संभाव्य चीन-तैवान युद्धाच्या दृष्टीने सर्व जगाचे लक्ष सध्या चीनकडे लागले आहे. असं असतांना एका वेगळ्याच विषायवरही चीनने लक्ष वेधलं आहे. विषय आहे जीवाश्मचा आणि जीवाश्म आहेत डायनासोरचे. तेव्हा याबाबत सध्या चीनमधून काय बातमी येते याकडे जीवाश्म विषयात रुची असणाऱ्यांचे लक्ष लागून राहीलं आहे. आत्तापर्यंतचे जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात डायनासोरच्या पायांच्या ठशांच्या स्वरुपात जीवाश्म हे चीनमधील Hebei प्रांतात सापडले आहेत, काही दिवसांच्या अथक अभ्यासानंतर जीवाश्मबाबतची माहिती ही जूलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली. ज्युरासिक आणि क्रेटेशियस या दोन कालखंडामधील म्हणजेच सुमारे एक कोटी ५० लाख वर्षांपूर्वीचे असावेत असा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेचे महत्व काय?

Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

चीनमधील बिजिंग शहराच्या उत्तरेला Hebei भागात Zhangjiakou मध्ये डोंगराळ भागात डायनासोरचे जीवाश्म सापडले आहेत. प्राथमिक अभ्यासानुसार जीवाश्मामध्ये चार प्रकारचे डायनासोर आढळले असून यापैकी डायनासोरची एक प्रजाती ही पहिल्यांदा माहित झाल्याचा अंदाज आहे जीवाश्मामध्ये जे डायनासोरच्या पावलांचे ठसे आढळले आहेत त्यावरुन केलेल्या अभ्यासानुसार संबंधित जीवाश्म हे तृणभक्षक आणि मांसभक्षक डायनासोरचे आहेत असं अभ्यासकांनी स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही या ठशांच्या आकारानुसार यापैकी काही डायनासोर हे १५ मीटर लांबीचे तर काही चार ते पाच मीटर लांबीचे डायनासोर असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागात मुबलक पाणी आणि विविध झाडे असावीत, डायनासोरसाठी अनुकुल परिस्थिती असावी, यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात डायनासोरचा वावर असावा असा निष्कर्ष यानिमित्ताने काढण्यात आला आहे.

जीवाश्म कसे तयार झाले?

चीनमध्ये Hebei भागात जे जीवाश्म आढळले आहेत ते बहुतांश डायनासोरच्या पायांच्या ठशांच्या स्वरुपात आहेत. इतके वर्ष अशा खुणांचे निसर्गाने एक प्रकारे जतन केलं आहे हे एक आश्चर्य मानलं जात आहे. लाखो वर्षांपूर्वी या भागात डायनासोरचा मुक्त वावर असावा. ओल्या मातीमध्ये डायनासोरची पावले उमटल्यावर हे ठसे तयार झाले, कालांतराने मातीच्या पृष्ठभागावरील पाणी सुकल्याने ठसे कायम राहिले असावेत, यावर गाळ साचत एक प्रकारे ठशांचे जतन झाले असावे. कालांतराने आणखी माती साचत आणखी घट्ट असा थर हा या पावलांच्या ठशांवर तयार झाला असावा. थराच्या ओझ्याने खालचा भाग आणखी घट्ट होत ठशांचे कायमस्वरुपी जतन झाले असावे, जीवाश्म तयार झाले असावेत. आता काळाच्या ओघात ऊन-वारा-पाऊस याचा मारा होत पुन्हा हे मातीचे थर-गाळ यांची झीज होत पायाचे ठसे असलेले डायनासोरचे जीवाश्म हे पुन्हा समोर आले.

डायनासोरचे विविध जीवाश्म हे सर्वप्रथम युरोप आणि उत्तर अमेरिकेत १७ व्या शतकांत आढळले. पण सुरुवातीला ते एका मोठ्या पक्षाचे किंवा यतीसारख्या मानवाचे असावेत असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र त्यानंतर असे हाडाचे तुकडे, मोठ्या प्राण्याचे जीवाश्म हे अनेक ठिकाणी आढळायला सुरुवात झाल्यावर कालांतराने हे लाखो वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या डायनासोर प्राण्याचे असावेत असं स्पष्ट झालं. डायनासोरच्या जातीमधील विविध प्राण्यांचे आकार, प्रकार यानिमित्ताने स्पष्ट व्हायला सुरुवात झाली.

असं असतांना चीनच्या Hebei जीवाश्माच्या निमित्ताने डायनासोरच्या पायांचे ठसे हे ए्वढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा समोर आले आहेत. याआधी फ्रान्सच्या Plagne भागात १५० मीटर भागात डायनासोरच्या पायांचे ठसे आढळले होते. भारतातही जैसलमेर इथे २ कोटी वर्षांपूर्वीचे डायनासोरच्या पायांचे ठसे सापडले आहेत.

डायनासोरच्या पायांचे ठसे नेमकं काय सांगतात?

डायनासोरचे ठसे आणि ठशांची संख्या हे सांगतात की त्या भागात डायनासोरचा मुक्त वावर असावा. डायनासोरच्या पायांच्या ठशांच्या संख्येवरुन आणि आकारावरुन नेमके किती आणि कोणत्या डायनासोरच्या प्रजाती असाव्यात, ते कळपाने किंवा कुटुंब म्हणून वावरत असावेत का याबाबतही अंदाज लावता येतो. दोन ठशांमधील अंतरावरुन त्यांची चाल कशी असावी, ते धावत असावेत का चालत असावेत याबाबतही अंदाजही लावता येतो. एवढंच नाही तर संबंधित डायनासोरचा ठसा हा द्विपाद का चतुष्पाद डायनासोरचा असावा हेही सांगता येते. एवढंच नाही तर ठशांच्या बारकाव्यानुसार डायनासोरच्या प्रजातीबद्द्ल नेमका अंदाज बांधता येतो. यामुळे हे ठशाच्या स्वरुपात सापडलेले जीवाश्म डायनासोरबद्दल मोठी माहिती उपलपब्ध करुन देतात. त्यामुळेच चीनमध्ये सापडलेले डायनासोरच्या पायांच्या ठशांचे जीवाश्म हे महत्त्वाचे ठरत आहेत.