कुलदीप घायवट

लोकल प्रवास किफायतशीर दरात आणि वेगात होत असल्याने प्रवासी धक्काबुक्की सहन करून, गर्दी असली तरी लोकलमधून प्रवास करतात. नेहमीची लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची प्रचंड धावपळ असते. मात्र लोकलची धाव मंदावण्याची चिन्हे आहेत. लोकलचे मोटरमन ‘काम बंद’ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. परिणामी, लोकल सेवा खंडित होऊन लाखो प्रवाशांचे हाल होण्याची भीती आहे.

A group of people looking at stock market data on a screen.
Hindenburg : हिंडनबर्ग रिसर्च बंदची घोषणा अन् अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; BSE वर अदाणी पॉवर, ग्रीन एनर्जी तेजीत
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Sudhir Mungantiwar , Chandrapur Power Station,
“…तर चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच बंद करू,” मुनगंटीवार यांचा इशारा
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
Why are indigenously made Dhruva helicopters frequently involved in accidents
स्वदेशी बनावटीच्या ध्रुव हेलिकाॅप्टर्सचे वारंवार अपघात का होत आहेत?

मोटरमन ‘काम बंद’ आंदोलन का करणार?

एका मोटरमनच्या खांद्यावर हजारो प्रवाशांची जबाबदारी असते. त्यामुळे त्याला संपूर्ण लक्ष केंद्रित करून, लोकल चालवावी लागते. सर्व सिग्नल, ओव्हरहेड वायर, मार्गिका बघून लोकलचे चाक सुरू ठेवावे लागते. रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या, आत्महत्या करण्यासाठी आलेल्या नागरिकांना वेळीच हेरून शक्य असल्यास आपत्कालीन ब्रेक लावतात. मात्र लोकल चालवताना मोटरमनकडून अनेकदा सिग्नल तोडणे, निश्चित थांबा ओलांडणे (प्लॅटफॉर्म ओव्हरशूटिंग) असे प्रकार घडतात. अशा घटना टाळण्यासाठी मोटरमनला कायम सतर्क करण्याच्या उद्देशाने मोटरमनच्या केबिनमध्ये आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. यात सिग्नल लोकेशन अनाऊन्समेंट सिस्टम (एसआयएएस) आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (एडीएएस) प्रणाली आहे. मात्र याच नव्या प्रणालीला मोटरमननी विरोध दर्शवला आहे.

आणखी वाचा-विश्लेषण: मुंबई महापालिकेच्या प्रकल्प खर्चात वाढ का होतेय? नेमके कारण काय?

‘एसआयएएस’ आणि ‘एडीएस’ प्रणाली काय आहे?

रेल्वे मंडळाच्या सूचनेनुसार, लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये सिग्नल लोकेशन अनाऊन्समेंट सिस्टम (एसआयएएस) आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (एडीएएस) बसविली जात आहे. मध्य रेल्वेवर प्रायोगिक तत्त्वावर दोन लोकलमध्ये ही यंत्रणा बसवली असून हळूहळू सर्व लोकलमध्ये या प्रणालीचा विस्तार केला जाईल. मोटरमनच्या उजव्या आणि डाव्या दिशेकडील आगामी सिग्नलची माहिती देऊन मोटरमनला ही प्रणाली सतर्क करेल. मोटरमनला आगामी सिग्नलची माहिती ३५० मीटर आणि २५० मीटर पूर्वी अशी दोनदा मिळेल. त्यामुळे मोटरमनकडून सिग्नल तोडण्याच्या घटना कमी होण्याची शक्यता आहे. ‘एडीएएस’द्वारे मोटरमनच्या वर्तनावर आणि सतर्कतेवर लक्ष ठेवले जाईल. ‘एडीएएस’मध्ये तीन कॅमेरे समाविष्ट आहेत. मोटरमनच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपण्यासाठी एक कॅमेरा, कॅमेरा केबिनचे दृश्य टिपण्यासाठी दुसरा आणि रेल्वे रूळ आणि ओव्हरहेड उपकरणांचे समोरचे दृश्य टिपण्यासाठी तिसरा कॅमेरा आहे.

मोटरमनच्या कामावर लक्ष कसे राहणार?

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून ‘एडीएएस’ मोटरमनच्या स्थितीचे सतत मूल्यांकन करेल. मोटरमनचे लक्ष विचलित होणे, त्याला झोप येणे किंवा तंद्री लागणे, मोबाइल फोनचा वापर करणे, अगदी मोटरमनने धूम्रपान किंवा जांभई दिली तरी तेही टिपण्यास ही यंत्रणा सक्षम आहे. अशा प्रकारची किंवा याव्यतिरिक्त कोणतीही चुकीची कृती होत असल्यास ‘एडीएएस’ तात्काळ मोटरमनला सतर्क करेल. ज्यामुळे मोटरमन त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करेल.

आणखी वाचा-Gandhi Jayanti 2023: अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यापासून महात्मा गांधींनी कशी प्रेरणा घेतली?

सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास विरोध का?

सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे मोटरमन काय करतोय त्याचीच फक्त माहिती मिळणार आहे. इतर कोणत्याही बाबींचा उलगडा होणार नाही. सतत मोटरमनवर लक्ष ठेवण्यात येईल. लोकल पूर्वीही व्यवस्थित धावत होत्या आणि आताही धावत आहेत. मोटरमनच्या प्राथमिक सोयीसुविधांसाठी रेल्वे प्रशासनाकडे पैसे नाहीत. मात्र अनावश्यक नव्या प्रणालीवर खर्च करण्यास पैसे येतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येत आहे. त्यामुळे हा निर्णय स्थगित करावा. अन्यथा याविरोधात मोटरमन आंदोलन करतील, असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी सांगितले. मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याने, आणि नव्या प्रणालीतून सतत मिळणाऱ्या सूचनांमुळे मोटरमनचे लक्ष विचलित होईल. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे मोटरमनच्या कामावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उलट प्रवाशांच्या सुरक्षेवरच विपरीत परिणाम होणार आहे. मोटरमनला मार्गदर्शन करायचे असल्यास, एका लोकलमध्ये दोन मोटरमन ठेवावेत, असे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे मुंबई विभागाचे अध्यक्ष विवेक सिसोदिया यांनी सांगितले.

नवीन यंत्रणेचा वापर कारवाईसाठी?

मोटरमनच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास विरोध नाही. मात्र मोटरमनच्या चेहऱ्यासमोरच कॅमेरा लावण्यात येणार आहे. त्यामुळे मोटरमन तणावात राहतील. इतर कुठल्याच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अशा प्रकारची यंत्रणा नाही. मोटरमनवर सतत लक्ष ठेवणारी यंत्रणा बसवून, प्रत्येक घडामोडीचा दस्तऐवज तयार करून भविष्यात मोटरमनवर वारंवार कारवाई केली जाऊ शकते. असा आक्षेप मोटरमन असोसिएशनने घेतला आहे.

चर्चेतून मार्ग निघणार का ?

रेल्वे संघटना आणि मोटरमनशी चर्चा सुरू आहे. चर्चेतून मार्ग निघेल. त्यामुळे मोटरमनचे आंदोलन होणार नाही, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.

Story img Loader