ओडिशा राज्यात झालेल्या बालासोर येथील रेल्वे अपघातामध्ये २७८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १२०० प्रवाशी जखमी झाले. मागच्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा अपघात ठरला असला तरी रेल्वे अधिकाऱ्यांच्या मतानुसार, या अपघाताची तीव्रता जेवढी अपेक्षित होती, त्यापेक्षा कमी हानी झाली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लिंक हॉफमन बश (Linke Hofmann Busch) अर्थात एलएचबी डब्यांमुळे या अपघातामधील मृतांचा आकडा मर्यादीत राहिला. फर्स्टपोस्ट वेबसाईटने एलएचबी डब्यांची उपयुक्तता आणि त्याचा ओडिशाच्या अपघाताशी काय संबंध होता, यावर लेख प्रकाशित केला आहे. एलएचबी डबे लाल रंगाचे आणि जुने आयसीएफ डबे हे गडद निळ्या रंगाचे आहेत.

एलएचबी डबे म्हणजे नेमके काय?

न्यूज मिनिट या वेबसाईटवरील माहितीनुसार एलएचबी डबे जर्मन कंपनीने तयार केलेले आहेत. याचा विस्तार लिंक हॉफमन बश असा होतो. न्यूज १८ च्या बातमीनुसार, पंजाबमधील कपूरथळा येथील कारखान्यात या डब्यांची निर्मिती भारतीय रेल्वेमार्फत केली जाते. भारतात पहिल्यांदा १९९५ साली एलएचबी डबे वापरण्यास सुरूवात झाली. सीएनबीसीने दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर रेल्वेचे डबे एकमेकांवर आदळू नयेत, अशाप्रकारे याची रचना करण्यात आलेली आहे. जुन्या आयसीएफ (Integral Coach Factory) डब्यांपेक्षा हे डबे अधिक सुरक्षित आहेत, असे रेल्वेचे म्हणणे आहे.

Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

एलएचबी डब्यांचे वैशिष्ट्ये काय आहेत?

एलएचबी डब्यांमध्ये आधुनिक पद्धतीची सर्व वैशिष्ट्ये आहेत. जसे की, हायड्रॉलिक सस्पेन्शन सिस्टिम, डिस्क ब्रेक्स, बफर कपलिंग सिस्टिम, साईड सस्पेन्शन अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. न्यूज १८ ला रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या डब्यांची रचना अशी केलेली आहे की, जेव्हा अपघात घडतो, तेव्हा दोन डबे एकमेकांवर फारसे आदळत नाहीत. जेव्हा अपघात घडतो, तेव्हा निर्माण झालेल्या कायनेटिक एनर्जीला कमी करण्याचे काम हे डबे करत असतात. जसे की, दोन डब्यांच्या दरम्यान असलेली रबरी चौकट (जिथून आपण एका डब्यातून दुसऱ्या डब्यात ये-जा करतो) आणि शौचालयाच्या खाली असलेला गोलाकार पाईप अपघाताच्यावेळी जो दाब निर्माण होतो, तो दाब शोषून घेण्याचे काम करतात. त्यामुळे डब्यात बसलेल्या प्रवाशांना रेल्वेच्या धडकेचा फार त्रास होत नाही.

तर जखमींचा आकडा वाढला असता

एलएचबी डब्याच्या आतील रचनाही प्रवाशांना कमी इजा देणारी असते. न्यूज १८ शी बोलताना एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, आयसीएफ डब्याच्या रेल्वेचा अपघात झाल्यास अधिक प्रवाशी जखमी होतात. जसे की, मोठा स्टिलचा राक्षस एखाद्या पहाडाला टकरावा, अशी स्थिती आयसीएफ डब्यांची अपघातानंतर होते. कोरोमंडल अपघातामध्ये जखमी होण्याची शक्यता १२ पटीने कमी झालेली आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दर एलएचबीचे डबे नसते तर मृतांचा आणि जखमींचा आकडा अधिक वाढू शकला असता.

कोरोमंडल एक्सप्रेस आणि बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस या दोन्ही रेल्वेंना एलएचबी डबे होते. सध्या जी अपघाताची जी भीषणता दिसली, ती दोन्ही रेल्वेच्या वेगामुळे झाली. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, कोरोमंडल आणि बंगळुरु-हावडा एक्सप्रेसमध्ये एलएचबी डबे असल्यामुळे अपघात झाल्यानंतर ते एकमेकांवर गेले नाहीत. पण आता जो काही अपघात झाला तो मालगाडीवर वेगात आदळल्यामुळे झाला.

भारतीय रेल्वे आणि एलएचबी

जर्मन कंपनीला अल्स्टॉम ट्रान्सपोर्ट डशलँड कंपनीने ताब्यात घेतल्यानंतर या डब्यांना आता अल्स्टॉम एलएचबी म्हटले जाते. अल्स्टॉम एलएचबीच्या नव्या डब्यांना भारतात डिसेंबर २००२ साली प्रवेश मिळाला. या डब्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले.

सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, एलएचबी डबे बनविण्याचे काम भारतात तीन ठिकाणी केले जाते. इंटेग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ चेन्नई), रेल कोच फॅक्टरी (आरसीएफ कपूरथळ) आणि मॉडर्न कोच फॅक्टरी (एमसीएफ – रायबरेली) याठिकाणी एलएचबीचे निर्माण होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (SECR) १९ रेल्वेमध्ये एलएचबी डबे बदलून घेतले आहेत. SECR च्या १९ ट्रेनमध्ये ६२४ एलएचबी डबे बसविण्यात आले आहेत.

द न्यूज मिनिटने दिलेल्या बातमीनुसार, २०१६ साली संसदिय समितीने रेल्वे सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबतचा अहवाल सादर केला. त्या अहवालात एलएचबी डब्यांमुळे अपघातात जखमी होणाऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे सांगण्यात आले. संसदिय समितीने सर्वच रेल्वेना हे डबे बसवावेत, असेही सुचित केले आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने ३३ हजार एलएचबी डब्यांचे उत्पादन केले आहे. फेब्रुवारी महिन्यात रेल्वे विभागाने ट्विट करत माहिती दिली की, वर्ष २०२२-२३ मध्ये ४,१७५ एलएचबी डब्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

ओडिशा रेल्वे अपघाताची भीषणता

ओडिशा रेल्वे अपघातामध्ये ४० प्रवाशांच्या मृतदेहावर जखमी होण्याच्या कोणत्याही खुना आढळलेल्या नाहीत. विद्युत प्रवाहाचा तीव्र झटका लागल्यामुळे हे मृत्यू झाले असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. तर १०० हून अधिक मृतदेहांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे त्यांना रुग्णालयातील शयागारात ठेवण्यात आलेले आहे.

बालासोर अपघाताबाबत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये विद्युत प्रवाहाचा झटका लागून काही लोकांचा मृत्यू झाल्याबाबत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक पी कुमार नायक यांनी सांगितले की, अनेक प्रवाशी रेल्वेची टक्कर झाल्यामुळे जखमी झाले, तर काही लोक ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्यामुळे विद्युत प्रवाहाचा तीव्र झटका लागून त्यांचा मृत्यू झाला. तीन ट्रेनची एकमेकांना धडक झाली असता ओव्हरहेड वायरचा संपर्क डब्याशी झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंगळवारी सीबीआयने बालासोर जीआरपीकडून ही प्रकरण स्वतःच्या ताब्यात घेतले.