जगातील सर्वोच्च जन्मदर असणाऱ्या देशांमध्ये नायजेरियाचाही समावेश आहे. बाळ जन्माला घालण्यासाठी या देशात अनेकदा सामाजिक दबावाचा सामना करावा लागतो. त्यांनी तसे न केल्यास त्यांना समाजातून बहिष्कृत केले जाते आणि अनेक अत्याचारही सहन करावे लागतात. या दबावाखाली काही महिला गर्भधारणेसाठी अनेकदा टोकाची पावले उचलत आहेत. त्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. काय आहे ही ‘क्रिप्टिक प्रेग्नन्सी’? बाळ विकण्यासाठी कशी केली जात आहे महिलांची फसवणूक? जाणून घेऊ.

चमत्कारिक प्रजनन उपचार म्हणजे नक्की काय?

‘बीबीसीच्या तपास अहवाला’नुसार, क्रिप्टिक प्रेग्नन्सीच्या नावाखाली नायजेरियातील महिलांची फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले. डॉक्टर किंवा परिचारिका म्हणून काम करणारे घोटाळेबाज स्त्रियांना खात्री देतात की, त्यांच्याकडे गर्भधारणेची हमी देणारे चमत्कारिक प्रजनन उपचार आहेत. प्रारंभिक उपचारात महिलांकडून शेकडो डॉलर्स घेतले जातात. त्यात इंजेक्शन, पेय किंवा योनीमार्गात विशिष्ट औषधे सोडली जातात. तपासात सहभागी झालेल्या एकाही महिला किंवा अधिकाऱ्यांना औषधांबद्दलची माहिती नाही. परंतु, काही महिलांनी या तपासात सांगितले की, यामुळे त्यांच्या शरीरात बदल घडून आले, जसे की त्यांचे पोट सुजले; ज्यामुळे त्यांना खात्री पटली की, त्या गर्भवती आहेत. उपचार दिलेल्या महिलांना कोणत्याही पारंपरिक डॉक्टरांना किंवा रुग्णालयांना भेट देऊ नका, कारण- कोणत्याही स्कॅन किंवा गर्भधारणेची चाचणी केल्यास बाळ दिसणार नाही, असेही त्यांनी सांगण्यात आले. उपचार घेणाऱ्या महिलांना घोटाळेबाज खात्री पटवून देतात की, बाळ गर्भपिशवीच्या बाहेर वाढत आहे. जेव्हा त्या महिलेची प्रसूती करण्याची वेळ येते, तेव्हा महिलांना असे सांगितले जाते की, त्यांना दुर्मीळ व महाग औषध दिल्यावरच प्रसववेदना सुरू होऊन, त्यांची प्रसूती होईल; ज्यासाठी महिलांना आणखी पैसे भरावे लागतात.

जगातील सर्वोच्च जन्मदर असणाऱ्या देशांमध्ये नायजेरियाचाही समावेश आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : अस्थम्याच्या रुग्णांसाठी मोठी बातमी; गेमचेंजर ट्रीटमेंटचा शोध, ५० वर्षांतील सर्वांत मोठे यश, कसा होणार फायदा?

प्रसूती कशी केली जाते, याविषयी सर्वांनी वेगवेगळे अनुभव सांगितले. काहींना फक्त सिझेरियनसारखी पोटावर चीर करून झोपेतून उठवले जाते. इतरांचे म्हणणे आहे की, त्यांना एक इंजेक्शन दिले जाते; ज्यामुळे त्यांची तंद्री लागते आणि त्यांना विश्वास वाटतो की, त्या खरोखरच बाळाला जन्म देत आहेत, असे ‘बीबीसी’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. पीडितांपैकी एकाने आयुक्त ओबिनाबो यांना सांगितले की, जेव्हा तिची प्रसूती करण्याची वेळ आली तेव्हा तथाकथित डॉक्टरांनी तिला कंबरेमध्ये इंजेक्शन दिले. प्रसूती वेदनादायक असल्याचेही ती म्हणाली.

क्रिप्टिक प्रेग्नन्सी म्हणजे काय?

क्रिप्टिक प्रेग्नन्सी ही एक मान्यताप्राप्त वैद्यकीय घटना आहे. क्रिप्टिक प्रेग्नन्सीमध्ये अखेरपर्यंत महिलेला ती गरोदर असल्याची कल्पना नसते. काही महिला तर अशाही असतात की, ज्यांना अगदी प्रसूतीच्या वेळेपर्यंत माहीत नसते की, त्या गरोदर आहेत. त्यामध्ये महिलांना गरोदर असल्याची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. पण, तपासादरम्यान बीबीसीला या प्रकारच्या गर्भधारणेबद्दल फेसबुक ग्रुप्स आणि पेजेसमध्ये मोठ्या प्रमाणावर चुकीची माहिती आढळली. अमेरिकेतली एका महिलेने फेसबुकवर क्रिप्टिक प्रेग्नन्सीविषयी एक पोस्ट लिहिली; ज्यात तिने असा दावा केला की, ती वर्षभरापासून गरोदर आहे.

फेसबुकवर गर्भधारणा होऊ शकत नाही, अशांसाठी उपचाराच्या अनेक पोस्ट टाकण्यात येतात. घोटाळेबाजांनी उपचार हा शब्द चमत्कार या शब्दाबरोबर बदलला आहे आणि त्याला धर्मिकतेशी जोडले आहे. या सर्व चुकीच्या माहितीमुळे महिलांचा घोटाळ्यावरील विश्वास दृढ होत असल्याचे चित्र आहे. या गटांचे सदस्य केवळ नायजेरियातच नाहीत, तर दक्षिण आफ्रिका, कॅरिबियन व अमेरिकेमध्येही आहेत. महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी हे ठग सोशल मीडियाचा वापर करतात. एखाद्या महिलेने हा उपचार घेण्याची तयारी दर्शवली की, त्यांना अधिक सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आमंत्रित केले जाते. तेथे, प्रशासक क्रिप्टिक क्लिनिक आणि प्रक्रियेमध्ये काय समाविष्ट आहे, याबद्दल माहिती प्रदान करतात.

हेही वाचा : अजमेर दर्गा शिवमंदिराच्या जागेवर असल्याचा हिंदू सेनेच्या प्रमुखांचा दावा, कोण आहेत विष्णू गुप्ता?

बाळ विकण्यासाठी महिलांची फसवणूक?

बीबीसीने त्यांच्या तपासात छाप्याचे फुटेजही रेकॉर्ड केले आहे. त्यामध्ये दोन इमारतींचे एक मोठे तयार कॉम्प्लेक्स दिसते. एका खोलीत वैद्यकीय उपकरणे आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी अनेक गर्भवती महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध ठेवले असल्याचे लक्षात आले. १७ वर्षांपेक्षा कमी वयाच्या काही मुलीही तिथे होत्या. काहींनी बीबीसीला सांगितले की, त्यांना यात सहभागी होण्यासाठी फसवले गेले होते. त्यांच्या मुलांची फसवणूककर्त्यांकडून विकली जातील याची त्यांना कल्पनाही नव्हती.

Story img Loader