-मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेश, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या तापी महाकाय पुनर्भरण प्रकल्पाचा (तापी मेगा रिचार्ज) नवीन सविस्‍तर प्रक‍ल्‍प अहवाल तयार करण्‍याचे निर्देश केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र शेखावत यांनी अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत दिले असले, तरी या प्रकल्‍पाला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्‍यकता आहे. तूर्तास निधी मिळणे कठीण असल्यानेच या योजनेचे काम रखडल्याची स्थिती आहे. प्रकल्‍पाच्या प्रारंभिक कामास तत्कालीन केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारतींच्या दौऱ्यानंतर गती देण्यात आली होती. नंतर मात्र या योजनेचे काम रेंगाळले आणि पाच वर्षांनंतरही हे काम ‘डीपीआर’ तयार करण्याच्या पुढे जाऊ शकलेले नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happened with tapi mega recharge project maharashtra print exp scsg
First published on: 15-11-2022 at 09:15 IST