राखी चव्हाण

समृद्धी महामार्गासाठी आधीच सुमारे पावणेदोन लाख झाडांचा बळी देण्यात आला आहे. या ७०० किमी लांबीच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी १२ फूट उंचीची अखंड भिंत बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर गदा येणार असे भाकीत आधीच वन्यजीव अभ्यासकांनी वर्तवले होते. ते टाळायचे तर वन्यजीव क्षेत्रात अधिकाधिक भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलांची आवश्यकता आहे. मात्र, महामार्ग लवकर पूर्ण करण्याच्या नादात वन्यजीवांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे महामार्गावर वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू होत आहेत.

nagpur, New Underpass, Road Under Railway line, Manas Chowk, Causes Issues, Large Vehicles, Traffic Congestion,
मानस चौकातील भुयारी मार्गामुळे नागपूरकरांना भोवळ! बोगदा संपताच सिग्नल असल्याने वाहतूक कोंडी
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
tipeshwar sanctuary, archi tigress, cubs, attracting tourists, viral video, yavatmal, nagpur,
VIDEO : टिपेश्वरच्या जंगलात “आर्ची” आणि तिच्या बछड्याने पर्यटकांना लावले वेड
Overcrowding on footbridges at Thane station
ठाणे स्थानकातील पादचारी पुलांवर गर्दीचा महापूर

वन्यप्राणी शमन उपाययोजनेचे काय झाले?
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गादरम्यान रस्त्याच्या कोणत्या भागात वन्यजीवांसाठी किती भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल असावेत, हे ठरवण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. रस्ते विकास महामंडळाने भारतीय वन्यजीव संस्थेला त्यावर अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी मोठे अनुदान उपलब्ध करून दिले होते. डेहरादूनच्या या संस्थेने त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून दोन-चार महिन्यांत अहवाल तयार करवून घेतला.

समितीसमोर न ठेवताच अहवाल मंजूर?
भारतीय वन्यजीव संस्थेचा अहवाल येण्याआधीच महामंडळाने या मार्गाचे काम सुरू केले. या अहवालाच्या योग्यतेची पडताळणी न करताच तो मंजूर केला तर वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येणार हे निश्चित, असा इशारा तज्ज्ञ समितीतील वन्यजीव अभ्यासकांनी दिला होता. तो आता खरा ठरला आहे.

समितीला अहवाल देण्यात टाळाटाळ का?
तज्ज्ञ समितीची पहिली बैठक झाली त्या वेळी भारतीय वन्यजीव संस्था कुठेही चर्चेत नव्हती. १३ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या दुसऱ्या बैठकीत या संस्थेलाही प्रकल्पात सामावून घेण्यात आले. जानेवारी २०१९ मध्ये या संस्थेने उपाययोजनांचा अहवाल तयार केला. मात्र तो समितीच्या सदस्यांना देण्यात आला नाही. १७ जानेवारी २०२० ला झालेल्या तिसऱ्या बैठकीच्या चार दिवस आधी हा अहवाल समितीला देण्यात आला. त्यातही बैठकीदरम्यान भारतीय वन्यजीव संस्थेच्या पदाधिकाऱ्याने अहवालाचे सादरीकरण केले आणि रस्ते विकास महामंडळाने तज्ज्ञ समितीला डावलत राज्य सरकारकडून अहवाल मंजूर करून घेण्याची घाई सुरू केली. उपाययोजनांचा अहवाल कितपत बरोबर आहे, हे पाहण्याची संधी समितीतील तज्ज्ञांना न देताच महामार्गाची वाट मोकळी करण्यात आली.

वन्यप्राण्यांवर काय परिणाम होईल?
महामार्गामुळे जंगलाचे दोन भाग झाले, तर त्याचा विपरीत परिणाम वाघ आणि इतर प्राण्यांच्या वंशवेलीवर होणार आहे. गुजरातमध्ये सिंहांची संख्या एकाच प्रदेशात केंद्रित झाल्याने त्याचे विपरीत परिणाम झाले. अनेक सिंह विशिष्ट आजाराने ग्रस्त झाले आणि अनेकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील वाघाने जागतिक पातळीवर आपली मोहोर उमटवली आहे. त्यामुळे गुजरातच्या सिंहांसारखीच त्यांची स्थिती होऊ द्यायची नसेल, तर समृद्धी महामार्गावरही काळजीपूर्वक उपाययोजना कराव्या लागतील. अन्यथा वाघांच्या अधिवासावर विपरीत परिणाम होतील. महाराष्ट्रातील अनेक वाघांनी मध्य प्रदेशसह इतर राज्यांत स्थलांतर करून वंशवेल अभंग ठेवली आहे.

समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर वन्यजीवांना अटकाव झाला का?
समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले तेव्हाच या महामार्गावर वन्यप्राण्यांचा वावर सुरू झाला होता. सुरुवातीलाच दोन काळविटे धावतानाची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवरून प्रसारित झाली होती. उद्घाटनाच्या दिवशीच अजगरानेही या महामार्गाची ‘चाचपणी’ केली. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी माकडाचा मृत्यू झाला. त्याची चर्चा थांबत नाही तोच वाहनाच्या धडकेत एकाच वेळी १४ रानडुकरे मृत्युमुखी पडली. आता चार दिवसांपूर्वी या महामार्गावर नीलगायींचा वावर आढळला. ही फक्त समोर आलेली उदाहरणे आहेत. यादरम्यान कितीतरी लहानमोठय़ा वन्यप्राण्यांचे या महामार्गावर बळी गेले असण्याची शक्यता आहे.

ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील स्थितीची पुनरावृत्ती?
नागपूर ते जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ४४ पेंच व्याघ्रप्रकल्पातून जातो. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या प्रश्नावरून तो तब्बल १० वर्षांहून अधिक काळ रखडला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वन खाते या दोघांच्याही न्यायालयातील फेऱ्या संपता संपल्या नाहीत. न्यायालयात धाव घेणाऱ्या वन्यजीवप्रेमींची यात सरशी झाली. भारतीय वन्यजीव संस्थेलाच या मार्गावर वन्यप्राण्यांसाठी शमन उपाययोजना करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्या संस्थेने ती पार पाडली नाही, त्यामुळे या महामार्गावर वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूचे सत्र अद्याप थांबलेले नाही. त्याच संस्थेला समृद्धी महामार्गावर शमन उपाययोजनेचे काम देण्यात आले होते, त्याचे परिणाम समोर येत आहेत.
rakhi.chavhan@expressindia. com