Winter Skin Problems: थंडीत अनेकदा चेहऱ्याची अवस्था अगदीच बिकट होते. ऋतूबदलांमुळे अनेकांच्या त्वचेच्या तक्रारी सुरु होतात. कित्येक वर्षांपासून स्त्री, पुरुष अगदी आतातर लहान मुलांमध्येही दिसून येणारी एक त्वचेची तक्रार म्हणजे पिंपल! थंडीच्या दिवसात घाम येण्याचे प्रमाण तसे कमी असते. ज्यांची त्वचा वर्षभर काहीशी तेलकट असते त्यांनाही या थंडीत थोडा आराम मिळेल अशी अपेक्षा असते पण अनेकदा थंडीत वापरण्यात येणारे मॉइस्चरायजर त्वचेवर भारी पडतात आणि मग पुन्हा तेच पिंपल्स सत्र सुरु होतं. तुम्ही या पिंपलच्या बाबत एका गोष्टीचे निरीक्षण केले आहे का? ज्या ठिकाणी तुम्हाला एकदा पिंपल येतो त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा पिंपल्स येतात. असे नेमके का होते? पिंपल्स न येण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमची त्वचा तेलकट आहे का?

त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. रोहित बत्रा यांनी हिंदुस्थान टाइम्सला सांगितले की, तुमची त्वचा तेलकट म्हणजे तुमच्या त्वचेच्या थरात सेबेशियस ग्रंथी जास्त सक्रिय असतात. या ग्रंथींमधून स्त्रवणारे सेबम द्रव्य त्वचेच्या छिद्रांमध्ये जाते परिणामी ही छिद्रे ब्लॉक होतात व त्वचेवर तेलाचा थर दिसू लागतो. याच सेबममध्ये अनेकदा मृत पेशी व धूळ माती येऊन अडकते व त्वचेवर ब्लॅक हेड, व्हाईट हेड दिसू लागतात व या सगळ्या अडकून राहिलेल्या मातीच्या थरामुळे पिंपल्सचा त्रास सुरु होतो.

चेहऱ्याला वारंवार स्पर्श करण्याची सवय आहे?

डॉ. बत्रा यांनी खुलासा केला की “जेव्हा त्वचा सतत सूक्ष्मजीव, प्रदूषित हवा, तेल इत्यादींच्या संपर्कात येते तेव्हा अर्थातच याचा परिणाम नाजूक त्वचेवर दिसू लागतो. अनेकदा आपण नकळतच काही वस्तूंना हात लावायची सवय असते. जेव्हा तुम्ही हेच हात तुमच्या चेहऱ्याला लावत असाल तर यामुळेही चेहऱ्याची त्वचा खराब होण्याची शक्यता असते. या सर्वांमुळे तुमच्या त्वचेच्या छिद्रांमध्ये बॅक्टेरिया आणि तेल पसरू लागते. हीच बाब केसाच्या बाबतही लागू होते, आपल्यापैकी अनेकजण केसाला विविध उत्पादने लावतात कदाचित त्याचा तुमच्या केसाला फायदा असेलही पण त्वचेसाठी या वस्तू अपायकारक ठरू शकतात. यामुळे यापुढे केसाच्या बटा चेहऱ्यावर येत असतील तर बांधणे व घाम पुसण्यासाठी किंवा अन्य कारणांनी चेहऱ्याला हात लावणे टाळावे किंवा निदान स्वच्छ रुमालाचा वापर करावा.

मासिक पाळीत पिंपल्स

राजस्थानच्या बिकानेर येथील डॉ. प्रसून डर्माकॅसल येथील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. प्रसून सोनी यांच्या मते, “मासिक पाळीच्या कालावधीत हार्मोनल बदल तीव्र असतात. एंड्रोजेन्समुळे सेबेशियस ग्रंथी सक्रिय करतात यामुळेच तुमच्या गालावर, हनुवटीच्या भागात, मानेवर पिंपल्स येऊ लागतात.

हे ही वाचा<< विश्लेषण: सतत मूड स्विंग, निद्रानाश याचं कारण ठरणारा ‘बायपोलर डिसऑर्डर’ आजार नेमका आहे तरी काय?

खरंच पिंपल्स आहे की…?

अनेकजण त्वचा विकार व पिंपल यांना एकच समजण्याची चूक करतात. पिंपल्स व त्वचा विकारांमधील मुख्य फरक म्हणजे पिंपल हा चेहऱ्याच्या त्वचेवर येतो व अन्य आजारांमध्ये त्वचेला छिद्राप्रमाणे खोल जखम होऊ शकते. याला वैद्यकीय भाषेत सिस्ट असेही म्हणतात, अनेकदा या छिद्रात तेल, व बॅक्टरीया जमा झाल्याने खोलवर जखमही होऊ शकते. जर योग्य ते उपचार घेऊन यावर उपाय केला नाही तर सिस्टमधील घाण व द्रव चेहऱ्यावर पसरून ते एखाद्या ऍलर्जीप्रमाणे पसरत जाऊ शकते.

पिंपल्स वर उपचार काय?

  1. चेहरा नीट धूत राहा, स्क्रब वापरत असाल तर टी झोन म्हणजेच नाक व भुवयांच्या भागात नीट स्वच्छता करा
  2. केसाच्या बटा चेहऱ्यावर येत असतील तर केस नीट बांधा
  3. घाम पुसण्यासाठी किंवा अन्य कारणांनी चेहऱ्याला हात लावणे टाळावे किंवा निदान स्वच्छ रुमालाचा वापर करावा.
  4. घरगुती उपचारांवर अवलंबून राहू नका तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
  5. चेहऱ्यावर कोणतेही क्रीम, तेल, किंवा अगदी रुमालही लावताना आवश्यक काळजी घ्या.
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do you get pimple on the same spot blackheads t zone face cleansing hacks explained svs
First published on: 22-11-2022 at 16:58 IST