White Gold in Ukraine : बलाढ्य रशियाने युक्रेनवर आक्रमण करून दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालाय. मात्र, अद्यापही हे युद्ध संपलेलं नाही. दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान होत असलं तरी रशिया माघार घ्यायला तयार नाही, तर युक्रेन झुकायला तयार नाही. परिणामी युद्ध सुरूच आहे. रशियानं युक्रेनविरोधात युद्ध पुकारण्यामागे अनेक कारणे आहेत, त्यापैकीच एक म्हणजे युक्रेनच्या जमिनीत असलेला लिथियम म्हणजेच पांढऱ्या सोन्याचा (White Gold) साठा आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. युक्रेनने या साठ्याचा योग्य वापर केला गेला तर युक्रेन हा लिथियमचा सर्वात मोठा साठा असलेला देश बनू शकतो, असे म्हटले जाते. विशेष बाब म्हणजे लिथियमचे बहुतेक साठे युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास भागात आहेत. हा तोच भाग आहे, ज्यावर २०१४ पासून रशियन फुटीरतावाद्यांनी कब्जा केला आहे. तसेच युद्ध पुकारल्यानंतरही रशियन सैन्याची आक्रमकता या भागात जास्त पाहायला मिळत आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

लिथियम म्हणजेच पांढरं सोनं नेमकं काय आहे?

लिथियम चांदीसारखा चमकणारा एक पांढरा रासायनिक धातू आहे. तो वजनाने खूप हलका आहे. गेल्या काही वर्षांत लिथियमचा वापर बॅटरी बनवण्यासाठी होत आहे. लिथियमचा वापर आता स्मार्टफोन आणि लॅपटॉपपासून इलेक्ट्रिक वाहनांपर्यंतच्या बॅटरीमध्ये केला जात आहे. यामुळेच जगभरात लिथियमची मागणी वाढू लागली असून कंपन्या लिथियमच्या मागे लागल्या आहेत. लिथियम हे जगाच्या ऊर्जेच्या गरजांचे भविष्य असल्याचे मानले जाते. भविष्यात जीवाश्म इंधने म्हणजेच पेट्रोल-डिझेल, कोळसा यांच्या घटत्या उपलब्धतेमुळे त्यांना पर्याय म्हणून क्लीन एनर्जीकडे वाटचाल करत आहे. क्लीन एनर्जी ही अशी ऊर्जा आहे, ज्यामुळे वातावरणात प्रदूषण होत नाही. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा ही अशी अक्षय ऊर्जा म्हणजेच कधीही न संपणारी ऊर्जा आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is white gold for which russia attacked ukraine ttg
First published on: 28-04-2022 at 18:10 IST