How To Follow New Year Resolutions: जानेवारीत आतापर्यंत तुमचे नववर्ष संकल्प कायम आहेत का? नवीन वर्षात कितीही सोप्पा संकल्प केला असला तरी असं काही ना काही होतंच की पहिल्याच आठवड्यात अनेकांचे संकल्प ढासळतात. मग याच मंडळींच्या जखमांवर मीम्स मीठ चोळण्याचं काम करतात. पण मुळात नवीन वर्ष संकल्पांची सुरुवात कुठून झाली हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही यंदा घेतलेला संकल्प तुम्हाला पूर्ण करण्यासाठी काही सोप्या टिप्स हव्या आहेत का? आज आपण या नवं वर्ष संकल्पांचा रंजक इतिहास व पहिल्याच आठवड्यात हे संकल्प मोडले जाण्याचे कारण जाणून घेणार आहोत. हे कारण समजताच त्यावर नक्की काय उपाय करता येईल जेणेकरून तुमचे संकल्प पूर्ण होतील हे ही जाणून घेऊयात..

‘नवीन वर्ष नवीन मी’चा इतिहास

ही संकल्पना नवीन काळातील फॅड वाटू शकते, पण याची मूळ सुरुवात ही बॅबिलोनियन समाजात झाल्याचे अनेक दाखले आहेत. ख्रिस्तपूर्व २००० व्या शतकात बॅबिलोनी लोकांनी नवीन वर्ष अकिटू नावाच्या १२ दिवसांच्या उत्सवादरम्यान साजरे केले होते. नव्या वर्षात शेतीच्या हंगामाची सुरुवात होते. यावेळी पिकांची लागवड करणे, राजाला मुकुट देणे, कर्ज फेडणे, उधार घेतलेली शेती उपकरणे परत करणे असे संकल्प घेतले जात होते.

New Tax System, New Tax System Criteria, tax deduction, tax pay, Home Loan tax deduction, Tax Regime, New Tax System, finance article, tax article, marathi finance articles,
करावे कर समाधान : नवीन करप्रणाली निवडण्याचे निकष
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

मेरियम वेबस्टर डिक्शनरीच्या वेबसाइटने आणखी एक उदाहरण दिले आहे: “१६७१ मध्ये लेखक अॅन हॅल्केटच्या डायरीमध्ये अनेक प्रतिज्ञा आहेत, ज्यांचा आशय ‘मी स्वतःला नाराज करणार नाही’ असा आहे. हॅल्केटने या पेजवर “रिझोल्यूशन्स” असे शीर्षक दिले आणि ते २ जानेवारीला लिहिले होते. म्हणूनच पुढे नवीन वर्षाचे संकल्प अशी अप्रत्यक्ष संकल्पना तयार झाली होती.

नवीन वर्ष संकल्प हा विनोद कसा झाला?

१९ व्या शतकाच्या सुरूवातीस नवीन वर्ष संकल्प घेण्याऐवजी नवीन वर्ष संकल्प सोडून देण्याची प्रवृत्ती सुरु झाली. ज्यावरून अनेकदा मस्करी केली जात होती. १८०२ मधील वॉकरच्या हायबर्नियन मासिकाच्या एका लेखात व्यंग करत काही संकल्प लिहिलेले होते उदाहरणार्थ, एक राजकीय नेता केवळ आपल्या समाजाच्या उद्धारासाठी काम करेल. एक डॉक्टर केवळ आवश्यक असेल तेवढेच औषध देईल, इत्यादी.

नववर्ष संकल्प पाळण्यासाठी काय करावे?

मुळात नववर्ष संकल्प मोडणे ही प्रथा नाहीच. पण असं होण्याचे कारण म्हणजे सवयीचा अभाव. जर आपल्याला पहिल्या दोन प्रयत्नात यश आले नाही तर आपल्या हातातील वस्तू सोडून देण्याचा माणसाचा स्वभाव असतो. हार मानण्याचा मोह सोडल्याशिवाय काम होणे शक्य नसते.

पण जर तुम्हाला तुमचा संकल्प पाळायचा असेल तर मानसशास्त्रज्ञ असे करण्यासाठी अनेक पद्धती सुचवतं.अनेकदा स्वतःवर लक्ष केंद्रित करून संकल्प केले जातात – मी गोष्ट X करीन, किंवा माझ्या आयुष्यातील Y गोष्ट बदलेन. परंतु अशा कल्पना आपल्या डोक्यात राहतात आणि फॉलो केल्या जात नाहीत. यासाठी कुटुंबाला किंवा मित्रांना सांगणे मदत करू शकते, जसे की दोन लोक एकमेकांना त्यांच्या ध्येयांविषयी सांगू शकता त्यांना तुम्ही ध्येयासाठी काम करत असल्याचा फॉलो अप देऊ शकता. निदान २१ दिवस स्वतःला द्या, याशिवाय सवय लागत नाही.

हे ही वाचा<< विश्लेषण: थंडीत गिझर वापरताना केलेली चूक जीवावर बेतू शकते; गिझरचे स्थान कुठे असावे? वापर कसा करावा?

संकल्प तुटण्याचे एक मुख्य कारण म्हणजे आपण ध्येय ठरवतो व मार्गाची कोणतीही नीट तयारी करत नाही.सगळ्यात मुख्य पद्धत म्हणजे तुम्ही ध्येय व मार्ग दोन्ही सुनिश्चित करा. निदान २१ दिवस स्वतःला द्या, याशिवाय सवय लागत नाही. वरवरचे संकल्प जसे की मी माझ्या समाजाला मदत करेन हे पूर्ण होणार नाही उलट मी अमुक महिन्यात तमुक रक्कम ‘क्ष’ संस्थेला देईन असे स्वतःला सांगा.