Who Are The Aghoris? येत्या १३ जानेवारी रोजी सुरु होणाऱ्या महाकुंभमेळ्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या कुंभमेळ्याच्या निमित्ताने येणाऱ्या साधूंकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. त्यांचा वेश, अविर्भाव, त्यांच्या आगमनाची पद्धत अशा सर्वच गोष्टींची सर्वत्र चर्चा आहे. त्यातही अक्राळविक्राळ, अंगावर भस्म, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, जटाधारी अघोर साधूंबाबतीत चर्चा आणि भीती असे समीकरण अनुभवायला मिळते. अघोरी हे शिवाचे भक्त असले तरी एक अनामिक गूढतेच वलय या साधूंभोवती असते. त्याच पार्श्वभूमीवर हे ‘अघोरी साधू’ नेमके कोण आहेत, याचा घेतलेला हा शोध.

अघोरी कोण आहेत?

भारतीय सांस्कृतिक इतिहासात अनेक रहस्यमय परंपरा आहेत, त्याच परंपरेत अघोरी पंथांचा समावेश होतो. अघोरी हे या देशातील सर्वात रहस्यमय आणि आकर्षक आध्यात्मिक पंथांपैकी एक आहेत. हे संन्यासी एका विशिष्ट गूढतेने, भीतीने आणि आकर्षणाने वेढलेले असतात. अघोरी हा शैव संप्रदायातील संन्यासी साधूंचा एक पंथ आहे. ते त्यांच्या असामान्य प्रथांसाठी ओळखले जातात. यात स्मशानभूमीत वास्तव्य करणे, आपल्या शरीरावर राखेचे लेपन करणे, मानवी कवट्या पात्र म्हणून वापरणे आणि मृतदेहाचे मांस सेवन करणे यांचा समावेश होतो. या प्रथांचा उद्देश शुद्धता-अशुद्धता, जीवन-मृत्यू, चांगले-वाईट यांच्यातील सीमारेषा ओलांडणे हा आहे. त्यांच्या प्रथा, विश्वास आणि जीवनशैली fascination (आकर्षण) आणि apprehension (भिती) यांचे मिश्रण निर्माण करतात. अघोरी त्यांच्या आगळ्या-वेगळ्या विधींसाठी प्रसिद्ध आहेत. या विधी समाजाच्या पारंपरिक नियमांना आव्हान देतात.

Prince Karim Aga Khan iv loksatta
व्यक्तिवेध: प्रिन्स आगा खान चौथे
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Four lakh devotees in Pandharpur for Maghi Ekadashi
टाळ-मृदंग, विठ्ठलनामाने दुमदुमली पंढरी!
Devotees take boat rides at the Sangam during ongoing Mahakumbh Mela, in Prayagraj, Uttar Pradesh, Friday, Feb. 7, 2025.
Mahakumbh 2025 : “महाकुंभमेळा चेंगराचेंगरीत मी माझी आई गमावली, आता तिच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी मला…”, मुलाने व्यक्त केली खंत
significance of Vasant Panchami
Vasant Panchami: वसंत पंचमी आणि निजामुद्दीन दर्गा यांचा काय संबंध?
MahakumbhMela 2025
Mahakumbh Mela 2025: हिंदू साधू हे व्यापारी की योद्धे? साधूंचे आखाडे नेमके आहेत तरी काय?
Jitendra Awhad
Namdeo Shastri : “समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट”, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया चर्चेत
Santosh Juvekar
“डोळ्यात पाणी…”, ‘छावा’मधील राज्याभिषेकाच्या सीनबाबत संतोष जुवेकर म्हणाला, “विकी कौशलची एन्ट्री…”

अधिक वाचा: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?

अघोरींचा उगम

अघोरी हा शब्द संस्कृतमधील अघोर या शब्दावरून आला आहे. अघोर म्हणजे निर्भय किंवा ज्याला कशाचाच घोर नाही असा होय. अघोरी हा शैव संप्रदायातील साधूंचा (संन्यासी) एक पंथ आहे. अघोर हा पंथ ‘औघड’, ‘औदर’, ‘सरभंग’ व ‘अवधूत’ अशाही नावांनी ओळखला जात होता. प्राचीन उल्लेखांपैकी अथर्ववेदात व यजुर्वेदात शिवाच्या अघोर तनूचे उल्लेख आहेत. ‘अघोरीश्वर’ या नावाने शिवाची उपासना म्हैसूर व इतर भागांतही केली जाते. यावरून प्रस्तूत पंथाचा संबंध शैव संप्रदायातील पाशुपत व कालमुख या पंथांशी जोडला जातो. हे पंथ त्यांच्या तांत्रिक साधनेसाठी ओळखले जात होते. त्यांच्या साधना मार्गात उग्र देवतांची पूजा आणि मादक पदार्थांचा (पंच मकारांचा) समावेश होता. तसेच अघोरांच्या काही सिद्धांचा संबंध नाथपंथाशी जोडला जातो.

