-भक्ती बिसुरे
मधुमेह हा विकार आता आपल्याकडे नवीन राहिलेला नाही. भारत हा जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जातो. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. त्यापैकी जीवनशैलीतील अनियमिततेमुळे संभवणाऱ्या टाईप वन मधुमेहाचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान सध्या भारतीयांसमोर आहे. त्यानिमित्ताने टाईप वन मधुमेहाबाबत माहिती देणारे हे विश्लेषण.

मधुमेह म्हणजे काय?

corruption, neutral vigilance department,
‘तटस्थ दक्षता विभाग’ असल्याशिवाय प्रशासनातील भ्रष्टाचार थांबेल कसा?
multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या

रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर न राहणे, कमी होणे किंवा वाढणे म्हणजे मधुमेह अशी मधुमेहाची साधी व्याख्या करता येते. आपण खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करण्याची क्रिया शरीरात घडते. ग्लुकोज म्हणजेच साखर शरीराला ऊर्जेचा पुरवठा करते. जठर आणि स्वादुपिंड हे दोन अवयव इन्सुलिन स्रवतात. इन्सुलिनमुळे ग्लुकोज शरीराच्या पेशींमध्ये सामावले जाते. ज्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली असते किंव इन्सुलिन निर्मितीच होत नाही तिच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. म्हणजेच त्या व्यक्तीला मधुमेह झाला असे निदान करता येते.

मधुमेह किती गंभीर?

करोना काळात सहव्याधी किंवा कोमॉर्बिडिटी असलेल्या रुग्णांना विशेष खबरदारीचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत होते. सहव्याधी म्हणजे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरू शकेल असा एखादा आजार. या सहव्याधींमध्ये मधुमेहाचे स्थान सर्वांत वरचे आहे. त्यामुळे अनियंत्रित मधुमेह, निदान न झाल्यास किंवा योग्य औषधोपचार, पथ्यपाणी न केल्यास मधुमेही व्यक्तीला आरोग्याच्या इतर अनेक तक्रारींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे मधुमेह हा चिंता करण्यायोग्य विकार आहे, याचा विसर मधुमेहींनी पडू देऊ नये. मधुमेहामुळे हृदयरोग, नेत्रविकार, मूत्रपिंडाचे विकार उद्भवतात. त्यामुळे मधुमेह असल्यास योग्य औषधोपचार, व्यायाम, चौरस आहार घेणे आवश्यक आहे.

मधुमेहाचे प्रकार?

मधुमेहाचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात (टाइप-१) शरीरात इन्सुलिन तयार होण्याचे प्रमाण अत्यल्प असते किंवा शून्य असते. टाईप टू मधुमेहामध्ये स्थूलपणा किंवा इतर प्रकृतीच्या तक्रारींमुळे शरीरातील इन्सुलिनच्या क्षमतेला अवरोध निर्माण होतो. त्यामुळे रक्तातील साखर वाढत राहते. भारतात दीर्घकाळापासून टाईप दोन प्रकारच्या मधुमेहाचे रुग्ण अधिक आहेत. गेल्या काही वर्षांत मात्र टाईप वन प्रकारच्या मधुमेहाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. स्थूलपणा, अनुवांशिकता, इन्सुलिन निर्माण होण्यातील अडचणी अशी अनेक कारणे यामागे दिसतात.

टाईप वन मधुमेहाची लक्षणे, उपचार कोणते?

सतत तहान लागणे, लघवीला जावेसे वाटणे, अचानक वजन कमी होणे, भूक वाढणे, कमी दिसणे, थकवा, कोरडी त्वचा, जखमा भरून न येणे, कोणताही संसर्ग पटकन होणे ही मधुमेहाची काही प्रमुख लक्षणे आहेत. टाइप वन मधुमेहामध्येही लक्षणे बरीचशी सारखी आहेत. नेहमीपेक्षा जास्त तहान लागते, वारंवार लघवीला जावे लागते, उलट्या होतात, खूप झोप येते, अशी लक्षणे आढळली असता रक्तातली साखरेची पातळी तपासणे आवश्यक आहे. लहान मुलांमध्येही टाईप वन डायबेटिसचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळत आहे. टाईप वन हा आयुष्यभर राहणारा आणि जीवनशैलीशी संबंधित आजार आहे. आहार, व्यायाम, नियमित तपासणी आणि औषधोपचार यांच्या व्यवस्थापनाने त्यावर नियंत्रण ठेवता येते. टाईप वन मधुमेहामध्ये इ्न्सुलिन घेणे या उपचारपद्धतीला पर्याय नाही. शरीरात इन्सुलिन तयार होत नसल्याने ते बाहेरून घ्यावे लागते. 

इन्सुलिन उपचार कसा असतो?

इन्सुलिन उपचारांचे चार प्रकार आहेत. रॅपिड ॲक्शन प्रकारातील इन्सुलिन १५ मिनिटांत काम सुरू करते आणि तीन ते चार तास तो परिणाम टिकतो. शॉर्ट ॲक्शन इन्सुलिन ३० मिनिटांमध्ये आपले काम सुरू करते आणि त्याचा परिणाम सहा ते आठ तास टिकतो. इंटरमिजिएट ॲक्शन इन्सुलिन एक ते दोन तासात काम सुरू करते. त्याचा परिणाम १२ ते १८ तास टिकतो. लाँग ॲक्शन इन्सुलिन घेतल्यावर काही तासांनी काम सुरू करते आणि २४ तास त्याचा परिणाम टिकतो.

व्यवस्थापन कसे करावे?

मधुमेहाचे व्यवस्थापन करणे हे संपूर्णतः जीवनशैली आणि आहारविहाराच्या सवयींवर अवलंबून आहे. टाईप वन मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी नियमितपणे डॉक्टरांशी सल्लामसलत करणे, वेळोवेळी आवश्यक तपासण्या करणे आणि औषधोपचारांचे वेळापत्रक सांभाळणे आवश्यक आहे. मधुमेह व्यवस्थापनामध्ये नियमित व्यायाम आवश्यक आहे. व्यायाम करताना डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा. आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य चौरस आहार घ्यावा. प्रक्रिया केलेले, हवाबंद डबे किंवा पाकिटातील पदार्थ टाळावेत, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जातो. आहारात फायबरयुक्त भाज्या, फळे, यांचा समावेश करणे, सोडायुक्त, बाटलीबंद पेये, फळांचे साठवणूक केलेले रस न पिणे अशा काही गोष्टी तज्ज्ञ डॉक्टर सुचवतात. जेवणाच्या वेळा शक्यतो न चुकवणेही मधुमेहींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. एकाच वेळी अधिक आहार न घेता थोड्या थोड्या वेळाने आहार घेण्याचा सल्लाही काही डॉक्टर देतात. मात्र, याबाबतीत प्रत्येकाने आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आणि अपरिहार्य आहे. मधुमेह हा टाईप वन किंवा टाईप टू प्रकारातील असेल तरी ही खबरदारी घेणे सर्वांसाठी आवश्यक आहे.