G-Pay, PayTM, PhonePe ॲपवरील व्यवहारांना अतिरिक्त ‘चार्ज’ लागणार?

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) युपीआय व्यवहारांबाबत स्पष्टता आणणारे परिपत्रक काढले आहे. यानुसार यापुढे UPI द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांबाबत माहिती देण्यात आली आहे.

is upi payment safe
UPI व्यवहारांवर शुल्क भरावे लागणार का? वाचा NPCI काय म्हटले?

Upi Payments New Rule From 1st April : हल्ली पानटपरी, फेरीवाल्याची गाडीर, चहाचा स्टॉल, मोठ्या हॉटेलपासून स्टेशनरीच्या दुकानांपर्यंत सगळीकडे यूपीआय व्यवहार केले जात आहेत. कुठेही काहीही खरेदी करा? ग्राहक दुकानदाराकडे स्कॅनर कोड मागतात. विविध यूपीआय कंपन्यांनी दुकानदारांना कोडसाठी छानसे कार्ड बनवून दिलेली आहेत. दुकानदार ती पुढे करतात आणि झटक्यात पेमेंट होऊन जाते. काही दुकानांत तर आता यूपीआयद्वारे पेमेंट झाल्यानंतर किती पैसे दिले, हे मोठ्याने सांगणाऱ्या मशीनदेखील आल्या आहेत. त्यामुळे दुकानदाराला प्रत्येकवेळी एसएमएस तपासावा लागत नाही. यूपीआयचा एवढा प्रसार झालेला असताना अचानक या व्यवहारांवर आता अतिरिक्त चार्जेस लागणार असल्याची बातमी काल (दि. २९ मार्च) पसरली. ही बातमी पसरताच यूपीआय व्यवहारांना सरावलेल्या लोकांना थोडीशी चिंता वाटली, मात्र नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लगेचच परिपत्रक काढून याबाबत भूमिका स्पष्ट केली. यूपीआय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लागणार का? याबाबत माहिती घेऊ.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही रिटेल पेमेंट्स आणि अशा व्यवहारात निवाडा करणारी यंत्रणा आहे. काल यूपीआय पेमेंटवर अतिरिक्त शुल्क लागणार असल्याची बातमी पसरल्यानंतर एनपीसीआयने पत्रक काढून बँक खात्यातून बँक खात्यात होणाऱ्या यूपीआय व्यवहारांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नसल्याचे सांगितले. देशातील सर्वाधिक ९९.९ टक्के UPI व्यवहार फक्त बँक खात्यांद्वारे केले जातात, असेही एनपीसीआयने सांगितले.

हे वाचा >> ‘यूपीआय’ कात टाकणार!

मग नेमके काय बदल झाले?

एनपीसीआयने स्पष्ट केले की, अतिरिक्त शुल्क हे फक्त पीपीआय (Prepaid Payment Instrument) व्यवहारांसाठी लागणार आहे. मात्र याचा भार ग्राहकावर पडणार नसून, पीपीआय वापरणाऱ्या व्यापऱ्याला ते शुल्क द्यावे लागणार आहे. काल संध्याकाळी (दि. २९ मार्च) काही माध्यमांनी बातम्या देताना सांगितले की, दोन हजार रुपयांच्या वर होणाऱ्या व्यवहारांसाठी आता १.१ टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. एनपीसीआयच्या परिपत्रकाचा हवाला देऊन या बातम्या दिल्या गेल्या. त्यामुळे एनपीसीआयकडूनही तात्काळ स्पष्टीकरण देऊन ही, शुल्क भरण्याची, शक्यता नाकारण्यात आली.

पीपीआय (PPI) व्यवहार काय आहेत?

ऑनलाईन वॉलेटच्या (wallet) माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहारांना पीपीआय म्हणजे ‘प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट’ व्यवहार म्हणतात. या wallets मध्ये Paytm Wallet, Amazon Pay Wallet, PhonePe Wallet, OLA Wallet यांचा आणि प्रीपेड गिफ्ट्स कार्ड्सचा समावेश आहे. एकाच ॲपमधून वारंवार व्यवहार करत असताना ग्राहक काही ठारावीक रक्कम ॲपच्या वॉलेटमध्ये जमा करून ठेवतात. ही रक्कम यूपीआय किंवा कार्ड पेमेंटमध्ये संबंधित ॲपच्या वॉलेटमध्ये वळती केलेली असते. तसेच काही कंपन्यांकडून ग्राहकांना गिफ्ट कार्ड्स दिली जातात. या गिफ्ट कार्डसाठी आगाऊ रक्कम बँकेत भरलेली असते.

हे वाचा >> विश्लेषण: भारताच्या UPI सिस्टीममध्ये PayNow ची जोडणी; या बदलाने नेमका तुम्हाला कसा फायदा होणार?

एनपीसीआय (NPCI) चे पत्रक काय सांगते?

एनपीसीआयने ट्विटरवर पत्रक पोस्ट करून आपली भूमिका मांडली आहे. नियामक मंडळाने नुकत्याच दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीपीआय वॉलेटला आता इंटरऑपरेबल UPI इकोसिस्टमचा एक भाग होण्याची परवानगी मिळाली आहे. नवे इंटरचेंज चार्ज फक्त PPI मर्चंट ट्रान्झॅक्शन्सवर लागू होणार आहेत. यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, असे या पत्रकात म्हटले आहे.

म्हणजे यूपीआय व्यवहारांना शुल्क द्यावे लागणार नाही?

यूपीआय खाते हे बँक खात्याशी संलग्न आहे. यातून इतर यूपीआय आयडीसोबत होणारा व्यवहारदेखील बँक खात्याद्वारे केला जातो. बँक टू बँक होणाऱ्या अशा व्यवहारांची संख्या ९९.९ टक्के एवढी आहे. अशा व्यवहारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 12:13 IST
Next Story
ट्विटरमध्ये १५ एप्रिलपासून मोठे बदल; फक्त ब्लू टिक असलेल्यांनाच मिळणार विशिष्ट लाभ
Exit mobile version