(Reuters)

अघोरींच्या परंपरा आणि तत्त्वज्ञान

अघोरी अद्वैतवादी दृष्टिकोनाचे पालन करतात. ब्रह्मांडातील सर्व काही एकच आहे आणि ते ब्रह्म किंवा अंतिम सत्यापासून उत्पन्न झाले आहेत असं मानतात. त्यांचा विश्वास आहे की, प्रत्येक व्यक्तीचा आत्मा हा शिव आहे. जे ब्रह्माचे सर्वोच्च स्वरूप आहे. परंतु तो आठ प्रमुख बंधनांनी जखडलेला असतो. ही बंधन अज्ञान आणि दुःख निर्माण करतात. या बंधनांमध्ये शारीरिक सुख, क्रोध, लोभ, आसक्ती, भीती, द्वेष, अभिमान आणि भेदभाव यांचा समावेश होतो. अघोरी हे बंधन तोडून स्वतःला शिवाशी जोडून मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. हे ध्येय साध्य करण्यासाठी अघोरी जाणीवपूर्वक अशुद्ध, दूषित आणि अप्रिय गोष्टींचा स्वीकार करतात. कारण त्यांचा विश्वास आहे की या सर्व गोष्टी शिवाचेच स्वरूप आहेत आणि काहीही स्वभावतः वाईट किंवा पापी नाहीत. ते जीवन आणि मृत्यू यातील द्वैत ओलांडण्याचा प्रयत्नही करतात.

कुंभमेळ्यात अघोरींची रहस्यमय उपस्थिती

कुंभमेळ्यातील सर्वाधिक लक्षवेधक व्यक्तींमध्ये अघोरींचा समावेश होतो. जे त्यांच्या अपारंपरिक प्रथांसाठी ओळखले जातात. मुख्य प्रवाहातील भक्तीच्या पार्श्वभूमीवर अघोरींची उपस्थिती ठळकपणे वेगळी दिसते. राखेने माखलेले, विस्कटलेले केस आणि हाती कवट्या घेतलेले अघोरी पारंपरिक शुद्धता आणि अशुद्धतेच्या संकल्पनांना आव्हान देतात. त्यांच्या काही प्रथा जसे की मांसाचे सेवन आणि मद्यपान या मुख्य प्रवाहातील हिंदू धर्मात निषिद्ध मानल्या जातात. त्या अनेकांसाठी धक्कादायक वाटू शकतात. परंतु, अघोरींसाठी या कृती समाजाच्या नियमांना ओलांडण्याचे आणि अस्तित्वाच्या अंतिम सत्याचा स्वीकार करण्याचे प्रतीक आहेत. कुंभमेळ्यातील त्यांची उपस्थिती कुतूहल आणि कधीकधी घृणा निर्माण करणारी असली तरी हिंदू धर्मातील अध्यात्मिक विश्वास आणि प्रथा यांच्या विस्तृत विविधतेची आठवण करून देते.

अतिलिया प्रथा

यूआन श्वांग या चिनी प्रवाशाने ह्या पंथियांचे वर्णन केलेले आहे. अंगाला राख फासलेली, गळ्यात मनुष्य कवट्यांच्या माळा व नग्न अशा अवस्थेत हे लोक राहत. काही लोक झाडांच्या साली किंवा पाने, तर काही व्याघ्रचर्म नेसत. चामुंडा ही त्यांची देवता असून ते तिला नरबळी देत. प्रेताचे मांसही ते खात. आनंदगिरीनेही शांकरदिग्विजयात त्यांचे असेच वर्णन केलेले आहे. घोड्याचे मांस वर्ज्य करून इतर सर्व प्रकारचे मांस ते खात. स्वत:चे मलमूत्रही ते अन्नात मिसळून खात. त्यामुळे अदभुत सामर्थ्य प्राप्त होते अशी त्यांची धारणा होती. ह्या प्रकाराला ते ‘अतिलिया’ म्हणतात. इंगजी अमदानीत नरबळीची प्रथा व नग्नसंचार बंद झाला. माणसांच्या हाडांच्या माळांऐवजी ते स्फटिकांच्या व रूद्राक्षांच्या माळा वापरू लागले आहेत. किनराम हा अठराव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेलेला सिद्धपुरूष त्यांचा प्रसिद्ध आचार्य होय. त्याने लिहिलेला विवेकसार हा ग्रंथ पंथात प्रमाण समजला जातो. त्याच्याच नावावरून ह्या पंथास ‘किनरामी पंथ’ असेही म्हटले जाते.

