देशातील फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या स्विगीने आपल्या कर्मचाऱ्यांकरिता एका नव्या योजनेची घोषणा केली. या योजनेला ‘मूनलाईट पॉलिसी’ असे नाव देण्यात आले आहे. दिले आहे. कर्मचाऱ्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्व विकास, छंद, आवडीनिवडी या सगळ्या गोष्टींवर काम करता यावे. तसेच रोजच्या कामाच्या दगदगीतून त्यांच्या आवडीचे काम त्यांना करण्याची परवानगी या योजनेतंर्गत कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. अशा प्रकारची योजना आणणारी स्विगी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- विश्लेषण : राष्ट्रीय क्रीडा उत्तेजक प्रतिबंधक विधेयक काय आहे? त्याची गरज काय?

काय आहे मून लाईट पॉलिसी

या योजनेनुसार स्विगीचे कर्मचारी त्यांचे ऑफिस कामाचे तास संपल्यावर, सुट्टीची दिवशी कुठल्याही स्वयंसेवी संस्था, सोशल मीडियावर काम करणाऱ्या संस्थांमध्ये काम करण्याची मुभा त्यांना राहील. आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रोजच्या कामाबरोबरच स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडेही लक्ष द्यावे, त्यांनाही आनंद वाटेल असे काम करता यावे असा या योजनेचा उद्देश आहे.

मून लाईट पॉलिसी विशेष का आहे?

स्विगीच्या मून लाइट पॉलिसीनुसार, कंपनीचे कर्मचारी त्यांच्या कामाच्या वेळेनंतर इतर कोणतेही काम करण्यास मोकळे असतील. परंतु याचा कंपनीच्या उत्पादकतेवर परिणाम होणार नाही याची काळजी कर्माचाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की दुसरी नोकरी म्हणून तुम्ही कोणत्याही एनजीओमध्ये काम करू शकता, डान्स इन्स्ट्रक्टर म्हणून काम करू शकता किंवा इतर कोणत्याही प्रोजेक्टवर काम करू शकता. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ही पॉलिसी आणली आहे.

हेही वाचा- विश्लेषण : विदा संरक्षण विधेयक मागे का घेतले?

सुमारे ५००० कर्मचारी स्विगीमध्ये काम करतात

मिळालेल्या माहितीनुसार, स्विगीमध्ये सध्या सुमारे ५००० कर्मचारी काम करतात. या पॉलिसीमागचे मोठे कारण सांगताना कंपनीने म्हटले आहे की, आम्ही नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांच्या इच्छा समजून घेण्याचा आणि त्यांच्या उदयोन्मुख गरजांनुसार पॉलिसी बदलण्याचा प्रयत्न केला आहे. स्विगीच्या मते, त्यांनी सुरू केलेली पॉलिसी संबंधित क्षेत्रातील अशा प्रकारची पहिलीच पॉलिसी आहे.

धोरणाची अंमलबजावणी करणे सोपे नाही

मून लाइट पॉलिसीबद्दल मधुरिमा भाटिया, मार्कोम आणि कंटेंट लीड, इप्सॉस इंडियाचा असा विश्वास आहे की पारंपरिक कंपन्यांसाठी मून लाईटसारखे धोरण लागू करणे सोपे नाही. स्विगी सारख्या कंपन्या असे धोरण सहज राबवू शकतात कारण त्यांचे काही कर्मचारी कंत्राटी तत्वावर आहेत. अशा कर्मचाऱ्यांसाठी मून लाईट पॉलिसी चांगली संधी ठरू शकते.

हेही वाचा- विश्लेषण : लंपी व्हायरस काय आहे? गुजरात आणि राजस्थानमध्ये या आजारामुळे गुरांचा मृत्यू का होत आहे?

६५% लोक अर्धवेळ नोकरी करतात

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने ४०० लोकांवर केलेल्या सर्वेक्षणात एक धक्कादायक तथ्य समोर आले आहे की जे लोक घरून काम करतात त्यापैकी सुमारे ६५ टक्के लोक काम करतात किंवा अर्धवेळ काम शोधतात.

अॅमेझॉनचीही मून लाईटसारखी पॉलिसी आहे

अॅमेझॉन कंपनीचीसुद्धा अॅमेझॉन फ्लेक्स नावाची पॉलिसी आहे. ही पॉलिसी कंपनीच्या वितरण भागीदारांसाठी तयार केली आहे. कंपनीचे वितरण भागीदार त्यांची शिफ्ट संपल्यानंतर इतर कोणतेही काम करण्यास मोकळे असल्याची माहिती अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने दिली आहे.
तसेच एक्सफेनोचे सह-संस्थापक कमल कारंथ यांनी मून लाइट पॉलिसीला फक्त पीआर स्टंट मानला आहे. कोणत्याही कारणाने कंपनीच्या उत्पादकतेत घट झाल्यास त्यासाठी मून लाईट पॉलिसी जबाबदार असेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is swiggys moonlight policy how employees can earn more money dpj
First published on: 06-08-2022 at 15:20 IST