जुन्या ठाण्याच्या वाढीची क्षमता संपली आहे. त्यामुळे आता घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी ते भाईंदरपाडा या नव्या ठाण्याच्या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. या भागात एका बाजूला खाडी तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तीर्ण परिसर आहे. ठाणे शहर, मुंबईपासून जवळचा भाग असल्याने घोडबंदर क्षेत्रात गृहखरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ३० ते ४० मजल्यांची गृहसंकुले उभी राहिली आहेत. तर दुसरीकडे वाहतूक कोंडीचा मोठा तापदेखील येथील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. अवजड वाहनांची बेदरकार वाहतूक, मेट्रो मार्गिकेची सुरू असलेली कामे, सेवा रस्त्यांची दुरवस्था, प्रशासनाकडे कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना नसणे, अपघात आणि रस्त्यांची दैना यामुळे घोडबंदर डोळ्यासमोर आले की, सुनियोजित क्षेत्राऐवजी कोंडीचे चित्र उभे राहू लागले आहे. येथील रहिवासी कोंडीला अक्षरश: विटले आहेत. त्यामुळे घोडबंदरभोवती निर्माण झालेले कोंडीचे वर्तुळ फुटणार कधी असा प्रश्न निर्माण होत आहे.

सध्याची स्थिती काय आहे?

घोडबंदर मार्गावरून गुजरात, उरण जेएनपीटी, नाशिक येथून हजारो अवजड वाहने वाहतूक करत असतात. दुसरीकडे जुन्या ठाण्यातील नौपाडा, पाचपाखाडी भागात महागडी घरे घेणे टाळण्यासाठी बहुतांश नागरिक घोडबंदरमध्ये राहण्यास प्राधान्य देत आहे. असे असले तरी येथील रस्त्यांची स्थिती फार काही बदलली नाही. त्यामुळे वाहने अधिक आणि रस्ते अरुंद अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे दररोज नागरिकांना कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावर मागील पाच ते सहा वर्षांपासून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामासाठी मुख्य रस्त्याच्या दुभाजकावर आणि रस्त्याकडेला लोखंडी मार्गावरोधक बसविले आहेत. त्यामुळे रस्त्यांची रुंदी आणखी कमी झाली आहे. सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकामे झाल्याने सेवा रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Mumbai pune expressway traffic jam
मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा
Baba Siddiqui has been shot
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू
Boy teasing bull to over noise near his ear then bull revenge from boy shocking video
“काय गरज होती का?” बैलाच्या कानाजवळ वाजवला ताशा अन् शेवटी…; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य
Israeli PM Netanyahu at UN Shows India map as Blessing
Israeli PM Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंनी UN मध्ये भारताचा नकाशा दाखवला; मध्य-पूर्वेतील संघर्षावर मोठं वक्तव्य
Asim Sarode News
Akshay Shinde Encounter : “पोलिसांची बंदूक साधारणपणे लॉक असते, ती…” ; अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर असीम सरोदेंचा प्रश्न
Entry ban for heavy vehicles in Mumbai including Thane and Navi Mumbai
मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी

हेही वाचा >>>थायलंडपासून ते जपानपर्यंत; परदेशात कशी केली जाते बाप्पाच्या विविध रूपांची पूजा? गणपती तिथे कसे पोहोचले?

महापालिका आणि पोलीस अपयशी का?

ठाणे वाहतूक पोलिसांनी सुमारे दीड वर्षांपूर्वी घोडबंदर भागात काही बदल केले. कापूरबावडी, ब्रम्हांड येथील वळण रस्ते थेट बंद केले. कापूरबावडी येथून ढोकाळी-कोलशेतमध्ये जाणारा मार्ग बंद केल्याने त्याचा परिणाम हायलँड मार्गावर येऊन अंतर्गत रस्ते कोंडू लागले. त्यामुळे इलाजापेक्षा उपाय भयंकर अशी स्थिती निर्माण झाली होती. अखेर नागरिकांनी विरोध केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ढोकाळी-कोलशेत रस्ता पुन्हा सुरू करण्याची वेळ आली. लोकप्रतिनिधी, नागरिकांसोबत चर्चा करण्याऐवजी महापालिका आणि पोलीस थेट निर्णय घेत असल्याने प्रशासन कोंडी सोडविण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले जात आहे. कोंडी सोडविण्याऐवजी अनेक पोलीस कारवाईचे लक्ष्य साधण्यास व्यग्र असतात.

हेही वाचा >>>पुतिन विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अटक वॉरंट; मंगोलियाच्या कृत्याने वेधलं जगाचं लक्ष; नक्की काय घडलं?

प्रशासकीय विभागांमध्ये समन्वयाचा अभाव?

घोडबंदर रस्त्याची मालकी दोन प्राधिकरणांकडे आहे. येथील उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. तर उड्डाणपुलाखालील रस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) आहेत. त्यामुळे पावसाळ्यात खड्डे पडल्यास, रस्त्याची दुरवस्था झाल्यास तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न नागरिकांना सतावत असतो. महापालिका, वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएमआरडीए या चारही विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आहे.

उड्डाणपूल की अपघाताचे केंद्र ?

घोडबंदर मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ भागात तीन उड्डाणपूल उभारले आहेत. परंतु अवजड वाहने, बसगाड्या अशा मोठ्या वाहनांची या उड्डाणपुलाच्या कठड्यांना धडक बसून अपघात होऊ लागले आहेत. उड्डाणपुलाच्या चढणीच्या दिशेकडील उंची आणि खालील रस्त्यामधील अंतर याचा अंदाज चालकांना येत नसल्याने हे अपघात होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागात दिशादर्शक बसविले जातात. परंतु ही तात्पुरती उपाययोजना अपयशी ठरत आहे. त्यामुळे हे उड्डाणपूल आता अपघाताचे केंद्र ठरत आहेत.

अवजड वाहनांना निर्बंध तरीही प्रवेश कसा?

अवजड वाहनांमुळे शहरात कोंडी होत असते. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना रात्री ११ ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ यावेळेत परवानगी असते. यावेळेव्यतिरिक्त इतर वेळेत अवजड वाहनांसाठी प्रवेशबंदी असते. असे असतानाही वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवजड वाहने या वेळेच्या नियमांचे उल्लंघन करत असतात.

खाडी किनारी मार्गाची प्रतीक्षा…

मुंबई-अहमदाबाद मार्गाने गुजरातच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहने घोडबंदर, खारेगावमार्गे वाहतूक करत असतात. ही अवजड वाहने थेट ठाणे शहरात प्रवेश करत असल्याने कोंडी अधिक होत असते. त्यामुळे राज्य सरकारने खाडी किनारी मार्गाच्या प्रकल्पाची घोषणा केली होती. १३.४५ कमी लांबीचा आणि ४० मीटर रुंदीचा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय अवजड वाहनांची डोकेदुखी ठाणेकरांसाठी कायम असणार आहे.