गैरसमज आणि वास्तविकता

अघोरींभोवती असलेले गूढ वातावरण त्यांच्या पद्धतींबद्दल अनेक गैरसमज निर्माण करते. काही लोक त्यांना भीतीदायक किंवा विचित्र मानतात, पण त्यांचा जीवनमार्ग स्वीकार आणि आत्मोर्ध्वत्वाच्या (आध्यात्मिक उन्नतीच्या) तत्त्वज्ञानावर आधारित आहे. त्यांच्या अनोख्या कृती आपल्याला जीवनाच्या क्षणभंगुरतेची आणि आध्यात्मिक प्रगतीच्या महत्त्वाची आठवण करून देण्याचा प्रयत्न करतात.

कुंभमेळ्यातील अघोरी: अपारंपरिकता आणि जीवनाच्या क्षणभंगुरतेचा स्वीकार

कुंभमेळ्यातील अघोरी अपारंपरिकतेच्या आणि जीवनाच्या क्षणभंगुरतेच्या स्वभावाचे प्रतीक आहेत. स्मशानभूमीतील वास्तव्य आणि मानवी अवशेषांचा उपयोग अशा त्यांच्या अपारंपरिक प्रथा सामाजिक नियमांना आव्हान देतात. या मर्यादा ओलांडणे ही आध्यात्मिक प्रबोधनाची वाट मानली जाते, जी हिंदू धर्मातील विश्वास आणि प्रथांच्या विविधतेला अधोरेखित करते. त्यांच्या प्रथा काहींना अस्वस्थ वाटू शकतात, परंतु त्या कुंभमेळ्याच्या अनुभवाचा एक अद्वितीय आणि अभिन्न भाग आहेत. त्या आपल्याला मानवी अस्तित्वाच्या विस्तृत पैलूंची आठवण करून देतात आणि ईश्वराशी जोडण्यासाठी विविध मार्गांचा स्वीकार करायला शिकवतात.

अधिक वाचा: नागा साधू कोण आहेत? त्यांचा कुंभमेळ्याशी काय संबंध? त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण कसे केले?

अघोरी कुंभमेळ्यात का सहभागी होतात?

अघोरी त्यांच्या अपारंपरिक प्रथांसाठी ओळखला जाणारा हिंदू संन्यासी पंथ प्रामुख्याने आध्यात्मिक कारणांसाठी कुंभमेळ्यात सहभागी होतो. त्यांचा विश्वास आहे की, कुंभमेळ्यातील नद्यांचा संगम प्रचंड आध्यात्मिक शक्तीचा स्रोत आहे आणि या पर्वकाळात या पवित्र जलांमध्ये स्नान केल्याने त्यांचे पाप धुतले जाते आणि त्यांना जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती (मोक्ष) मिळू शकते.

सामाजिक नियमांच्या पलीकडे…

कुंभमेळा अघोरींना इतर संन्यास्यांशी जोडून घेण्याची आणि आपले आध्यात्मिक ज्ञान वाटण्याची अनोखी संधी देखील प्रदान करतो. कुंभमेळा अघोरींना त्यांची शिकवण समाजासमोर मांडण्यासाठी आणि सामाजिक नियमांच्या पलीकडे जाण्याचे उदाहरण देण्यासाठी एक व्यासपीठ ठरते. याशिवाय, अनेक अघोरी या मेळ्यात विस्तृत तांत्रिक विधींचे आयोजन करतात.

अघोरींकडून शिकण्यासारखे आध्यात्मिक धडे

त्यांच्या अपारंपरिक पद्धती असूनही अघोरींमुळे आपल्याला गहन आध्यात्मिक धडे मिळतात. ते सामाजिक नियम नाकारतात आणि चांगले-वाईट अशा लेबल्सच्या पलीकडे पाहण्याचे महत्त्व शिकवतात. अघोरी मृत्यूवर लक्ष केंद्रित करून जीवनाच्या क्षणभंगुरतेवर भर देतात. ते सर्वसमावेशकतेचा दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी प्रेरित करतात. अघोरी प्रथमदर्शनी विचित्र किंवा भयंकर वाटू शकतात. परंतु, त्यांचे जीवन गहन आध्यात्मिक शोधाला समर्पित असते. कुंभमेळ्यातील त्यांची उपस्थिती केवळ आध्यात्मिक अनुभव समृद्ध करत नाही तर जीवन आणि मृत्यूच्या गहन वास्तवाचा विचार करण्यास देखील प्रवृत्त करते.

Story img Loader