-प्रशांत केणी
‘टॉप्स’ म्हणजे लक्ष्य ऑलिम्पिक मिशन योजनेच्या समितीचे सदस्यपद नुकतेच भाजपचे आमदार आशिष शेलार यांना देण्यात आले आहे. या समितीमध्ये बायच्युंग भुतिया, अंजू बॉबी जॉर्ज, अंजली भागवत अशा नामांकित क्रीडापटूंसह काही संघटनांच्या अध्यक्षांचा समावेश आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी क्रीडापटू सज्ज करण्याचे कार्य करणारी ‘टॉप्स’ ही योजना काय आहे, तिचे कार्य काय आहे, या समितीत आणखी कुणाचा समावेश आहे, ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट संस्था काय करते, याचा घेतलेला आढावा.

‘टॉप्स’ म्हणजे काय?

cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
mpsc result latest marathi news
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Cold Play online ticket sales black market mumbai High Court PIL
कोल्ड प्ले ऑनलाईन तिकीट विक्री काळाबाजार प्रकरण : मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?

‘टॉप्स’ (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम)  म्हणजेच लक्ष्य ऑलिम्पिक पदक योजना. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने पदके जिंकावी आणि कामगिरी सुधारावी, यासाठी केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाने सप्टेंबर २०१४मध्ये ‘टॉप्स’ची मुहूर्तमेढ रोवली. ‘टॉप्स’मध्ये एप्रिल २०१८ला सुधारणा करण्यात आली. क्रीडापटूंना तांत्रिक साहाय्य गटाचीही मदत मिळावी, याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले. क्रीडापटूंना सर्वांगीण पाठबळ देण्यासाठी २०२०च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांपूर्वी ही योजना पूर्णपणे कार्यान्वित झाली. त्यामुळेच भारताने ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण सात पदकांची कमाई केली. तसेच पॅरालिम्पिकमध्ये पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य अशी एकूण १९ पदके मिळवली.

‘टॉप्स’ समितीचे कार्य काय असते?

२०२४च्या पॅरिस आणि २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी ही १६ सदस्यीय समिती देशभरातील क्रीडापटूंची निवड करते आणि आर्थिक पाठबळ देते. या स्पर्धांसाठी सज्ज होण्याकरिता क्रीडापटूंना परदेशी प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय दौऱ्यांची आखणी करणे, क्रीडा साहित्य उपलब्ध करणे आणि प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे, मासिक पाठबळ देणे अशी या योजनेची उद्दिष्टे आहेत. प्रशिक्षक, आहारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ तसेच सामर्थ्य आणि वातावरण मार्गदर्शकाच्या नियुक्तीचा खर्च या योजनेद्वारे उचलला जातो. सध्या मुख्य (कोअर) गटाच्या आणि विकसनशील (डेव्हलपमेंट) अशा दोन गटांत क्रीडापटूंची विभागणी केली जाते आणि त्यानुसार त्यांना पाठबळ दिले जाते.

‘टॉप्स’ योजनेसाठी जाहीर झालेल्या समितीत आणखी कोणत्या व्यक्तींचा समावेश आहे?

‘टॉप्स’ समितीचे अध्यक्ष क्रीडा महासंचालक असतात. या समितीत बायच्युंग भुतिया (फुटबॉल), अंजू बॉबी जॉर्ज (ॲथलेटिक्स), अंजली भागवत (नेमबाजी), तृप्ती मुरगुंडे (बॅडमिंटन), सरदारा सिंग, (हॉकी), वीरेन रस्किन्हा, (हॉकी आणि ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट), मालव श्रॉफ (नौकानयन आणि क्रीडा विज्ञान तज्ज्ञ), मोनालिसा मेहता (टेबल टेनिस), दीप्ती बोपय्या (गो स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी), योगेश्वर दत्त (कुस्ती), गगन नारंग (नेमबाजी) या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय भारतीय ऑलिम्पिक संघटनेसह ॲथलेटिक्स, कुस्ती, तिरंदाजी, बॉक्सिंग क्रीडा संघटनांचे अध्यक्ष यात समाविष्ट आहेत. शेलार हे एकमेव आमंत्रित सदस्य या समितीत आहेत.

‘टॉप्स’चे सदस्यत्व लाभलेली ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट ही संस्था काय करते?

ऑलिम्पिक पदक जिंकण्याची क्षमता असलेल्या क्रीडापटूंचे प्रशिक्षण आणि तयारी करण्यासाठी ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट ही बिगरशासकीय संस्था साहाय्य करते. २००१मध्ये देशातील माजी क्रीडापटू गीत सेठी आणि प्रकाश पदुकोण यांनी या संस्थेची निर्मिती केली. भारतीय क्रीडा क्षेत्रात सकारात्मक बदल व्हावे, हे त्यांचे मूळ उद्दिष्ट हाेते. २००८मध्ये व्यावसायिक क्षेत्रातून या संस्थेला आर्थिक पाठबळ मिळाले. नेमबाज गगन नारंग हा २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकसाठी या संस्थेशी करारबद्ध झालेला पहिला क्रीडापटू होता. आता या संस्थेच्या कार्यकारिणीत क्रीडा, मनोरंजन आणि व्यावसायिक जगतातील मान्यवरांचा समावेश आहे. २००९मध्ये माजी हॉकी कर्णधार आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या विरेन रस्किन्हाने या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर या संस्थेला सुगीचे दिवस आल्याचे म्हटले जाते. २०१०मध्ये पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आणि टेनिसपटू लिएण्डर पेससुद्धा यात सामील झाले. २०१०मधील सहा पदकविजेत्यांपैकी चार क्रीडापटूंना या संस्थेचे पाठबळ मिळाले होते. ‘टॉप्स’ ही योजना ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टच्या संकल्पनेचेच आधुनिक रूप आहे. त्यामुळेच या संस्थेला मानाचे स्थान या योजनेत आहे.

Story img Loader