काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर यांच्या निधनाची बातमी समोर आली होती. वीणा कपूर यांच्या मुलानेच संपत्तीसाठी आईची हत्या करून मृतदेह माथेरानच्या जंगलात फेकल्याचं बोललं गेलं होतं. पण आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. ज्यांच्या हत्येची चर्चा होती त्या वीणा कपूर यांनी स्वतःच पोलिसांकडे धाव घेत आपण जिवंत असल्याचं माहिती दिली. मग नेमकं घडलं काय? निधनाची चर्चा असलेल्या वीणा कपूर जिवंत कशा झाल्या? घेऊयात जाणून…

काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईतील जुहू भागात झालेल्या हत्येनंतर मनोरंजन क्षेत्रात खळबळ माजली होती. जुहूमध्ये एका मुलाने स्वतःच्या ७४ वर्षीय आईची हत्या केली होती. हत्या झालेली ही महिला टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूर आहेत अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर अनेकांनी वीणा कपूर यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजलीही वाहिली होती.

Delhi Crime Doctor Shot dead in Hospital
Doctor Murder : “शेवटी २०२४ मध्ये हत्या केलीच”, डॉक्टरच्या हत्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा गजाआड; सोशल मीडिया पोस्टही चर्चेत!
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
BJP challenges Ajit Pawar group MLA Sunil Shelke in Maval
मावळमध्ये अजितदादा गटाच्या आमदाराला भाजपचेच आव्हान
Due to indebtedness women try to commit suicide in Indrayani river Alandi
आळंदी: इंद्रायणी नदीत ‘ती’ मृत्यूची वाट पाहत बसली; पण नियतीला काही वेगळच…
Counter movement by OBC leaders opposing Manoj Jarange agitation for Maratha reservation demand
आंतरवलीजवळ आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे तणाव; आंदोलनप्रतिआंदोलनाने वाद
CM Mamata Banerjee at JR doctors protest place near Swasthya
Kolkata Rape Case : “हा माझा शेवटचा प्रयत्न”, आंदोलकांच्या भेटीला गेलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आंदोलक डॉक्टरांना इशारा!
Sexual assault journalist Kalyan,
कल्याणमध्ये महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार
Controversy over the initials Rama written on the body of a goat
बकऱ्याच्या अंगावर लिहिलेल्या राम आद्याक्षरावरून वाद; न्यायालयात नेमके काय घडले?

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीणा कपूर यांचा लहान मुलगा सचिन कपूरने त्यांची हत्या त्यांच्याच मालकीच्या १२ कोटींच्या फ्लॅटमध्ये केली. बेस बॉलच्या बॅटने डोक्यात वार करून मुलाने आईची हत्या केली आहे. त्यानंतर त्याने कोणालाही संशय येऊ नये म्हणून आईचा मृतदेह फ्रिज पॅक केला जातो त्या मोठ्या आकाराच्या कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये पॅक केला आणि माथेरानच्या जंगलात फेकला. एवढा मोठा बॉक्स जंगलात फेकण्यासाठी आरोपीने घरातील एका नोकराची मदत घेतली होती.

आणखी वाचा- खऱ्या आयुष्यातील फिल्मी ट्विस्ट! मुलाने हत्या केल्याची चर्चा असलेल्या अभिनेत्री वीणा कपूर जिवंत; स्वत: पोलीस ठाण्यात पोहचल्या अन्…

मात्र आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी हत्या झालेली महिला या अभिनेत्री वीणा कपूर नव्हत्या तर जुहू भागात राहणारी अन्य एक महिला होती. या महिलेचं नावही वीणा कपूर असं होतं. त्यांचा मुलगा सचिन कपूरने आईची हत्या केली होती. दोघींचीही नावं एकसारखी असल्याने गोंधळ उडाला आणि मृत महिला या अभिनेत्री वीणा कपूर असल्याचं वृत्त व्हायरल झालं होतं.

कशी पसरली निधनाची अफवा?

वीणा कपूर यांच्या निधनाबद्दल पहिल्यांदा ‘विरल भयानी’ या सेलिब्रिटी वृत्तांकन करणाऱ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आली होती. मात्र नंतर ती पोस्ट डिलिट करण्यात आली. पण त्याच पोस्टचे स्क्रिनशॉट शेअर करत टीव्ही अभिनेत्री नीलू कोहली यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून वीणा कपूर यांचं निधन झाल्याची पोस्ट शेअर केली. “वीणाजी तुम्ही यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी डिजर्व्ह करत होता. मी दुःखी आहे. तुमच्यासाठी ही पोस्ट लिहित आहे. काय बोलू? आज माझ्याकडे शब्द नाहीत. आशा करते की, एवढ्या वर्षांच्या संघर्षांनंतर अखेर तुम्ही शांततेत आराम करत असाल. जुहू भागातील हा तो बंगला आहे जिथे ही धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या ७४ वर्षीय आईची बेसबॉलच्या बॅटचा वापर करून हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह माथेरान येथे फेकला. मात्र अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या मुलाला याची शंका आली आणि त्याने जुहू पोलिसांना याबाबत अलर्ट केलं,” असं आपल्या पोस्टमध्ये नीलू कोहली यांनी म्हटलं होतं.

neelu kohli instagram

निधनाची चर्चा असलेल्या वीणा कपूर पोहोचल्या पोलीस ठाण्यात

मागच्या काही दिवसांपासून मुलाने हत्या केल्याची चर्चा असलेल्या अभिनेत्री वीणा कपूर यांनी आता पोलिसांत धाव घेत निधनाची अफवा पसरवल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. वीणा कपूर यांच्या निधनाची बातमी प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. एवढंच नाही तर त्यांच्या मुलाविरोधातही अनेकांनी संताप व्यक्त केला होता. सोशल मीडियावर अनेकांनी त्याला ट्रोल केलं होतं. आता अभिनेत्री वीणा कपूर यांनी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे.

veena kapoor FIR

अभिनेत्री वीणा कपूर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करताना सांगितलं की, “मी जिवंत आहे. मात्र माझ्याबद्दल सोशल मीडियावर चुकीचं वृत्त पसरवलं जात आहे. सोशल मीडियावर मला श्रद्धांजली वाहण्यात आली आणि माझ्या मुलालाही अपमानित करण्यात आलं आहे. यामुळे आमच्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.”

आणखी वाचा-विश्लेषण : ‘बेशरम रंग’ ते हिंदू महासभेचा आक्षेप; ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?

“मी खूप त्रासले आहे. माझे फोटो व्हायरल झाले आहेत. मला लोक श्रद्धांजली वाहत आहेत. लोकांचे फोन येत आहेत. मला माझ्या कामावरही लक्ष देता येत नाही आहे. त्यामुळे आता मी सर्वांना सांगू इच्छिते की माझ्या मुलाने माझी हत्या केलेली नाही. मी जिवंत आहे आणि माझ्या निधनाचं वृत्त ही केवळ अफवा आहेत. या खोट्या अफवांमुळे मला काम मिळणं बंद झालं आहे,” असंही वीण कपूर यांनी या अफवेचा कुटुंबावर आणि करियरवर झालेल्या परिणामाबद्दलची माहिती देताना म्हटलं आहे.