जगावरील रशिया आणि युक्रेन युद्धाचं सावट कायम असतानाच आता चीन आणि तैवानमध्ये संघर्ष होण्याची चिन्हं दिसत आहेत. या दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास याचा सर्वात मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे चीन आणि तैवान इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टरचं उत्पादन करणारे सर्वात मोठे देश आहेत. चीनसोबत मागील काही वर्षांपासून सुरु असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सेमीकंडक्टरसाठी तैवानवर अवलंबून आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : राऊतांच्या घरात साडेअकरा लाख तर अर्पिताच्या घरात सापडले ५० कोटी; कायद्यानुसार घरात किती रोख रक्कम आणि सोनं ठेवता येतं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा परिस्थितीमध्ये चीन आणि तैवानचं युद्ध झालं तर स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर सर्वाधिक परिणाम होईल. भारतामधील सर्व स्मार्टफोन आणि गॅजेट्ससंदर्भातील उद्योग व्यवसाय हा या दोन्ही देशांमधील सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळेच हे युद्ध झालं तर याचा मोठा फटका भारतातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीबरोबरच स्मार्टफोन उद्योगांनाही बसेल. याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फटका सर्वसमान्यांना बसण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : जागतिक आरोग्य संघटनेनं ‘मंकीपॉक्स’ला रोखण्यासाठी ‘सेक्स पार्टनर’ कमी करण्याचा सल्ला का दिला आहे?

तैवान सगळ्यात मोठा निर्माता
कमोडिटी एक्सपर्ट आणि केडिया अ‍ॅडवायझर्सचे निर्देशक अजय केडिया यांनी या समस्येसंदर्भात सविस्तर माहिती देताना तैवानला जगाचा सेमीकंडक्टर म्हटलंय. संपूर्ण जग हे एखादे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असल्याचं मानलं तर तैवानला या डिव्हाइसचं सेमीकंडक्टर म्हणता येईल, असं केडिया म्हणाले. सन २०२० मध्ये सेमीकंडक्टर इंडस्ट्री असोसिएशनच्या आकडेवारी पाहिल्यास या क्षेत्रात तैवानची मत्तेदारी किती आहे हे लक्षात येईल. जगभरातील एकूण सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीमध्ये एकट्या तैवानचा वाटा ६३ टक्के इतका आहे. यानंतर दक्षिण कोरिया आणि चीनचा क्रमांक लागतो. दक्षिण कोरिया जगभरातील एकूण सेमीकंडक्टर्सपैकी १८ टक्के तर चीन ६ टक्के सेमीकंडक्टर्स बनवतो.

नक्की वाचा >> विश्लेषण : लोकांनी बँकांमधून पैसे काढू नयेत म्हणून चिनी सरकारने बँकांबाहेर तैनात केले रणगाडे? चीनमध्ये नेमकं चाललंय तरी काय?

भारतातील वापर किती?
केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रोडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह स्कीमच्या (पीेलआय स्कीम) माध्यमातून सेमीकंडक्टरच्या देशांतर्गत उत्पादनला प्रोत्साहन देण्यासाठी ७५ हजार कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र या गुंतवणुकीचा तात्काळ परिणाम दिसणार नसून त्याला अजून काही कालावधी लागणार आहे. सध्याची स्थिती पाहिली तर भारत स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगामध्ये महत्वाचा घटक असणाऱ्या सेमीकंडक्टर्सपैकी ९० टक्के सेमीकंडक्टर्स हे चीन आणि तैवानमधून आयात करतो. या ९० टक्क्यांमध्येही सर्वात मोठा वाटा तैवानचा आहे. सन २०२० मद्ये भारताने १७.१ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतक्या किंमतीचे सेमीकंडक्टर्स वापरले. २०२७ मध्ये भारतात होणारा सेमीकंडक्टर्सचा वापर हा ९२.३ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत वाढणार. दर वर्षी सेमीकंडक्टर्सचा वापर २७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : कांजण्यांचा संसर्ग की मंकीपॉक्सचा? दोघांची लक्षणं सारखीच मग फरक ओळखायचा कसा? डॉक्टरांचं म्हणणं जाणून घ्या

या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होत आहे की भविष्यात स्मार्टफोनचा वापर वाढणार त्यानुसार सेमीकंडक्टर्सची मागणीही वाढणार. देशात सर्वाधिक सेमीकंडक्टर वापरणाऱ्या देशाबद्दल सांगायचं झाल्यास, अमेरिका एकूण सेमीकंडक्टर्सपैकी ४७ टक्के सेमीकंडक्टर्स वापरतो. याच कारणामुळे अमेरिका चीनच्या विरोधात जात तैवानच्या पाठीशी उभा राहिल्याचं चित्र दिसत आहे, असं काही तज्ज्ञ सांगतात.

