रशिया-युक्रेन युद्धात एक नवीन घातक शस्त्र आकाशात झेपावले आहे. दोन्ही देशांकडून याचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये एक ड्रोन आकाशातून आग ओकत असल्याचे दृश्य दिसत आहे. त्यामुळेच या शस्त्राला ‘ड्रॅगन ड्रोन’ असे नाव देण्यात आले आहे. या ड्रोन मधून पडलेला पदार्थ २,४२७ अंश सेल्सिअस तापमानाला वितळलेला धातू आहे.

ड्रॅगन ड्रोन’ म्हणजे काय?

ड्रॅगन ड्रोन थर्माइट नावाचा पदार्थ बाहेर सोडतो. थर्माइट म्हणजे अल्युमिनियम आणि लोहाच्या ऑक्साईडचे मिश्रण असते. शंभर वर्षांपूर्वी रेल्वे ट्रॅक जोडण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. एकदा प्रज्वलित झाल्यावर थर्माइट एक स्वयंपूर्ण प्रक्रिया निर्माण करतो, त्यामुळे त्याला विझवणे खूप कठीण असते. थर्माइट साधारणपणे कोणत्याही वस्तूला जाळू शकतो. यात कपडे, झाडे, लष्करी वाहने इत्यादींचा समावेश होतो. तो पाण्याखाली देखील जळतो. त्याचा मनुष्यावर होणारा परिणाम अत्यंत गंभीर असतो. थर्माइटमुळे माणूस केवळ होरपळत नाही तर ते प्राणघातक असते.

Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over the project Print politics news
मोठ्या प्रकल्पातील गतिरोधक दूर केले; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Sharad Ponkshe present on the platform of MNS meeting in Thane news
शिंदेचे स्टार प्रचारक शरद पोंक्षे मनसेच्या व्यासपीठावर
Mig 29 crashes
Mig 29 Crasesh : भारतीय हवाई दलाचे मिग २९ लढाऊ विमान कोसळले; जमिनीवर कोसळताच आगीत भस्मसात!
uke send bomb threats email regarding Jagdish Uikes terrorism book publication
विमानात बॉम्ब असल्याचे फोन, तो का करायचा ? कारण आहे धक्कादायक
12 civilians injured in grenade attack in Srinagar
श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्यात १२ जखमी; जखमींमध्ये महिला व दुकानदारांचा समावेश
Lashkar e Taiba  Pakistani commander Usman killed in an encounter in an anti terror operation
दहशतवादविरोधी मोहिमेत बिस्किटांचा वापर
gang vandalised 13 vehicle in aundh
ऐन दिवाळीत टोळक्याची दहशत; १३ वाहनांची तोडफोड- ओैंधमधील महापालिका वसाहतीतील घटना

अधिक वाचा: विश्लेषण: चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी ; इस्लामी देश गप्प का?

ड्रॅगन ड्रोन हे अत्यंत प्रभावी आणि धोकादायक मानले जात आहेत. घातक थर्माइट आणि अत्याधुनिक तसेच नेमकेपणा – असलेले ड्रोन यांचे अतिघातक एकत्रिकरण म्हणजे हे शस्त्र होय. हे संयुक्तिक शस्त्र पारंपरिक संरक्षण यंत्रणेला सहजच चुकवू शकते.

Action on Armed Violence (AOAV) या अमेरिकेतील युद्धविरोधी संस्थेने अल जझिराला सांगितले की, हे ड्रोन अत्यंत परिणामकारक आहे. या ड्रॅगन ड्रोनचा पहिला वापर रशिया-युक्रेन युद्धात सप्टेंबर महिन्यात करण्यात आल्याचे मानले जाते. The New York Times च्या वृत्तानुसार, युक्रेनियन सैन्याने या ड्रोनचा वापर रशियन सैनिकांनी आडोशासाठी वापरलेल्या वनस्पतींना आग लावण्यासाठी केला, त्यामुळे रशियन सैनिक आणि त्यांची शस्त्र थेट हल्ल्याच्या कक्षेत आली. काही काळानंतर, रशियाने देखील स्वतःचे ड्रॅगन ड्रोन तयार करून वापरण्यास सुरुवात केली.

थर्माइटचा यापूर्वी वापर केव्हा झाला?

थर्माइटचा वापर दोन्ही महायुद्धांत करण्यात आला होता.

पहिलं महायुद्ध (World War I): जर्मन झेपलिन्सनी थर्माइटने भरलेल्या बॉम्बचा वापर केला होता. या बॉम्बना त्यावेळी एक नवकल्पना मानले जात होते.

दुसरं महायुद्ध (World War II): थर्माइटने भरलेल्या उच्च- ज्वलनशील स्फोटकांचा वापर मित्र राष्ट्रांनी हवाई बॉम्बिंग मोहिमेत केला होता. दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांनी थर्माइट बॉम्ब जर्मनीवर आणि जपानवर टाकले. याशिवाय, थर्माइट हँड ग्रेनेड्सचा वापर तोफा निष्क्रिय करण्यासाठी, कोणताही स्फोट न करता करण्यात आला होता.

आधुनिक युद्ध:

थर्माइटचा वापर मुख्यतः गुप्तहेर आणि विशेष ऑपरेशन्स टीम्सकडून केला जातो. कारण ते मोठ्या आवाजाशिवाय जळते, त्यामुळे शत्रूची उपकरणे आवाजाशिवाय नष्ट करता येतात.

अधिक वाचा: Sinification of Islam: चीन करतंय मशिदींचेही चिनीकरण; चीनमध्ये नेमके काय घडतंय?

थर्माइटचा शस्त्रांमध्ये वापर कायदेशीर आहे का?

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युद्धात थर्माइटचा वापर प्रतिबंधित नाही. परंतु, नागरिकांवर अशा ज्वलनशील शस्त्रांचा वापर संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार “कन्व्हेन्शन ऑन सर्टन कन्वेन्शनल वेपन्स” (CCW) अंतर्गत निषिद्ध आहे, हे कन्व्हेन्शन शीतयुद्धाच्या काळातही लागू होते. मरीना मिरॉन, लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील लष्करी तज्ज्ञ, यांनी DW ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “थर्माइट हा मुख्य मुद्दा आहे. कारण त्याचा परिणाम खूपच अनिश्चित असतो.” त्यामुळे थर्माइटवर थेट बंदी नाही, परंतु कन्वेन्शन ऑन सर्टन कन्वेन्शनल वेपन्सच्या प्रोटोकॉल थ्री अंतर्गत त्याचा वापर फक्त लष्करी लक्ष्यांपर्यंत मर्यादित आहे. कारण अशा स्फोटकांमुळे भयानक होरपळणे आणि श्वसनसंस्थेला दुखापत होऊ शकते. म्हणूनच, थर्माइट वापराला सार्वत्रिक बंदी नसली तरी, नागरिकांच्या संरक्षणासाठी आणि अनावश्यक हानी टाळण्यासाठी प्रोटोकॉल थ्रीनुसार त्याच्या वापरावर स्पष्टपणे मर्यादा घालण्यात आली आहे.