वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात सापडलेल्या कथित शिवलिंगावरून देशभरात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे ते शिवलिंग नसून वजू खाण्यासाठीचा कारंजा असल्याचा दावा मुस्लिम पक्षाने केला आहे. दोन्ही पक्षांकडून यावर वाद सुरू आहे. इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिमांसाठी वजू करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. मशिदीमध्ये नमाज अदा करण्यापूर्वी मुस्लिम समाजातील प्रत्येक व्यक्ती शारीरिक शुद्धतेसाठी वजू करतो. वजूशिवाय नमाज मानले जात नाही. यामुळेच तुम्हाला प्रत्येक मशीद किंवा दर्ग्यात वजूखाना पाहायला मिळतो. ज्ञानवापी मशिदीच्या आतही असाच वुझुखान असल्याचा दावा केला जात आहे. वजूसाठी वाहते पाणी असणे आवश्यक आहे असे मानले जाते. जर कोणी घरी नमाज अदा करत असेल तर त्यांनाही वजू करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत अनेकांच्या मनात प्रश्न असेल की वजू म्हणजे काय? तर त्याबद्दल जाणून घेऊयात

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

वजू म्हणजे काय?
वजू हा अरबी भाषेतील शब्द असून नमाजच्या तयारीचा पहिला टप्पा आहे. वजू ही एक पद्धत आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती त्याच्या शरीराचे अनेक भाग स्वच्छ करते. त्यासाठी काटेकोरपणे पाळली जाणारी प्रक्रिया आहे. वजू करण्यासाठी, व्यक्ती प्रथम पाण्याने तोंड आणि नाक स्वच्छ करते. त्यानंतर चेहरा धुतला जातो. यानंतर हात कोपरापर्यंत धुवावे लागतात. त्यानंतर डोक्यावरून पाणी घेत कान स्वच्छ करावे लागतात. वजूच्या शेवटी पाय धुतात. पाय धुताना, घोट्यापर्यंत व्यवस्थित धुवावे लागतात. वजू पूर्ण झाल्यानंतर ती व्यक्ती नमाज अदा करण्यास तयार होते.

वजू करण्याची पद्धत
वजू करण्यापूर्वी बिस्मिल्लाह म्हणावं लागतं. यानंतर हात तीन वेळा धुवावे लागतात. त्यानंतर तीन गुळण्या घेत तोंड स्वच्छ करावं लागतं. तीन वेळा नाकात पाणी टाकून स्वच्छ केलं जातं. तीन वेळा संपूर्ण चेहरा धुवावा लागतो. यानंतर तीन वेळा हात धुतले जातात. लगेचच तीन वेळा डोकं धुवावं लागतं आणि कान एकवेळा स्वच्छ करावा लागतात. त्यानंतर तीन वेळा पाय स्वच्छ धुवावे लागतात.

काय आहे संपूर्ण प्रकरण
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे. दाव्यात असे म्हटले जात आहे की, मशिदीत बनवलेल्या वजू खान्यातील पाणी बाहेर काढले असता तेथे एक शिवलिंग सापडले. नंदीचं मुख आहे त्या ठिकाणी अगदी समोर १२ फूट व्यास, ८ इंच लांब शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे. मात्र मुस्लिम पक्षाने हा दावा साफ फेटाळला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the vajukhana claim that shivling was found in gyanvapi rmt
First published on: 19-05-2022 at 13:26 IST