Vim Black Controversy: हिंदुस्तान युनिलिव्हरचे सर्वात यशस्वी उत्पादन म्हणून ओळखप्राप्त असणारा विम हा भांड्यांचा साबण सध्या बराच चर्चेत आला आहे. अलीकडेच विमने आपल्या भांडी घासायच्या लिक्विडची बॉटल रंग बदलून ब्लॅक विम अशा नावाने बाजारात सादर केली होती. स्त्री पुरुष समानतेचा संदेश देताना खास पुरुषांसाठी म्हणून वेगळा पॅक तयार करण्याची काय गरज असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण खरोखरच विमने एवढ्याच कारणासाठी हा नवा काळा विम आणला आहे का की यामागे आणखी काही गुपित आहे? पुरुषांसाठी तयार केलेल्या या पॅकला स्त्रियांचा कसा प्रतिसाद आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत..

काळा विम जाहिरात नेमकी काय आहे?

इंस्टाग्रामवर मॉडेल मिलिंद सोमण आणि MTVIndia यांनी विम लिक्विडच्या जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला होता. यात जिममध्ये एक तरुण आपण कशी आईला कशी भांडी घासण्यात मदत केली याबद्दल सांगताना दिसत आहे. हे ऐकून मिलिंद सोमण त्या तरुणाचं कौतुक करतो व त्याला ब्लॅक विम लिक्विड हातात देतो. बढाई मारण्याची गरजच नाही कारण आता पुरुषांसाठी सुद्धा भांडी घासणे हे सोपे होणार आहे असं मिलिंद सोमण या व्हिडिओमध्ये बोलताना आपण पाहू शकता. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून विमला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अशा सेक्सिस्ट जाहिरातीत काम करण्याची काय गरज असा प्रश्नही काहींनी सोमणला केला आहे.

Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
funny Puneri patya video
“फुकटच्या फुलांनी देवपूजा केल्यास..” पुणेरी पाटी चर्चेत; नेटकरी म्हणाले, “पुणेकर होण्यासाठी ..”

विमचे स्पष्टीकरण

दरम्यान, जाहिरातीवर आलेल्या प्रतिक्रिया पाहून स्वतः विमकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे “आम्ही ब्लॅक पॅकबद्दल गंभीर नाही, परंतु घरातील कामांच्या भागीदारीबद्दल आम्ही खूप गंभीर आहोत!” अशी पोस्ट विमने केली होती. अन्य एका पोस्टमध्ये, विमने पुन्हा हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला की घरातील कामे ही देखील पुरुषांची कामे आहेत आणि ते त्यांचे काम करून बढाई मारण्याचा अधिकार मिळवत नाहीत. यासाठी विमने समस्त पुरुष वर्गाला एक पत्र समर्पित केले होते.

समस्त पुरुषांना पत्र

“प्रिय पुरुषांनो, तुम्ही विम ब्लॅक बॉटलच्या मर्यादित आवृत्तीबद्दल बढाई मारत आहात पण त्यात हा एक तपशील विसरू नका. फक्त बाटली वेगळी आहे,आतील लिक्विड नाही. जर भांडी घासणे हे सगळ्यांसाठी सारखं आहे तर मग लिक्विडही एकच असणार ना? तुम्ही आता येत्या नववर्षात काय संकल्प घ्यायचा असा विचार करत असाल तर स्वतःची कामे स्वतः करण्याचा विचार पक्का करा. तुमचीच कामे तुम्ही केल्यावर बढाई मारण्याचा प्रश्नच येत नाही.

P.S. या मोहिमेदरम्यान कोणत्याही पुरुषाला इजा झाली नाही,”

पहिल्यांदाच नाही

घरातील कामे हे एकट्या महिलेचे काम नाही, असा संदेश देणारी देण्याची विमची ही पहिलीच वेळ नाही.

2020 मध्ये, त्याच्या ‘व्हॉट अ प्लेयर’ जाहिरातीमध्ये क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला भांडी घासताना दाखवण्यात आले होते तर 2021 मध्ये, ‘नजरिया बदलो, देखो बर्तनो से आगे (तुमचा दृष्टिकोन बदला, भांड्यांच्या पलीकडे पाहा)’ या टॅगलाइनसह विमने अनेक सुंदर जाहिराती बनवल्या होत्या. जाहिरातींपैकी एका जाहिरातीमध्ये एक पुरुष आणि स्त्री त्यांच्या लग्नाआधी भेटत असल्याचे दाखवले होते. तेव्हा भांडी घासण्यापासून ते बाकी सर्व कामांमध्ये स्त्री पुरुष कसे समान आहेत याबाबत संभाषण दाखवण्यात आले होते.

हे ही वाचा<< विश्लेषण: तुमचा फोन किती वॉटरप्रूफ आहे? आयपी कोड वरून ओळखा, सोपा तक्ता पाहून जाणून घ्या

Sexist जाहिराती

दरम्यान एकीकडे विमकडून समानतावादी जाहिराती सादर केल्या जात असताना आजही जगभरात अशा अनेक जाहिराती आहेत ज्यातून स्त्री व पुरुषांना एकाच भूमिकेत बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. २०२२ च्या सुरुवातीलाच लेअर्स शॉटच्या जाहिरातीवरून असा वाद सुरु झाला होता. यातून सेक्श्युअल हिंसाचाराला प्रेरणा दिली जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जूनमध्ये Twitter आणि YouTube ला Layer’r Shot जाहिरात काढून टाकण्यास सांगितले होते