नक्की वाचा >> विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली? जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण

३५ टक्के वापर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात
अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार चीन आणि तैवानचं युद्ध झाल्यास त्याचा सर्वात पहिला परिणाम स्मार्टफोन उद्योगावर दिसून येईल. वीवो, शाओमी, पोको सारख्या कंपन्यांच्या मोबाईलचे उत्पादन भारतात होत असले तरी यासाठीचे बरेचसे लहान मोठे घटक चीनमधून आयात केले जातात. युद्ध झाल्यास या आयातीवर परिणाम होईल आणि त्यामुळे मोबाईल उद्योगाला फटका बसले. त्याशिवाय इतर गॅजेट्स आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगावरही याचा विपरित परिणाम होईल. भारतातील एकूण सेमीकंडक्टर्सच्या वापरापैकी ३५ टक्के वापर हा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात होतो.

नक्की वाचा >> विश्लेषण: मुंबई- दिल्ली इलेक्ट्रिक हायवेची योजना, गडकरींनी दिले संकेत; पण ‘इलेक्ट्रिक हायवे’ म्हणजे नेमकं काय?

या क्षेत्रांमध्येही होतो वापर
सेमीकंडक्टर्सचा सर्वाधिक वापर करणाऱ्या क्षेत्रांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर टेलीकम्युनिकेशनशी संदर्भातील उद्योगांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे ऑटोमोटीव्ह आणि डेटा प्रोसेसिंगशी संबंधित उद्योगांमध्येही सेमीकंडक्टर्सचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सेमीकंडक्टर्सच्या आयातीवर परिणाम झाला तर या सर्वच उद्योगांना फटका बसून उत्पादन कमी होईल. यामुळे मोबाईल आणि गॅजेट्सच्या निर्मितीला ब्रेक लागेल आणि याचा परिणाम संपूर्ण क्षेत्रावर प्रकार्षाने जाणवेल.

नक्की वाचा >> विश्लेषण : सक्तवसुली संचालनालय आता मोकाट?

घरगुती उपकरणांच्या किंमती वाढणार
एअर कंडिश्नर म्हणजेच एसीमध्येही सेमीकंडक्टर्सचा वापर केला जातो. तसेच टीव्हीतील पॅनलमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांपैकी अनेक घटक हे चीनमधून आयात केले जातात. याशिवाय सौरऊर्जेचे पॅनल्ससाठी भारत चीनवर अवलंबून आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीमध्ये या सर्व उत्पदनांवर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे फ्रिज आणि वॉशिंग मशीनसारख्या घरगुती वापराच्या उपकरणांच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होणार असल्याने या उद्योगांशी संबंधित क्षेत्रांमधील नोकऱ्यांच्या उपलब्धतेबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : ‘हर घर तिरंगा’ मोहीम आहे तरी काय? यामध्ये कसं सहभागी व्हायचं? यात सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र कसं मिळतं?

भारत आता तैवानवर निर्भर
कन्फर्डेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी चीनसोबत सुरु असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत आपल्या व्यापारविषयक धोरणांमध्ये बदल करत आहे. आतापर्यंत ज्या गोष्टींसाठी भारत चीनवर अवलंबून राहत होता त्यासाठी आता तैवानवर अवलंबून आहे. यामध्ये अगदी सेमीकंडक्टर असो, मोबाईलचे सुटे भाग असो किंवा इंजीनियरिंगसंदर्भातील टूल्ससारख्या गोष्टींचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतो. त्यामुळे चीन आणि तैवानचं युद्ध जालं तर त्याचा भारतावर परिणाम होईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the impact of china taiwan war on indian smartphone and gadgets industry scsg
First published on: 10-08-2022 at 13:51 IST