गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांना उतरती कळा लागली आहे. बॉलिवूडमधील मोठमोठ्या कलाकारांचे चित्रपट एकामागून एक फ्लॉप होताना दिसत आहे. एकेकाळी सुपरहिट चित्रपट देणारे हिंदी चित्रपटसृष्टी आता मात्र सुपर फ्लॉप ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई करणारे चित्रपट आता मात्र चित्रपटगृहात कधी प्रदर्शित होतात आणि कधी पडतात हेच समजत नाही. बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि करीना कपूरचा बहुप्रतीक्षित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहेत. विशेष म्हणजे याच दिवशी अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन हिंदी चित्रपटांची तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटांवर बहिष्कार टाका, असे एकीकडे बोललं जात आहे. तर दुसरीकडे विविध मुद्द्यांवरुन यावर टीकाही केली जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हे दोन्हीही चित्रपट ट्रोल होताना दिसत आहे. त्यासोबतच तसंच गेल्या काही दिवसांपासून सतत चित्रपट फ्लॉप होण्याचं बॉलिवूडला ग्रहण लागलं आहे. रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ असो किंवा नुकताच प्रदर्शित झालेला ‘एक व्हिलन रिटर्न्स’, आर माधवनचा ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ असो किंवा मग आयुष्मान खुरानाचा ‘माणिक’, हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असलेला ‘रनवे 34’ किंवा अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’, अगदी कंगना रणौतचा ‘धाकड’ हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकामागून एक आपटले. यातील अनेक चित्रपट हे सुपरहिट होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र तरीही या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारच थोडी थोडकी कमाई केली.

पण हिंदी चित्रपट अशाप्रकारे एकामागून एक फ्लॉप होण्यामागचे कारण नेमकं काय? असे सातत्याने का होत आहे? यापुढील चित्रपटांच्याबाबतही असे होऊ शकते का? हिंदी चित्रपटांच्या विषयांची निवड चुकीची ठरतेय का? याबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. नुकतंच ट्रेड विश्लेषक कोमल नहाटा यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी या विषयावर त्यांचे मत मांडले. तसेच हे सातत्याने का होते याबद्दलही त्यांनी सांगितले.

हिंदी चित्रपटातील कलाकारांना तरुणाई कंटाळली आहे का?

एकीकडे बॉलिवूड चित्रपट हे एकामागून एक फ्लॉप होताना दिसत आहे. तर दुसरीकडे दाक्षिणात्य कलाकारांचे ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ २’ यासारखे चित्रपट विक्रमी कमाई करताना दिसत आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आपटले असले तरी बॉलिवूडपेक्षा त्या चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटांची जादू ओसरल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसू लागले आहे. नुकतंच याबाबत बोलताना कोमल नहाटा म्हणाले, करोना आणि लॉकडाऊन काळात अनेक लोकांनी वेगवेगळ्या सॅटलाइट चॅनल आणि युट्यूबद्वारे डब केलेले अनेक दाक्षिणात्य चित्रपट पाहिले. त्यामुळे दक्षिणेतील अनेक कलाकार हे घराघरात प्रसिद्ध झाले. त्यांची ओळख देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली.

हे काही प्रमाणात खरे असले तरी यातील काही गोष्टी अधोरेखित करण्यासारख्या नक्कीच आहेत. यातील एक मुद्दा म्हणजे अजय देवगण, सलमान खान, अक्षय कुमार या बॉलिवूड सुपरस्टारची नाव ही आजही घराघरात प्रसिद्ध आहेत. बॉलिवूड चित्रपट चांगले न चालण्यामागचे एक कारण म्हणजे हल्लीची तरुण पिढी ही त्या विचारांशी जोडली जात नाही. हिंदी चित्रपटांशी जोडण्यास तरुणाईला फार वेळ लागतो किंवा त्यासाठी डोक्यावर फार तणाव द्यावा लागतो. ‘लायगर’ या चित्रपटाने दमदार कमाई केली. कारण त्या चित्रपटाचा विषय हा लोकांशी जोडलेला होता. या चित्रपटाची टॅगलाईन ‘साला क्रॉस ब्रीड’ हिच फार लोकप्रिय ठरली. त्यामुळे आपोआपच चित्रपट सुपरहिट ठरला. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटांचे निर्माते ज्यांना आपला वाईट काळ सुरु आहे असे वाटतं आहे, तर असे काहीही नाही. हा तुमचा वाईट काळ नाही. तुमच्या चित्रपटांचे ट्रेलर हे लोकांनी जोडले न जाणे हे यामागचे कारण आहे.

चित्रपटातील दृश्य समजून घेताना नाकी नऊ

काही दिवसांपूर्वीच जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला एक व्हिलन रिटन्र्स हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. हा चित्रपट पाहताना प्रकर्षणाने जाणवते की, या चित्रपटाची कथा निर्मात्याने ऐकलीही नाही आणि शूटींगनंतर ती पाहिलीही नाही. फक्त एका लोकप्रिय चित्रपटाचा दुसरा भाग काढायचा आणि प्रेक्षकांना हिंदी चित्रपटांकडे वळवायचे यासाठी त्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. अन्यथा अशाप्रकारचा चित्रपट करण्यास कोण तयार होऊ शकतं, ज्यात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे जॉन अब्राहम हा टॅक्सी ड्रायव्हर आहे. पण तो शॉपिंग मात्र मोठ्या मॉलमध्ये करतो.

या चित्रपट एक ना अनेक चुका आहेत. यातील अनेक दृश्ये समजून घेण्यासाठी मनावर ताण द्यावा लागतो. लोकांचा कमी प्रतिसाद पाहून आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारपासून या चित्रपटाच्या तिकिटांचे दर कमी करण्यात आले होते.

ओटीटीचा आग्रह

याबाबत निर्माती एकता कपूर ही फार हुशार आणि चार्तुयबुद्धीने विचार करते. कारण अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘दोबारा’ हा चित्रपट नेटक्लिप्सवर प्रदर्शित करण्याऐवजी तिने तो चित्रपटगृहात प्रदर्शित केला असता. जेव्हा अनुरागने एकता कपूरला दोबारा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दाखवला तेव्हा तिला फार आनंद झाला. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित व्हावे, असे अनुराग कश्यप यांना वाटते होते. मात्र एकता कपूरने हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित व्हावा यासाठी आग्रह धरला. हा चित्रपट पाहण्यापूर्वी तिने नेटफ्लिक्ससोबत करारही केला होता. त्यामुळे हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित झाला. त्यामुळे चित्रपटागृहांमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट हा ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर सहाजिकच कमी पैसे मिळतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are bollywood big budget films failing at the box office know the reason nrp
First published on: 09-08-2022 at 14:14 IST