डायनासोरसंदर्भात शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. शास्त्रज्ञांना ‘डायनासोर हायवे’ सापडला आहे. गेल्या जूनमध्ये आग्नेय इंग्लंडमधील चुनखडीच्या खाणीतील एक कामगार रस्ता बांधकामासाठी चिकणमाती खोदत असताना त्याच्या कामात काही अडथळे निर्माण होऊ लागले. लोकांना ज्या गोष्टीविषयी कुतूहल वाटत होते ती गोष्ट विलक्षण ठरली आणि हे अडथळे दुसरे तिसरे काही नसून डायनासोरच्या पावलांचे ठसे असल्याची माहिती समोर आली . १०० हून अधिक संशोधकांच्या टीमने साइटला भेट दिली आणि उत्खननानंतर पुष्टी केली की, हे रहस्यमय अडथळे खरेतर डायनासोर ट्रॅक होते, जे मध्य जुरासिक कालावधीपासून म्हणजेच १६.६ कोटी वर्षांपासूनचे आहे. पॅलेओन्टोलॉजिस्ट मानतात की, २०० पावलांचे हे ठसे ब्रिटनमधील सर्वात मोठ्या ज्ञात डायनासोर ट्रॅक साइटचे प्रतिनिधित्व करू शकतात. काय आहे ‘डायनासोर हायवे’? जाणून घेऊ.

काय आहे ‘डायनासोर हायवे’?

‘Dewars Farm Quarry’ येथे ऑक्सफर्ड आणि बर्मिंगहॅम विद्यापीठांच्या संशोधकांनी पाच विस्तृत ट्रॅकवे शोधून काढले आहेत. गुरुवारी उघड झालेल्या या शोधाने मध्य जुरासिक कालखंडातील डायनासोरच्या जीवनाविषयीची उत्सुकता वाढवली. संशोधकांनी सांगितले की, यापैकी चार मार्ग सॉरोपॉड्स म्हणजेच अवाढव्य अशा लांब मानेच्या शाकाहारी डायनासमोर प्रजातींचे आहेत, तर पाचवा मार्ग हा ३० फूट लांब मांसाहारी थेरोपॉड प्रजातीचा आहे; ही प्रजाती त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मोठ्या तीन बोटांच्या पायांसाठी प्रसिद्ध आहे. “शास्त्रज्ञांना पृथ्वीवरील इतर डायनासोरपेक्षा जास्त काळ मेगालोसॉरसबद्दल माहिती आहे आणि त्याचा अभ्यास करत आहेत आणि तरीही या अलीकडील शोधांनी हे सिद्ध केले आहे की, या प्राण्यांचे आणखी नवीन पुरावे सापडू शकतात,” असे कशेरुकी जीवाश्मशास्त्रज्ञ एम्मा निकोल्स यांनी ऑक्सफर्ड म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीच्या अहवालात म्हटले आहे.

Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
From Jack the Penguin to Volcano Rabbit This 10 creatures that thrive in volcanic environments
जॅक्स पेंग्विन ते व्होल्कॅनो रॅबिट; धगधगत्या ज्वालामुखीच्या प्रदेशात जगतात हे १० प्राणी
Ancient Egypt medicine Serqet goddess
Ancient Egyptian History: ४,१०० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील फॅरोचे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध लागला; का आहे हा शोध महत्त्वाचा?
loksatta kutuhal interesting facts about the first dinosaur of india
कुतूहल : भारतातील पहिलावहिला डायनोसॉर
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
‘Dewars Farm Quarry’ येथे ऑक्सफर्ड आणि बर्मिंगहॅम विद्यापीठांच्या संशोधकांनी पाच विस्तृत ट्रॅकवे शोधून काढले आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त मंडळात सामील झालेल्या माया आणि लेआ टाटा कोण आहेत?

विशेष म्हणजे, उत्खनन साइटच्या एका भागात मेगालोसॉरस आणि सॉरोपॉड ट्रॅक क्रॉसिंग मार्गदेखील दर्शविले गेले, ज्यामुळे संशोधकांना या प्रजातींचा परस्परसंवाद झाला असेल का आणि कसे, असा प्रश्न विचारण्यास प्रवृत्त केले. बर्मिंगहॅम विद्यापीठातील मायक्रोपॅलिओन्टोलॉजीचे प्राध्यापक क्रिस्टी एडगर यांनी पीबीएस न्यूजला सांगितले की, ही पाऊलखुणे डायनासोरच्या जीवनाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आणखी वाढवतात; त्यांच्या हालचाली, परस्परसंवाद आणि ते राहत असलेल्या उष्णकटिबंधीय वातावरणाबद्दल तपशील देतात.”

शास्त्रज्ञांनी काय निरीक्षण केले?

