माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर सध्या चर्चेत आहे. त्याने आपल्या हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपीचा वापर करून त्याने स्वतःला मुलीमध्ये रूपांतरित करून घेतले आहे. या शस्त्रक्रियेद्वारे आता त्याने स्वतःची नवीन ओळख तयार केली आहे. २३ वर्षीय आर्यनने स्वतःची ओळख अनाया बांगर अशी केली आहे. काय आहे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी? याची प्रक्रिया काय? या शस्त्रक्रियेचे काय दुष्परिणाम होतात? त्या विषयी सविस्तर जाणून घेऊ.

आर्यनपासून अनायापर्यंतचा प्रवास

अनाया बांगर ही डाव्या हाताने फलंदाजी करते. ती तिच्या वडिलांप्रमाणेच इस्लाम जिमखाना या स्थानिक क्लबसाठी क्रिकेट खेळते. लिसेस्टरशायरच्या हिंकले क्रिकेट क्लबकडून खेळताना तिने उत्तम कामगिरी केली होती. सोशल मीडियावर तिने तिचा मुलापासून मुलगी होण्याचा प्रवास शेअर केला. अनायाने तिच्या १० महिन्यांच्या प्रवासाची माहिती देणारी पोस्ट शेअर केली होती; ज्यात तिने फलंदाज विराट कोहली आणि माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीबरोबर काढलेले फोटोही शेअर केले होते. मात्र, काही वेळानंतर तिने ती पोस्ट हटवली. हटवलेल्या व्हिडीओमध्ये तिने लिहिले होते की, क्रिकेट खेळण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप त्याग केला, पण या खेळापलीकडेही माझा स्वतःच्या शोधाचा प्रवास आहे; हा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?

काय आहे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी?

हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (एचआरटी) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपचाराचा वापर शरीरातील इस्ट्रोजीनची कमतरता भरून काढण्यासाठी केला जातो. ‘एनडीटीव्ही’नुसार संप्रेरक विकार, थायरॉईड समस्या, रजोनिवृत्ती आणि लिंग बदल यांसह अनेक परिस्थितींवर उपचार करण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. या सर्व समस्यांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांची पातळी एकदम खालावते. लिंग बदलण्यासाठी, त्यात जेंडर अफरमिंग हार्मोन थेरपीचा (जीएएचटी) वापर केला जातो. ही एक उपचार पद्धती आहे, जी ट्रान्सजेंडर किंवा लिंग न जुळणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या दुय्यम लिंग वैशिष्ट्यांशी जुळण्यास मदत करण्यासाठी वापरली जाते. ही थेरपी वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित असल्याचे आणि रुग्णाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.

हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीची प्रक्रिया काय?

हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचे दोन प्रकार आहेत, ते म्हणजे स्त्रीलिंग किंवा पुरुषत्वावर आधारित थेरपी. अनायाच्या बाबतीत, फेमिनायझिंग हार्मोन थेरपी (एफएचटी) करण्यात आली, ज्याचा उपयोग स्त्रीलिंगी गुण विकसित करण्यासाठी केला जातो. जसे की मऊ त्वचा, चेहऱ्यावरील केसाची वाढ कमी करणे, स्तनाची ऊती यांसारख्या गोष्टी विकसित होतात. थेरपीमध्ये एस्ट्रोजेन आणि अँटीएंड्रोजेन्सचा वापर केला जातो. इस्ट्रोजेन मऊ त्वचा, तेलकटपणा कमी करणे, नितंब, नितंब आणि चेहऱ्यावरील चरबी वाढविण्यास आणि स्तनांच्या वाढीस प्रोत्साहन देते, तर अँटीएंड्रोजन थेरपी टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन अवरोधित करते, स्नायूंचे प्रमाण कमी करते, अंडकोष लहान करते आणि चेहरा व शरीरावरील केसाची वाढ मंद करते.

ही उपचार पद्धती प्रत्येक व्यक्तीच्या गरजा आणि प्राधान्यांवर अवलंबून आहे. यात व्यक्तीला हार्मोन्स गोळ्या, इंजेक्शन्स किंवा त्वचेच्या पॅचद्वारे औषध दिले जाऊ शकतात. एचआरटीचा उपचार कालावधी प्रत्येक व्यक्तीच्या गरजा आणि आरोग्याच्या उद्दिष्टांनुसार बदलतो. उपचार घेतल्यानंतर काही आठवड्यांत शरीरात होणारे बदल स्पष्ट दिसतात, मात्र तरी पूर्ण परिणाम अनुभवायला सहा महिने लागू शकतात. इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी सामान्यत: १८ ते २५ महिन्यांचा कालावधी लागतो. वैद्यकीय निरीक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की, काही रुग्णांना बरे होण्यासाठी दीर्घ उपचारांची आवश्यकता असते.

या शस्त्रक्रियेचे फायदे आणि जोखीम काय?

हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही ट्रान्सजेंडर स्त्रिया आणि लिंगाविषयी स्पष्टता नसलेल्या लोकांसाठी सुधारित मानसिक, शारीरिक आणि लैंगिक फायदे प्रदान करणारा वैद्यकीय उपचार आहे. ही उपचार पद्धती एखाद्या व्यक्तीची लिंग ओळख आणि शारीरिक गुणधर्म जोडण्यासह, आत्म-सन्मान वाढवण्यास मदत करू शकते. परंतु, या शस्त्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. थेरपीमुळे थ्रोम्बोइम्बोलिझम, वंध्यत्व, उच्च पोटॅशियम, हायपरट्रिग्लिसरिडेमिया, वजन वाढणे, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार, सेरेब्रोव्हस्कुलर रोग, मेनिन्जिओमा, जास्त लघवी लागणे, निर्जलीकरण, पित्ताशयात खडे, उच्च रक्तदाब, इरेक्टाइल डिसफंक्शन तसेच ऑस्टिओपोरोसिस आणि हायपर प्रोलॅक्टिनेमियाचा धोका वाढू शकतो.

हेही वाचा : ‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?

अनाया तिच्या पोस्टमध्ये काय म्हणाली?

व्हिडीओ शेअर करण्याचा एक धाडसी निर्णय घेतल्यानंतर अनाया आता वेदनादायक वास्तवाला सामोरे जात आहे. “हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) वर एक ट्रान्स वुमन म्हणून माझ्या शरीरात प्रचंड बदल झाला आहे. मी स्नायूंचे द्रव्यमान, ताकद, स्नायूंची शक्ती आणि ॲथलेटिक क्षमता गमावत आहे, पूर्वी मी यावर अवलंबून होते. माझा आवडणारा खेळ माझ्यापासून दूर जात आहे,” असे तिने आणखी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले. तिने अधोरेखित केले की, क्रिकेटमध्ये ट्रान्स महिलांसाठी कोणतेही योग्य नियम नाहीत; ज्यामुळे तिला क्रिकेट सोडणे भाग पडले.

Story img Loader