पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून धडाकेबाज भाषण केले. या भाषणात त्यांनी देशाच्या आगमी वाटचालीवर भाष्य केले. तसेच महिला, युवकांच्या प्रगतीवरही मत व्यक्त करत त्यांनी काय करायला हवे, याबद्दल सांगितले. या भाषणात त्यांनी देशाला पुढील २५ वर्षांत विकसित देश म्हणून ओळख मिवळून द्यायची आहे, असा संकल्प देशवासीयांना संबोधून केला. दरम्यान, त्यांनी या भाषणात ‘अमृत काळ’ या शब्दाचा अनेकवेळा वापर केला. मोदींनंतर आता अर्थमंत्री नीर्मला सीतारामन यांनीदेखील अमृत काळ असा उल्लेख केला. त्यानंतर आता अमृत काळ म्हणजे नेमके काय? असा प्रश्न विचारला जातोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> विश्लेषण : तरुण पिढी मद्यपान करत नसल्याने जपानची वाढली चिंता; खप वाढवण्यासाठी स्पर्धेचं आयोजन, जाणून घ्या नेमकं प्रकरण

अमृत काळ म्हणजे काय?

अमृत काळ हा शब्द मूळचा वैदिक ज्योतिषातील शब्द आहे. कोणताही उपक्रम किंवा काम सुरू करण्यासाठीची योग्य वेळ म्हणजेच अमृत काल असे म्हटले जाते. कोणत्याही मोठ्या यशाला गवसणी घालायची असेल तर त्यासाठी प्रयत्न करण्याची योग्य वेळ म्हणजेच अमृत काळ म्हटले जाते. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात महत्त्वाकांक्षी तरुणांबद्दल भाष्य केले. त्यांच्यासाठीही हा अमृत काळ आहे असे मोदींना सांगायचे होते.

हेही वाचा >> विश्लेषण : भारतातील फिल्मफेअर सोहळ्याला इतके महत्व का दिले जाते? जाणून घ्या

मोदी आपल्या भाषणात काय म्हणाले होते?

मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात देशाच्या आगामी २५ वर्षांच्या वाटचालीवर भाष्य केले. भारताच्या १३० कोटी जनतेसाठी आगामी २५ वर्षे खूप महत्त्वाची आहेत. याच काळाला मोदी यांनी अमृत काळ म्हटले आहे. त्यांनी देशातील तरुणांवर विश्वास असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्र जी स्वप्न पाहात आहे, ते तरुण पूर्ण करू शकतात, असेही मोदी म्हणाले होते.

हेही वाचा >> विश्लेषण : यूपीआय व्यवहारावर शुल्क आकारणार नाही, अखेर अर्थ मंत्रालयाला स्पष्टीकरण का द्यावे लागले?

देशाला संबोधित करताना त्यांनी देशाला ‘पंचप्रण’ दिले. भारतीयांनी गुलमीची मानसिकता सोडावी. आपल्या वारशाप्रती अभिमान बाळगावा. नागरिकांमध्ये एकता आणि एकजुटता असायला हवी. तसेच नागरिकांनी त्यांची कर्तव्ये पार पाडावीत, असे आवाहन मोदी यांनी जनतेला केले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is meaning of amrit kaal word used by narendra modi on independence day prd
First published on: 22-08-2022 at 20:35 IST