Independence Day 2022: Har Ghar Tiranga Campaign: भारत यंदा स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. ही मोहीम म्हणजे आजादी का अमृत महोत्सवमधील महत्वाचा भाग आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभरामध्ये वेगवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित हा उत्सव १३ ते १५ ऑगस्टदरम्यान साजरा होणार असला तरी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला २ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली? जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण

हर घर तिरंगा मोहिमेचा महत्वाचा हेतू हा लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा असा आहे. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांनी आपआपल्या घरांवर तिरंगा फडकवावा या हेतूने सरकारने ही मोहीम सुरु केली असून या माध्यमातून देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न आहे. तसेच या माध्यमातून भारतीय झेंड्यासंदर्भातील वेगवेगळ्या गोष्टी अधिक अधिक लोकांना जाणून घ्याव्यात असा सुद्धा हेतू आहे.

BJP Victory On 4th June Morning People Taunts By Sharing Attack Video
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्येच झाली हाणामारी आणि दोष मात्र.. प्रचारयात्रेचा Video पाहून पडाल बुचकळ्यात, खरं काय?
story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
Nagpur, Rain, Pm Narendra Modi,
नागपूर : मोदींच्या सभास्थळी पावसाचे पाणी, शिंदेंकडून मध्यरात्री पाहणी
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यात बदल ?

या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ ऑगस्ट २०२२ रोजी देशातील लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील डिस्प्ले फोटो म्हणजेच डीपी म्हणून तिरंग्याचा फोटो ठेवण्याचं आवाहन केलं. याशिवाय देशातील शैक्षिणक संस्थांनी ‘हर घर तिरंगा’ प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा आणि इतर स्पर्धांचं आयोजन करणार आहेत ज्या माध्यमातून मुलांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होईल. आपल्या घरी झेंडा लावताना सर्वांनीच झेंड्यासंदर्भातील नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.

उदाहरण द्यायचं झालं तर झेंड्यासंदर्भातील २००२ च्या सुधारित नियमांनुसार राष्ट्रध्वज हा उलटा फडवला जाऊ नये. राष्ट्रध्वज जमीनीवर पडता कामा नये. राष्ट्रद्धवज फाटलेला किंवा मळलेला असू नये. याशिवाय राष्ट्रध्वजाचा वापर अंगाभोवती गुंडाळण्यासाठी करु नये. त्याचप्रमाणे राष्ट्रध्व रुमालांवर छापण्यासाठी किंवा कपड्यांवर छापू नये.

आपल्या घरात लावलेल्या झेंड्याचे फोटो नागरिकांना हर घर तिरंगा डॉट कॉमवर अपलोड करता येतील. याच वेबसाईटवर नागरिकांना या मोहिमेमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्रही डाऊनलोड करता येईल. १ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार ५० लाखांहून अधिक झेंडे छापून झाले असून या वेबसाईटवर तिरंग्यासोबत सात लाखांहून अधिक लोकांनी सेल्फी फोटो अपलोड केलेत.

हर घर तिरंगा प्रमाणपत्र कसं डाऊनलोड करावं यासंदर्भात-

१) http://www.harghartiranga.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

२) तिथे प्रोफाइल फोटो हा पर्याय निवडा.

३) त्यानंतर रिकाम्या रकान्यांमध्ये विचारलेली माहिती भरा. यात व्यक्तीचं नाव, फोन नंबर अशा तपशीलाचा समावेश असेल. गुगल अकाऊंटवरुनही या पेजवर थेट माहिती भरता येईल.

४) तुमची लोकेशन अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी वेबसाईटला द्या.

५) तुमचा फोटो साईटवर अपलोड करा.

६) त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणावर आहात तेथील तपशीलासहीत तुम्हाला प्रमाणपत्र उपलब्ध होईल. ते डाऊनलोड करा.

महाराष्ट्रासहीत काही राज्यांनी दिले विशेष निर्देश
काही राज्यांत स्थानिक राज्य सरकारांनी या मोहिमेला समर्थन दर्शवताना ती यशस्वी होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. महाराष्ट्र सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्यातील सरकारी सहकारी संस्थांना प्रत्येक सोसायटीमध्ये झेंडावंदन करण्यासंदर्भातील निर्देश दिलेत. सर्व सरकारी आणि निमसरकारी इमारतींनाही हाच नियम लागू करण्यात आलाय.

स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील २० कोटी घरांवर झेंडा फडकवण्यात येईल असं सांगण्यात आलंय. बोंगनगाव येथील कारखान्याला योगी सरकारने झेंडे बनवण्यासंदर्भातील कंत्राट दिलं असून एवढ्या मोठ्या प्रमाणात झेंडे तयार करण्यासाठी या कारखान्यामध्ये दिवस-रात्र काम सुरु आहे.