करोना विषाणूमुळे संपूर्ण जगाचे अपरिमित हानी झाले. या महासाथीच्या तडाख्यातून नुकतेच सावरत असताना जगासमोर आता मारबर्ग विषाणूचे (Marburg virus) संकट उभे ठाकले आहे. या विषाणूची लागण होऊन टांझानिया देशात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याच कारणामुळे मारबर्ग विषाणू नेमका काय आहे? या विषाणूची लागण झाल्यानंतर काय लक्षणं जाणवतात? विषाणूची लागण झाल्यानंतर उपचार कसे केले जातात? यावर नजर टाकू या.

हेही वाचा >>> विश्लेषण : नवरोज सणाचे महत्त्व काय? कुर्दीश, पारसी समाजात तो कसा साजरा केला जातो?

Malaysia Military Helicopters Crash
मलेशियामध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेत भीषण धडक; १० जणांचा मृत्यू, घटनेचा व्हिडीओ समोर
dubai rain (1)
दुबईतील पूरस्थितीला कृत्रिम पाऊसच ठरला का कारणीभूत?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे

आतापर्यंत एकूण पाच जणांचा मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार टांझानियाच्या उत्तर-पश्चिम भागातील कागेरा प्रदेशात मारबर्ग विषाणूची लागण झालेल्या एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संपर्कात आलेल्या १६१ जणांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्या प्रकृतीवर आरोग्य प्रशासन लक्ष ठेवून आहे. तसेच या भागात आपत्कालीन प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले असून कागेरा भागाव्यतिरिक्त अन्य प्रदेशात या विषणूचा संसर्ग अद्याप आढळलेला नाही. महिन्याभरापूर्वी Equatorial Guinea या आफ्रिकन देशात मारबर्ग विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले होते. १३ फेब्रुवारीपासून येथे नऊपैकी सात रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : राहुल गांधींच्या अपात्रतेनंतर इंदिरा गांधींवरील कारवाईची चर्चा; कोर्टाच्या एका निर्णयानंतर देशात लागू केली होती आणीबाणी!

मारबर्ग विषाणू काय आहे?

मारबर्ग विषाणूची लागण झाल्यानंतर होणाऱ्या आजाराला मारबर्ग व्हायरस डिसिज (एमव्हीडी) म्हटले जाते. या आजाराला अगोदर हिमोरॅजिक ताप म्हटले जायचे. हा आजार गंभीर स्वरूपाचा आहे. वटवाघूळ या आजाराचे नैसर्गिक वाहक असल्याचे म्हटले जाते. युगांडा देशातून आफ्रिकन ग्रीन मंकींच्या माध्यमातून या विषाणूचा मानवाला संसर्ग झाला, असेही सांगितले जाते. हा विषाणू सर्वांत अगोदर जर्मनीमधील मारबर्ग,फ्रँकफर्ट आणि सर्बियामधील बेलाग्रेड येथे १९६७ साली आढळला होता. या विषाणूची लागण झाल्यानंतर सरासरी मृत्यूदर ५० टक्के आहे. विषाणूच्या संहारकतेनुसार हा मृत्यूदर कमीतकमी २४ टक्के तर जास्तीत जास्त ८८ टक्के आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: आधुनिक फॅशन ट्रेण्डमध्ये ‘इंडिगो ब्लू’ आला कुठून?

मारबर्ग विषाणूची लागण झाल्यानंतर कोणती लक्षणं जाणवतात?

मारबर्ग विषाणूची लागण झाल्यानंतर २ ते २१ दिवसांमध्ये लक्षणं जाणवायला सुरुवात होते. एव्हीडीमुळे तीव्र ताप येतो, स्नायुदुखी, तीव्र डोकेदुखी असा त्रास होतो. लक्षणं दिसू लागल्यानंतर साधारण तिसऱ्या दिवशी पोटदुखी, उलटी, तीव्र अतिसाराचा त्रास होतो. पाच ते सात दिवसांमध्ये रुग्णाचे नाक, हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो. तसेच उलटी, मलविसर्जनादरम्यान रक्तस्त्राव होतो. लक्षणं दिसू लागल्यानंतर आठव्या किंवा ननव्या दिवशी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

हेही वाचा >>> विश्लेषण : व्याजदर वाढीचे चक्र ‘दुष्टचक्र’ ठरेल काय?

मारबर्ग विषाणूची लागण झाल्यानंतर उपचार कसा केला जातो?

मरबर्ग विषाणूची लागण झालेली ओळखणे वैद्यकीयदृष्या कठीण काम आहे. मात्र नमुन्यांची चाचणी केल्यानंतर या विषाणूची लागण ओळखता येऊ शकतो. सध्यातरी या विषाणूवर लस उपलब्ध नाही. मात्र अन्य औषधं देऊन एमव्हीडीपासून मुक्त होता येते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार तोंडाद्वारे किंवा इंट्राव्हेनस रिहायड्रेशन फ्ल्यूड्सच्या मदतीने रुग्णाला मृत्यूचा दाढेतून वाचवता येऊ शकते.