने ही माहिती दिली आहे.

व्हिएतनामने पुन्हा दावा केलेली एकूण जमीन जवळपास २३६० एकर असून, तीन वर्षांपूर्वी नोंदवलेल्या ३२९ एकरपेक्षा मोठी वाढ झाली आहे. वेगवान विस्ताराचा उद्देश या प्रदेशात व्हिएतनामची उपस्थिती मजबूत करणे हा आहे. दक्षिण चिनी समुद्रावर चीन, ब्रुनेई, मलेशिया, फिलिपिन्स, तैवान या देशांकडून दावे करण्यात आलेले आहेत. व्हिएतनामने २०२४ मध्ये बेट बांधण्याच्या कामाला गती दिली असून, दक्षिण चिनी समुद्रातील वाढत्या तणावादरम्यान जास्तीत जास्त जमिनीवर कब्जा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असंही AMTI रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vietnam is increasing its strength by building islands in the south china sea what is china role vrd