पायाच्या ठशांवरून संशोधक डायनासोर कोणत्या दिशेने आणि गतीने फिरत होते याबद्दल अंतर्दृष्टीदेखील मिळवू शकले. एडगर यांनी सीएनएनला सांगितले की, बहुतेक सॉरोपॉड्स सरासरी पाच किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने ईशान्य दिशेने जात असल्याचे दिसून आले. मेगॅलोसॉरससारखे मोठे थेरोपॉड त्यांच्या लहान थेरोपॉड समकक्षांप्रमाणे धावण्यास सक्षम नव्हते. या अभ्यासात सहभागी असलेले ले मोयने कॉलेजचे पॅलेओकोलॉजिस्ट लॉरेन्स टॅनर यांनी न्यूज आउटलेटला सांगितले की, डायनासोर कदाचित अन्न शोधण्यासाठी किनारपट्टीवर प्रवास करत असावेत. “वैयक्तिक ट्रॅकचा आकार आणि ते कव्हर केलेले क्षेत्रफळ खूप मोठे आहे,” असे एडगरने लाइव्ह सायन्सला एका ईमेलमध्ये सांगितले. “मला आश्चर्य वाटते की मी तिथेच उभा आहे, जिथे एकेकाळी अस्तित्वात असलेले काही सर्वात मोठे प्राणी उभे होते आणि ते कुठे आणि का जात आहेत याचा विचार करण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे,” असेही ते पुढे म्हणाले.

गुरुवारी उघड झालेल्या या शोधाने मध्य जुरासिक कालखंडातील डायनासोरच्या जीवनाविषयीची उत्सुकता वाढवली. (छायाचित्र-रॉयटर्स)

ज्युरासिक ऑक्सफर्डशायर आजच्या लँडस्केपपेक्षा खूप वेगळे होते. गवताळ प्रदेशांऐवजी, प्रदेश आर्द्र फ्लोरिडा कीजसारखा दिसत होता; ज्यामध्ये सरोवर आणि चिखलयुक्त दलदल होती. एडगरने पीबीएस न्यूजला स्पष्ट केले की, “तिथे थोडासा ओलावा असल्यामुळे गाळाने या पाऊलखुणांना धरून ठेवले, ते वादळाने झाकले गेले, त्यामुळे डायनासोर ज्या काळात नष्ट झाले, त्या काळात यांचे संरक्षण होऊ शकले.”

शास्त्रज्ञांकडून महामार्गाचा अभ्यास

साइटचे जतन आणि अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी पायांच्या ठशांच्या २०,००० पेक्षा जास्त प्रतिमा कॅप्चर करण्यासाठी ड्रोन फोटोग्राफीचा वापर केला. या प्रतिमा आता तपशीलवार 3D मॉडेल्स तयार करण्यात मदत करतील, ज्यामुळे शास्त्रज्ञांना डायनासोरच्या बायोमेकॅनिक्स आणि परस्परसंवादाचा सखोल अभ्यास करता येईल. “आमच्याकडे हे 3D मॉडेल्स प्रथमच वापरण्यात येतील. याचा अर्थ असा आहे, आम्ही ते प्रकाशित करताच, कोणीही साइट पाहण्यास सक्षम होईल,” असे एडगर सीएनएनला म्हणाले.

तरीही साइटचा एक मोठा भाग शोधलेला नाही. एडगरचा विश्वास आहे की, या अस्पृश्य क्षेत्रांमध्ये ज्युरासिक ऑक्सफर्डशायरमध्ये फिरणाऱ्या विविध प्रजातींबद्दल अधिक माहिती असू शकते. पुढील वर्षभरात, संशोधक गोळा केलेल्या डेटाचे विश्लेषण करतील आणि त्यांचे निष्कर्ष जगाबरोबर सामायिक करण्याची तयारी करतील, तसेच पुढे या प्रागैतिहासिक ‘डायनासॉर हायवे’चे रहस्य उघड करतील.

हेही वाचा : महाकुंभ मेळ्यामध्ये साध्वी होणार IAS अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणारी मुलगी; चर्चेत असलेली राखी सिंह कोण आहे?

डायनासोरच्या पावलांचे ठसे सर्वात आधी खाणीत काम करणाऱ्या ग्रे जॉन्सन यांनी पाहिले होते. ग्रे जॉन्सन यांना खोदकामादरम्यान मातीत असामान्य अशा खुणा दिसल्या आणि याची माहिती त्यांनी संशोधकांना दिली. ब्रिटनमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी डायनासोर ट्रॅक साईट असल्याचे सांगितले जात आहे. डायनासोरच्या पावलांच्या ठशांसंदर्भातील हे संशोधन ऑक्सफर्ड आणि बर्मिंगहॅम विद्यापीठातील जीवाश्म शास्त्रज्ञांनी केले, ज्या ठिकाणी हे ठसे सापडले. त्या ठिकाणचे खोदकाम जून २०२४ मध्ये पूर्ण झाले. त्यानंतरच हे पाच ट्रॅक वे समोर आले आहेत.

Story img Loader